Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 May 2022 11:30 PM
Nagpur : इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग, लाखोंचे साहित्य जळून खाक

Nagpur : नागपूरच्या कॉटन मार्केट परिसरातील महात्मा फुले मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील इलेक्ट्रॉनिक दुकानाला आग लागली आहे. अचानक लागलेल्या आगीचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.  या आगीत इलेक्ट्रॉनिक वस्तू साऊंड सिस्टमसारख्या अनेक गोष्टी जळून खाक झाल्या आहेत. 

Bacchu Kadu: येती निवडणूक आपण भोंग्याशिवाय लढणार : राज्यमंत्री बच्चू कडू

सुप्रीम कोर्टाने ओबीसी संदर्भात दिलेल्या निर्णयावर राज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर हा निर्णय अन्यायकारक असल्याचं ही ते म्हणाले आहेत. यामुळे राजकीय अस्तित्व संपणार असल्याची ही भीती त्यांनी व्यक्त केली आहे. कोर्टाने यावर पुनर्विचार करून केंद्र आणि राज्यसरकारने यात लक्ष देण्याची विनंतीही त्यांनी केलीय. ते अकोल्यात आढावाबैठीकीनंतर माध्यमांशी बोलत होते. तर येणारी निवड आपण भोंग्या शिवाय लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

Amravati Breaking: युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यलयात केली तोडफोड; पराग गुडधे यांचा आरोप

अमरावती शहरातील राजापेठ चौकात असलेल्या शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या कार्यालयातील खुर्च्यांची फेकाफेक झाल्याची बातमीस समोर येत आहे. त्यांच्या कार्यालयात आमदार रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची केली फेकाफेक केल्याचा आरोप पराग गुडधे यांनी केला आहे. खुर्च्या फेकाफेक करणारे युवा स्वाभिमान पार्टीचे कार्यकर्ते असल्याचा आरोप आहे.

मनसे अंधेरी पूर्व विधानसभाचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांना अटक

मुंबईच्या मनसे अंधेरी पूर्व विधानसभाचे विभाग अध्यक्ष रोहन सावंत यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आज दुपारी मरोळ विजयनगर येथे मशिदीमध्ये  अजाणचे भोंगे सुरू असताना रोहन सावंत यांनी मशिदीच्यासमोर भोंग्यातून हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केला होता याच दरम्यान एमआयडीसी पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांच्या सोबत रोहन सावं ला अटक केली आहे,

Hingoli: हळदीसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

आज हिंगोली जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, तर ग्रामीण भागात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला आहे. सायंकाळी चार ते पाच वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने उकाड्यापासून त्रस्त असलेले सर्व जिल्हावासीयांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणचे विजेचे खांब पडले आहेत. त्याचबरोबर शेतातील पॉलिश करत असलेली हळद भिजली आहे आणि शेतात उभ्या असलेल्या केळीच्या पिकाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Municipal Election: निवडणुका कधीही आल्या तरी आम्ही सामोरे जाण्यास आणि जिंकण्यास तयार : खासदार श्रीकांत शिंदे

मागील 18 महिन्यापासून रखडलेल्या पालिकेच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लोकप्रतिनिधीची मुदत 11 नोव्हेबर 2020 साली संपली. त्यानंतर नोव्हेबर 2020 मध्ये पालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर महापालिकेच्या निवडणुका केव्हा होणार असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात आहे. आता न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर आलेली मरगळ झटकून पुन्हा एकदा राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. निवडणुकीबाबत बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी शिवसेनेची तयारी निवडणुकी पुरती नसते. शिवसेना 12 महिने काम करत असून निवडणुका कधीही आल्या तरी आम्ही सामोरे जाण्यास आणि जिंकण्यास तयार असल्याचे सांगितले. 

Ambarnath: कल्याण ,अंबरनाथ ग्रामीण भागाची दशकांपासूनची पाणी प्रतीक्षा संपणार

मागील अनेक वर्षापासून पाण्याच्या समस्येने ग्रासलेल्या कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांची पाणी प्रतीक्षा येत्या काही महिन्यात संपनार आहे. सरकारच्या जल जीवन मिशन मधून 44 कोटी 36 लाखांची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 18 महिन्यात ही योजना पूर्ण होणार असून या भागातील नागरिकांची पाणी समस्या दूर होणार असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. 

