Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Chandrapur News Update : चंद्रपूरमधील ब्रम्हपुरी येथील जिल्हा मत्स्यव्यवसाय कार्यालयात लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महिला लिपिकाला रंगेहाथ पकडले आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्याला वेतनश्रेणीचा फरक मिळवून देण्यासाठी महिला वरिष्ठ लिपिकाने लाच मागितली होती. लाचलुचपत विभागाने सापळा रचून लिपिक वर्षा मगरे यांना रंगेहाथ पकडले आहे.
मुंबई सत्र न्यायालयानं पुण्यातील व्यावसायिक हसन अली खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
हसन अली हे गेल्या अनेक महिन्यापासून कोर्टातील सुनावणीला गैरहजर
हसन अलीवर जवळपास 37 हजार कोटींचा मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे
आयकर विभागानं हसन अलीवर साल 2007 मध्ये धाड टाकून केली होती कारवाई
साल 2011 मध्ये ईडीनं मनी लँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती
साल 2018 मध्ये हसन अलीला कोर्टातून जामीन मिळालेला होता
मात्र खटल्याला अनुपस्थित राहत हसन अलीनं जामीनातील अटीशर्तींचा भंग केला
अखेर तपासयंत्रणेच्या विनंतीवरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी हसन अलीविरोधात वॉरंट जारी केला
पुढील सुनावणीत कोर्टापुढे हजर राहत हसन अलीला जामीन मिळवावा लागेल
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या ईडीच्या कारवाईनंतर शिवसैनीक आक्रमक झाले आहेत. शिवाय दिल्लीतही घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थानी सर्वपक्षीय आमदारांना जेवणासाठी निमंत्रण देण्यात आलं आहे.
Mumbai Andheri Traffic : मुंबईच्या अंधेरी सबवेमध्ये मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे पूर्व ते पश्चिम ला जोडणारा मुख्य मार्गावर गेल्या एक-दीड तासापासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अंधेरी सबवेला लागून असेलेल्या पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सध्या अंधेरी सबवेची वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांचा जवान युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आज ईडीने कारवाई केली आहे. संजय राऊत यांची 11 कोटी 15 लाखांची संपत्ती ईडीनं जप्त केली. यानंतर संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे., "मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कितने कंकड फेकोगे ! चुन चुन कर आगे बढूंगा मैं, तुम मुझको कब तक रोकोगे" असे म्हणत एक शेर शेअर केला आहे.
Congress Soniya Gandhi : कॉंग्रेस आमदारांना सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ अखेर मिळाली. संध्याकाळी सात वाजता दहा जनपथवर आमदारांना भेटणार आहे.
Ahmednagar News Update : अहमदनगरमधील पारनेर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विजय औटी यांच्याकडून नगरपंचायत कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज भोज असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे 1 मे रोजी गाव सभेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गाव ठराव करून घ्यायचा आहे.
गावातल्या शेतकऱ्यांच्या मागणीवर संसदेत ठराव करायला भाग पाडू.
मूलभूत अधिकार म्हणून शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी देखील गाव सभेत ठराव घ्या.
गावागावात जाऊन हुंकार यात्रा काढली जाणार.
केंद्र आणि राज्य सरकारने उपेक्षित नागरिकांना उध्दवस्त केले.
Sindhudurg News Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली, दोडामार्ग परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात अजूनही सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. पुढचे तीन ते चार दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात आज सर्वाधिक तापमानाची नोंद...
नंदुरबार जिल्ह्याचे तापमान 43.4 अंश सेल्सिअस वर...
शरीराची लाही लाही करणारे ऊन...
दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान घराबाहेर न पडण्याचा प्रशासनाचा आवाहन.
Aaditya Thackeray : देशात लोकशाहीचे नाही तर दबावाचं वातावरण आहे. संजय राऊतांवर राजकीय हेतूने कारवाई झाली आहे.
Sangli News Update : जेवणात फिनेल घालून पत्नीकडून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील घटनेने खळबळ उडाली आहे. पत्नीकडून पतीला गुलाबजामुन खाण्याचा आग्रह केल्याने पतीला संशय आला. त्यामुळे पत्नीचे पितळ उघडे पडले. याबाबत पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे.
नांदेड शहरातील नाईक नगर येथील रहिवाशी असणाऱ्या संजय बियाणी या व्यावसायिकाच्या घरावर अज्ञातांनी गोळीबार केलाय. ज्यात बियाणी व त्यांचा वाहन चालक हे गंभीररीत्या जखमी झाले होते. नांदेड येथील खासगी रुग्णालयात संजय बियाणी यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले असता उपचारा दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. या गोळीबार गोळीबाराच्या घटनेनंतर नांदेड शहरात एकच खळबळ माजलीय.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी आनंदाची बातमी आहे. राज ठाकरे यांच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे आणि सून मिताली ठाकरे यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे. ब्रीच कँन्डी रुग्णालयात मिताली यांनी गोंडस बाळाला जन्म दिला आहे. ठाकरे घराण्यात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे राज ठाकरे आता आजोबाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजोबा झाल्याची माहिती मिळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत: ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच त्यांचे इतर कुटुंबियही रुग्णालयात दाखल झाले आहेत. नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याने ठाकरे कुटुंबामध्ये आनंदाचं वातवरण पाहायला मिळतंय.
