Maharashtra Breaking News 05 July 2022 : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2022 06:46 PM
Uddhav Thackeray : एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यांमध्ये विकृत हसू दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोल्यात अश्रू : उद्धव ठाकरे

शिवसैनिकांना शिवसैनिकांसोबतच लढायचे आहे. एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यांमध्ये विकृत हसू दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसैनिकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत, असे  म्हणत उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदरांचा गद्दार असा उल्लेख केला आहे. 

Nashik News Update : नाशिकरोड परिसरातील शेतात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला 

नाशिकरोड परिसरातील गोरेवाडीमध्ये सोमनाथ जाधव यांच्या उसाच्या शेतात आज सकाळी एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला आहे. या महिलेचे  वय अंदाजे 30 ते 25 वयोगटातील असून संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडालीय. महिलेचा ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून खून झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. मृतदेहाचा काही भाग कुजलेला असून मृत महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. ही घटना समजताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.  पुराव्यांच्या आधारे अधिक तपास केला जात आहे. 

शिवाजी आढळराव पाटील आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार

शिवसेनेचे उपनेते आणि पुण्यातील माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत. आढळरावांची रविवारी आधी पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची चर्चा होती. त्यानंतर काही तासांतच ते शिवसेनेतच असल्याचं असं पक्षाने जाहीर केलं. यामुळं पक्षातील माझी किंमत कळल्याच आणि राज्यात बदनामी झाल्याचं आढळरावांनी जाहिरपणे सांगितलं होतं. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ते मुंबईत दाखल झाले आहेत. आज दुपारी ते मातोश्रीवर जाऊन भेट घेणार आहेत.





Earthquake : अंदमान-निकोबारसह जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे हादरे

अंदमान-निकोबार (Andaman Nicobar) बेटावर आणि पोर्ट ब्लेअरमध्ये तीव्र भूकंपाचा झटका बसला आहे. या भूकंपाची तीव्रता 5.0 होती. याशिवाय जम्मू आणि काश्मीरमध्येही भूकंपाचे झटके जाणवले. येथील भूकंपाची तीव्रता तुलनेनं कमी होती. जम्मू आणि काश्मीरमधील भूकंपाची तीव्रता 3.2 होती. या भूकंपादरम्यान कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाल्याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यासह अफगाणिस्तानमध्येही पुन्हा भूकंपाचे हादरे बसले आहेत.






सविस्तर बातमीसाठी येथे क्लिक करा.

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर

भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर आहेत. 

Sanjay Pandey ED Inquiry : संजय पांडे यांची ईडी चौकशी

Sanjay Pandey ED Inquiry : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  संजय पांडे यांना  ईडीने  आज चौकशीसाठी बोलवले आहे.  30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.

व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांवर कारवाईची मागणी

व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर 14 जणांची तक्रार करण्यात आली आहे. 

Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर

Maharashtra Politics : राज्यात शिंदे - फडणवीस आल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरला जाणार आहे. नागपुरात  फडणवीसांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर पोहचणार आहे. त्यानंतर फडणवीसांच्या घरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. 

Maharashtra Rain Updates : पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Maharashtra Rain Updates : पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येहवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा


पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येहवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे. एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.


देवेंद्र फडणवीस नागपूर दौऱ्यावर


राज्यात शिंदे - फडणवीस आल्यानंतर पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस नागपूरला जाणार आहे. नागपुरात  फडणवीसांचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. सकाळी 10.30 वाजता एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर पोहचणार आहे. त्यानंतर फडणवीसांच्या घरापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे


व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरे वगळता इतर 14 आमदारांवर कारवाईची मागणी


व्हिपचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे गटाचे भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या 14 आमदारांची विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव वगळून इतर 14 जणांची तक्रार करण्यात आली आहे. 


संजय पांडे यांची ईडी चौकशी


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे.  संजय पांडे यांना  ईडीने  आज चौकशीसाठी बोलवले आहे.  30 जून रोजी मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन संजय पांडे निवृत्त झाले होते. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांच्या आत त्यांना ईडीने नोटीस पाठवली आहे.


भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर 


भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू  आजपासून तीन दिवस बिहार दौऱ्यावर आहेत. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.