Ambarnath: अंबरनाथमध्ये कारचा अपघात होऊन कार झाली पलटी

अंबरनाथमध्ये एका कारचा अपघात झाला आहे. या अपघातात कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उताराला पलटी झाली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले आहेत. अंबरनाथ पूर्व भागातून ही कार पश्चिमेला जात होती. याच वेळेस साई सेक्शन पाणीपुरवठा कार्यालया जवळील रहदारीच्या रस्त्यावर कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार उताराला जाऊन पलटी झाली. कार पलटी झाल्यानंतर मोठ्या मुस्किलीने कार मधील लोकांना बाहेर काढण्यात यश आले. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गाडीतल्या दोन ते तीन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Wardha: IPL क्रिकेट मॅच जुगारवर छापा

स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व सायबर शाखेचा लाईव्ह IPL क्रिकेट मॅच जुगारवर छापा टाकला आहे. यावेळी पोलिसांनी एकूण 26 लाख 33 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Mahajyoti :  महाज्योतीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत घसघशीत वाढ

Mahajyoti :  महाज्योतीच्या माध्यमातून पिएचडी करणा-या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी  आहे. महाज्योतीच्या माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या मासिक शिष्यवृत्तीत घसघशीत वाढ  करण्यात आली आहे. 21 हजारांची मासिक शिष्यवृत्ती  31 हजारांपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणात नवा खळबळजनक खुलासा; प्रदीप शर्मा मनसुख हिरेन हत्येमागील मुख्य सूत्रधार

एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन हत्येमागील मुख्य सूत्रधार आहेत. हिरेन यांच्या हत्येचा कट मुंबई पोलीस आयुक्तालयातच रचण्यात आला होता. प्रदीप शर्मा आणि इतर आरोपी यासाठीच्या बैठकांना हजेरी लावत होते. सचिन वाझेनं मनसुख हिरेनची हत्या करण्यासाठी प्रदीप शर्मांना 45 लाख रूपये दिले होते, असा एनआयएने दावा केला आहे. प्रदीप शर्मा यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर एनआयएनं प्रतिज्ञापत्राद्वारे विरोध करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकोर्टाने या प्रकरणाची सुनावणी 17 जुलैपर्यंत तहकूब केली आहे. 

Nanded : नांदेड येथे विष्णुपुरीजवळ एसटी महामंडळ बस व टेम्पोचा भीषण अपघात

नांदेड येथील विष्णुपुरी जवळ कर्नाटक डेपोच्या बस व टेंम्पोचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.अपघातातील जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले  आहे. 

Repo Rate Hike: कर्ज महागले, आरबीआयकडून रेपो दरात 40 बीपीएसनं वाढ

Repo Rate Hike: आरबीआयकडून रेपो दरात 40 बीपीएसनं वाढ करण्यात आली आहे. यामुळे कर्ज महागणार आहे. 

Akola : कापशी गावात एकाचवेळी आढळलेत तीन अज्ञात मृतदेह; तपास सुरू

 Akola : अकोला जिल्ह्यातील कापशी गावात एकाचवेळी आढळलेत तीन अज्ञात मृतदेह. तिन्ही मृतदेह पुरूषांचे. दोन मृतदेह कापशी तलावाच्या काठावर तर एक मृतदेह आढळला विहिरीत. घातपात की आत्महत्या?, पोलीसांचा तपास सुरू.

ओबीसी आरक्षण प्रश्नी राज्य सरकारला दणका, दोन आठवड्यात महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका जाहीर करा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

OBC Reservation : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम दोन आठवड्यात जाहीर करा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. मार्च 2020 च्या जुन्याच प्रभाग रचनेनुसार निवडणुका घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिल्याने राज्य सरकारला दणका बसला आहे. जवळपास 14 महापालिका 25 जिल्हा परिषदांसह अनेक नगरपंचायती ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत.

Navneet Rana Bail : राणा दाम्पत्याला मोठा दिलासा; सत्र न्यायलयाक़डून जामीन मंजूर

Navneet Rana Bail : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा दाम्पत्याला सत्र न्यायलयाने मोठा दिलासा आहे. सत्र न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केला आहे.  

Raigad :  उद्धव ठाकरे यांच्या कथित बंगल्यासंदर्भात किरीट सोमय्या याचिका दाखल करणार

Raigad : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित बंगल्यासंदर्भात किरीट सोमय्या याचिका दाखल करणार आहे.  कोर्लई कथित १९ बंगल्याबाबत याचिका दाखल करणार. किरीट सोमय्या यांनी आज  वकिलांशी वकीलाशी चर्चा केली. 

Amravati News : राणा दाम्पत्यांच्या भवितव्याचा आज फैसला, राणांच्या घराबाहेर कार्यकर्ते पोहोचले

Amravati News : रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या जामीन अर्जावर आज न्यायालयातून निर्णय घेणे अपेक्षित असून अमरावतीत त्यांच्या घरात काही कार्यकर्ते पोहोचले आहेत. त्यांच्या जामीन संदर्भात आज न्यायालय काय निर्णय देते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

चंद्रपुरात 50 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाच्या 3 अधिकाऱ्यांना अटक
Chandrapur News : 50 लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे 3 मोठे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. ब्रह्मपुरी इथे 50 लाखांची लाच स्वीकारताना चंद्रपूरचे प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे यांना काल रात्री अटक करण्यात आली. त्यांच्यासोबतच नागपूर इथून प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी कविजीत पाटील आणि चंद्रपूर येथून जलसंधारण कार्यालयाचे विभागीय लेखाधिकारी रोहित गौतम यांना देखील करण्यात आली अटक आहे. या प्रकरणात तक्रारदाराने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले होते आणि या कामाचं बिल काढण्यासाठी या तीनही अधिकाऱ्यांनी 81 लाखांची मागणी केली होती. श्रावण शेंडे यांना 50 लाखांची रक्कम स्वीकारताना नागपूर येथील ACB च्या पथकाने रंगेहात अटक केली. या तिन्ही अधिकाऱ्यांविरोधात ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
Pune News : मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतरही पुण्यात महाआरती करण्यावर ठाम

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर ही पुण्यात मनसे महाआरती करण्यावर ठाम आहे, मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे यांनी आजचा अल्टीमेटम दिलाय, या पार्श्वभूमीवर पुण्यात ठिकठिकाणी बंदोबस्त दिसून येत आहे,दरम्यान हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते महाआरती झालेल्या खालकर मारुती मंदिरात आज सकाळी 11 वाजता मनसेच्या वतीने महाआरती होणार आहे, महाआरती करण्यावर मनसे ठाम असली तरी काल ज्या पद्धतीने मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर आहे, त्यामुळे दिवसभरात मनसे कार्यकर्ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरेल. 

Navneet Rana : नवनीत राणा अद्याप जेजे रुग्णालयात दाखल नाही. मात्र स्पोंडिलिसिसचा त्रास असल्यास उपचार पद्धतीनुसार राणांवर उपचार होणार असल्याची माहिती

Navneet Rana : नवनीत राणा अद्याप जेजे रुग्णालयात दाखल नाही. मात्र स्पोंडिलिसिसचा त्रास असल्यास उपचार पद्धतीनुसार राणांवर उपचार होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ऑर्थोच्या इतर तक्रारी असतील तर त्यावर देखील तक्रारीनुसार उपचार करण्यात येणार असल्याची जेजे रुग्णालय प्रशासनाने दिली माहिती. 

Palghar : सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेन खाली लेकीसह आईने केली आत्महत्या; कारण अस्पष्ट

Palghar : पश्चिम रेल्वेच्या सफाळे व केळवेरोड दरम्यान मुंबईच्या दिशेने जाणारी सौराष्ट्र एक्स्प्रेस ट्रेन खाली लेकीसह आई ने आत्महत्या करण्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तृप्ती आरेकर असे आईचे नाव असून  जिमीशा आरेकर  मुलीचे नाव आहे. त्या पालघर पोफरण (अक्करपट्टी) येथील राहणारे आहेत. आत्महत्या केल्याच्या रेल्वे च्या बाजूला दुचाकी स्कुटी आढळून आली आहे. यावेळी घटनास्थळी सापडलेल्या आधार कार्ड व मोबाईलवरील फोटो वरुन ओळख पटली असून सफाळे रेल्वे पोलीस ठाण्यात  नातेवाईक पोहोचले आहेत. याबाबत आत्महत्येचे कारण अस्पष्ट झाले असून अधिक तपास सफाळे रेल्वे पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या काही काळ रोखून ठेवण्यात आल्या होत्या.

Pune-Mumbai : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात कंटेनर ट्रेलरचा अपघात

Pune-Mumbai : मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात कंटेनर ट्रेलरचा अपघात झाला आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कंटेनर ट्रेलर रस्त्यावरून खाली कोसळला. कंटेनर ट्रेलर पुलावरून सुमारे ३० फूट खाली कोसळला.ट्रेलरच्या अपघातात दोन प्रवासी जखमी, जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल.

Raj Thackeray : औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदींवर लावलेले भोंगे खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यानंतर मंगळवारी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सिटी चौक पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त करणे), 116 (तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि 117 (सार्वजनिक किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्तींना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील. 

Raj Thackeray : राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार

Raj Thackeray : लाऊडस्पीकरवरून अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एकीकडे सांगली न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही त्यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Hanuman Chalisa Loudspeaker Row : मशिदीवरील भोंग्यांविरोधात मनसेची 'हनुमान चालिसा'; पोलिसांकडून मनसैनिकांची धरपकड

Hanuman Chalisa Loudspeaker Row : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानंतर मनसैनिकांकडून भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. पहाटेच्या अजानवेळी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं आहे. मुंबईतील अनेक भागांत मनसैनिकांकडून मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. राज ठाकरेंनी दिलेला इशारा आणि आंदोलनामुळे रात्रीपासून राज्यभरात तगडा पोलीस बंदोबस्त आहे. तर अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. 


ठाण्यातील मनसैनिकांनी आज पहाटे झालेल्या अजानचा विरोध करत लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली. पहाटे 5.14 मिनटांनी ठाणे इंदिरा नगरमधील एका मशिदीवर अजान झाली. त्याचा विरोध म्हणून मनसे कार्यकर्ते पप्पू कदम यांनी या मशिदीच्या जवळच असलेल्या इंदिरा डोंगरावरच्या महालक्ष्मी मंदिरात भोंगा लावून हनुमान चालिसा पठण सुरू केलं. तर कल्याण डोंबिवलीमध्ये 50 हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस यंत्रणेकडून नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. काल रात्रीच्या सुमारास मनसेच्या 20 ते 25  कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. काल रात्रीपासूनच मशिद-मंदिर परिसरात पोलिसांची गस्त सुरू आहे. कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेच्या सुमारास अजान भोंग्याविना झाली. अजानसाठी लाऊडस्पीकर लावण्यात आले नव्हते. तसेच, नवी मुंबई- ऐरोलीजवळच्या जामा मशिदीसमोर हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करण्यात आला होता. हनुमान चालिसा पठणाचा प्रयत्न करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार


लाऊडस्पीकरवरून अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एकीकडे सांगली न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही त्यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदींवर लावलेले भोंगे खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यानंतर मंगळवारी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सिटी चौक पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त करणे), 116 (तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि 117 (सार्वजनिक किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्तींना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील.


राज ठाकरे अटकपूर्व जामीन याचिका दाखल करणार?


औरंगाबादमध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणी राज ठाकरे हे आपल्या वकिलांची टीमशी चर्चा करतील आणि त्यानंतर अटकपूर्व जामीन याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात.


राज ठाकरे यांच्याविरोधात 14 वर्षे जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी 


महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध 14 वर्षे जुन्या एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये, प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर आयपीसीच्या कलम 109 आणि 117 (गुन्हाला प्रोत्साहन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करून सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखाला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. सहाय्यक सरकारी वकील ज्योती पाटील यांनी सांगितले की, न्यायमूर्तींनी राज ठाकरे आणि दुसरे मनसे नेते शिरीष पारकर यांच्याविरुद्ध अनुक्रमे मुंबई पोलिस आयुक्त आणि खेरवाडी पोलिस ठाण्यात वॉरंट जारी केले होते. कारण ते खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिले नाही. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने पोलिसांना 8 जूनपूर्वी वॉरंट बजावण्याचे आणि दोन्ही नेत्यांना त्यांच्यासमोर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.


पालिकेची टीम आज राणा दाम्पत्याच्या खार येथील घराची पाहणी करणार 


हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे. प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे.


आरसीबी-चेन्नईकडे हरवण्याचा पर्यायच नाही


आयपीएल 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. चेन्नई सुपर किंग्जला आपल्या कमकुवत गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवायचा असेल तर त्याला आपल्या खराब फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. दोन्ही संघ खराब फॉर्मशी झुंजत आहेत. चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा काहीशा अबाधित आहेत. त्यांना कायम ठेवण्यासाठी संघाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसच्या  (Faf du Plessis)  नेतृत्वाखालील आरसीबीसाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.