Sanjay Raut : संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त
भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या कोमल वाकळे हिने सुवर्णपदक पटकावला आहे. 87 किलो वजन गटामध्ये 202 किलो वजन उचलत कोमल सुवर्णपदकाची मानकरी झाली आहे. नगरसारख्या शहरात वेटलिफ्टिंगचा सराव करण्यासाठी कोणत्याही सुविधा नसताना वेगवेगळ्या ठिकाणी सराव करून कोमलने वेटलिफ्टिंग मध्ये अनेक पदके मिळवली आहेत. 19 मार्च ते 31 मार्च दरम्यान ओडिशाच्या भुवनेश्वर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलं या स्पर्धेत तिला सुवर्णपदक मिळाला आहे कोमलच्या खेळाबाबत तिचा परिवार अगदी सुरुवातीपासून तिच्या पाठीशी आहे. तिने महिन्यात करावे आणि देशासाठी पदक मिळावी हीच तिच्या आई-वडिलांची इच्छा आहे.
Indapur : इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथील डोंगरे वस्ती येथे सोमवारी रात्री चार अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवत 1 लाख 51,500 किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. त्यातील 2 आरोपींना इंदापूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आनंद सहदेव डोंगरे यांच्या फिर्यादीवरुन इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. इंदापूर पोलीसांनी केवळ चार तासात या गुन्ह्याचा छडा लावत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत तर अन्य आरोपी फरार आहेत.. आरोपींनी फिर्यादी डोंगरे यांचे राहते घरी जावून चाकूचा धाक दाखवत फिर्यादी सह फिर्यादीच्या आईला हाताने मारहाण करुन शिवीगाळ करुन तसेच आरडा ओरडा केल्यास हातातील चाकुने तुमचा जिव घेइल अशी धमकी देवुन रोख रक्कम सोन्याचे दागीने व मोबाइल असा मिळुन किंमत रुपये 1 लाख 51,500/- रु चा ऐवज लंपास केला. सदरील घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा सतर्क करुन आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान सदरील घटनेबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सरडेवाडी टोलनाक्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. ज्या गाडीतून दरोडेखोर पसार झाले होते ती गाडी इंदापूर पोलिसांना निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांनी त्या गाडीचा शोध घेत पाठलाग केला असता करमाळा तालुक्यातील खांबेवस्ती येथे दोन दरोडेखोरांसह पांढऱ्या रंगाची स्कर्पिओ गाडी इंदापूर पोलीसांनी ताब्यात घेतली आहे.
Pune Crime News : मागील काही दिवसांपासून पुण्यातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचं चित्र दिसत आहे.. भरदिवसा शाळेत प्रवेश करू अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्याचा प्रकार ताजा असतानाच पुण्याच्या सहकारनगर परिसरातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय.. पाच ते सहा गुन्हेगारांच्या टोळीने एका तरुणाला भर रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.. इतकंच नाहीतर डोक्यावर पाय ठेवून त्या तरुणाला माफी मागायला भाग पाडले..
Nashik News : वैदू समाजातील जात पंचायतीचा जाच सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले, एक रुपयाच्या भरपाईवर विवाहितेला मोबाईलवर घटस्फोट दिल्याचा धक्कादायक प्रकार सिन्नरमध्ये उघडकीस आलाय.
Buldana News : सध्या कांदा काढणीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला असून वाढत्या तापमानामुळं कांदा खराब होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातच कांदा पडून आहे. बाजारात कांद्याला फक्त 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्यानं येत्या काही दिवसांत वादळी पावसाची शक्यता असल्याचं भाकीत केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न उभा आहे, अशा परिस्थितीत मात्र कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
Maharashtra News : राज्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळात याच महिन्यात मोठे फेरबदल होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिलीय. पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. रिक्त मंत्रिपदांबरोबरच काही फेरबदल करण्याविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे . तसंच खातेबदलांबाबतही चर्चा होणं अपेक्षित आहे. काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नाराजीबाबतही बैठकीत चर्चा होईल. गृहखातं आणि विधानसभा अध्यक्षपदाची अदलाबदल होण्याचीही शक्यता आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट होणार होती. पण ती रद्द झाली. त्यानंतर मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबतची माहिती सूत्रांनी दिलीय.
Maharashtra News : राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध केल्यानंतर मुस्लिम मनसैनिक नाराज झालेत. मशिदीवर भोंगे लावले तर समोर हनुमान चालिसा लावा असं आवाहन राज यांनी केलं आणि काही मनसैनिकांनी त्याची अंमलबजावणीही सुरु केली. राज यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या या वक्तव्यानंतर पुणे आणि कल्याणमधील मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय. पुण्यात शाखा अध्यक्ष असलेल्या माजिद अमीन शेख यांनी राजीनामा दिलाय. तर अनेक कार्यकर्ते राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. तर मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनीही आपली नाराजी सोशल मीडियातून व्यक्त केलीय. त्यांची भावनिक पोस्ट व्हायरल झालीय. मुस्लिम पदाधिकारी बैठक घेऊन पुढचा निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलंय.
Mumbai Local Trains : राज्य सरकारने सर्व कोविड निर्बंध (Covid Restrictions) हटविले आहेत, याबाबत रेल्वेने रविवारी सांगितले की, त्यांनी लसीकरणाशी संबंधित पर्याय आपल्या तिकीट अॅपमधून हटविला आहे. आतापर्यंत, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र आता निर्बंध हटविल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही लोकांमध्ये याबाबत नाराजी दिसून येत आहे.
कोरोनामुळे गेले दोन वर्ष जणू काही सारं विश्वच थांबलं होतं. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर गाडा रुळावर यायला लागलाय. अशातच आजपासून साताऱ्यामधे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दोन वर्षांनंतर ही स्पर्धा होत असल्याने यावर्षी सर्व पैलवान मोठ्या तयारीनिशी फडात उतरणार आहेत.
कधीकाळी सोन्याची लंका अशी बिरुदावली मिरवणारी श्रीलंका आता स्वतःच लंकेची पार्वती होण्याची वेळ आलेय. आर्थिक आणीबाणीमुळे श्रीलंकेत अस्थिरता, अराजक माजलंय. श्रीलंकेवर सध्या अब्जावधींचं कर्ज आहे आणि त्याची परतफेड करण्यासाठीही पैसे नाहीयेत. दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत त्यामुळे महागाईनं त्रस्त जनता रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शनं करत आहेत... काल श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळानं राजीनामा दिला होता. आता निदर्शकांनी पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्षांच्याही राजीनाम्याची मागणी केलेय. श्रीलंकेत सध्या रुग्णालयातही वीज नाहीये. रेल्वे-बस नेटवर्क ठप्प आहे, एवढंच काय तर महागाईमुळे लोकांना खावं काय हाही प्रश्न पडलाय. या अराजकासाठी श्रीलंकेच्या जनतेनं राजपक्षे परिवाराला जबाबदार धरलंय.
Criminal Procedure Identification Bill 2022 : गुन्हेगारी प्रक्रिया ओळख विधेयक 2022 सोमवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. विरोधकांच्या टीका फेटाळून लावत गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक काळाची गरज असल्याचे म्हटले आहे. आता हे विधेयक राज्यसभेत पाठवले जाणार आहे. दोषी किंवा आरोपी व्यक्तीच्या ओळखीसाठी जैविक नमुने, बोटांचे ठसे, पायाचे ठसे आणि इतर प्रकारचे नमुने घेण्याची तरतूद विधेयकात करण्यात आली आहे.
विरोधकांकडून जोरदार टीका
लोकसभेत या विधेयकावर जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी हे विधेयक मूलभूत हक्क आणि मानवी हक्कांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. हे विधेयक गोपनीयतेच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचेही विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिले आणि म्हटले की सरकारला प्रथम पीडितांच्या मानवी हक्कांची काळजी आहे.
IOCL, Petrol-Diesel Price Today 5 April 2022 : आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईल (Crude Oil) ची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अशातच, भारतीय बाजारात पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या (Petrol-Diesel) दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबण्याचं नाव घेईना. देशात (Fuel Prices) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत असल्याचं दिसत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे.
दोन आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 13 वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चपासून सुरू झालेलं वाढीचं सत्र आटोक्यात येण्याचं नाव घेत नाही. 15 दिवसांपैकी 24 मार्च आणि 1 एप्रिल हे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल न झाल्यानं दर स्थिर होते. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2 आठवड्यात हळूहळू पेट्रोल 9.20 रुपयांनी महागलं आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Pune Crime : दिघी परिसरात कुरिअर फर्मच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा सापडला असून पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त
पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलीसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे.
Raju Shetti : राजू शेट्टी महाविकास आघाडीत राहणार की जाणार? मंगळवारी होणार अंतिम निर्णय
कोल्हापूर: राजू शेट्टींची स्वाभिमानी शेतकरी संघटना ही महाविकास आघाडीमध्ये राहणार की बाहेर पडणार याचा निर्णय मंगळवारी होणार आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मंगळवारी राज्य कार्यकारणी बैठक आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील चोकाक इथं सकाळी 11 वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या यादीतून आमदार व्हायचं की नाही हेही मंगळवारी होणाऱ्या बैठकीत ठरणार आहे. राजू शेट्टी या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये जाण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निर्णय सामुदायिक होता. अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारला समीक्षा करण्याची वेळ आली आहे. ज्या उद्देशाने किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी तयार झाली, त्याचं काय झालं? अनेक मुद्दे खटकणारे आहेत. नवीन धोरण राबवताना संवादही साधला नाही. या सगळ्या गोष्टींची समीक्षा येत्या 5 एप्रिलला करणार आहोत. त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ असं राजू शेट्टी यांनी या आधीच स्पष्ट केलं होतं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -