Maharashtra Breaking News : चायनीज लोन अॅप्लिकेशन प्रकरणी ED ची छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Sep 2022 08:09 PM
Chinese Loan Application : चायनीज लोन अॅप्लिकेशन प्रकरणी ED ची छापेमारी, 17 कोटी रुपये जप्त

चायनीज लोन अॅप्लिकेशन प्रकरणी ईडीने मुंबईत चार ते पाच ठिकाणी छापेमारी केली असून यामध्ये पेटीएम अकाउंट फ्रिज करण्यात आलं आहे. या छापेमारीमध्ये तब्बल 17 कोटी रुपये जप्त करण्यात आलं असून आरोपी हे पैसे त्यांच्या पेटीएम अकाउंटमध्ये ठेवायचे. चायनीज लोन अॅप्लिकेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या मनी लॉंड्रिंगचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. 

कराडमध्ये विजेचा शॉक लागून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू 

कराडमध्ये विजेचा शॉक लागून आठ वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय. कराड तालूक्यातील सवादे -नाईकवाडी गावात ही घटना घडली आहे. मंडपात आरती सुरू 
विजेचा शॉक लागल्यामुळे अर्पिता शेवाळे या मुलीचा मृत्यू झाला आहे. 

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसह पिक विम्यासाठी शेकापचा दीड तास रास्ता रोको 

पावसा अभावी शेतकऱ्यांच्या पिकाच्या झालेल्या नुकसानीचे  पंचनामे करून तत्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आज माजलगाव परभणी रोडवर माटेगाव फाट्यावर दीड तास रास्ता रोको करण्यात आला.

Maharashtra News : मंत्रीमंडळाचा विस्तार 15 किवां 20 तारखेपर्यंत होईल, धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल : रामदास कदम
Maharashtra News : मंत्रीमंडळाचा विस्तार 15 किवां 20 तारखेपर्यंत होईल आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेनाच मिळेल, असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरेंचा फायदा अजितदादांनी घेतला आहे, असा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. तसेच, आदित्य आता सर्व गणपती फिरतोय. ही वेळ त्यांच्यावर आता का आली? त्याच आत्मपरीक्षण त्यांनी केले पाहिजे. आमदार,खासदार, मंत्री त्यांच्याकडे वेळ मागत होते तेव्हा त्यांच्याकडे वेळ नव्हता. पन्नास आमदार स्वतः कंटाळून बाजूला गेले नाहीतर सर्व संपले असते, ज्या पक्षाचा मुख्यमंत्री होता, त्याला 16 टक्के निधी आणि बाकीच्यांना जास्त निधी, असंही रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 
 
 

 Maharashtra Breaking News : पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल महाराष्ट्र  पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात पोहोचले, राज्यातील सर्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी उपस्थित, इंटेलिजन्स विभागातील अधिकाऱ्यांनाही बोलावलं

 Maharashtra Breaking News : पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल महाराष्ट्र  पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात पोहोचले, राज्यातील सर्व वरिष्ठ आयपीएस अधिकारी उपस्थित, इंटेलिजन्स विभागातील अधिकाऱ्यांनाही बोलावलं

कोल्हापूर : ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतले जोतिबा, अंबाबाईचे दर्शन

कोल्हापूर दौऱ्यावर असलेले केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी जोतिबा डोंगरावर जोतिबा दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूरमध्ये अंबाबाईचे दर्शन घेतले. या ठिकाणी दर्शन घेण्याची संधी मिळणे हे आपल्यासाठी सौभाग्याचे असल्याचे यावेळी ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. ही माझ्या अस्तित्वाची माती असून माझे कौटुंबिक संबध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिंदे महाराज यांची विचारधारा या मातीत येऊन पुढे घेऊन जाण्याचा संकल्प आज केल्याचे त्यांनी नमूद केले. 





मुख्यमंत्री यांच्याशी 45 मिनिटं चर्चा केल्यानंतर अजित डोवाल वर्षावरुन बाहेर पडले, थोड्याच वेळात पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेणार

मुंबई दौऱ्यावर असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थोड्याच वेळात पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली..


 


 

देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी कोरोना पॉझिटिव्ह

Ashok Chavan : सध्या ज्या बातम्या सुरु आहेत त्यामध्ये काहीचं तथ्य नाही - अशोक चव्हाण

सध्या ज्या बातम्या सुरु आहेत त्यामध्ये काहीचं तथ्य नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चा यामध्ये काही तथ्य नाही. उद्या काँग्रेसची महागाई विरोधी महारॅली आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीला जात आहे. यासोबतच राहुल गांधी यांचा भारत जोडो अभियान या संदर्भातल्या मीटिंगमध्ये देखील मी सहभागी होणार आहे. याच नियोजन आज आम्ही करू. मी सध्या दिल्लीत पक्षाच्या कामासाठी जात आहे. माध्यमांद्वारे ज्या काही बातम्या सुरू आहेत. या चुकीचा विपर्यास करण्याचा प्रयत्न होतो आहे. गणपतीत कोणाच्या घरी जाणं यामध्ये काहीचं गैर नाही. गणपतीत सर्वच सर्वांच्या घरी जात असतात. आमची जी भेट झाली त्यामध्ये राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची आम्ही केलेली नाही.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व पोलाद मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांचे विमानतळावर आगमन होताच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्वागत केले. त्यानंतर ते जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले. तेथील दर्शनानंतर अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात दाखल झाले आहेत. 


वरळीच्या महाराजाला 30 तोळ्यांचा हार अर्पण

वरळीतील प्रसिद्ध गणेश सेवा मंडळाचं यंदा १०० वं वर्ष आहे, वरळीचा महाराजा म्हणून हा गणपती ओळखला जातो दरवर्षी विविध उपक्रमांनी हे मंडळ चर्चेत असतं यंदा शतकमहोत्सवानिमित्तानं या मंडळानं बाप्पाला 30 तोळ्यांचा हार अर्पण केला आहे ज्याची किंमत 15 लाखांपेक्षा जास्त आहे माजी नगरसेवक आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकरांच्या हस्ते हा हार अर्पण करण्यात आला

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थोड्याच वेळात पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेणार

मुंबई दौऱ्यावर असणारे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार थोड्याच वेळात पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली..

पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवाल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट, बैठकीनंतर डोवाल राजभवनाकडे रवाना
संपाच्या काळात वेगवेगळ्या एजन्सीमार्फत एसटी महामंडळात घेतलेल्या 800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

संपाच्या काळात वेगवेगळ्या एजन्सीमार्फत एसटी महामंडळात घेतलेल्या 800 कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता, एक महिना करार पद्धतीवर प्रत्येक जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, आवश्यकता संपल्यामुळे पुन्हा करार करण्यात आले नसल्याची एसटी महामंडळाची माहिती, संप काळापासून काल अखेर पर्यंत एक महिना करार पद्तीवर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या

पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल यांनी घेतली राज्यपालांची भेट

पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित कुमार डोवल यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.





नासा मून रॉकेट लाँच करणार

नासा (NASA) शनिवारी ताकदवर मून रॉकेट (Moon Rocket) लाँच करणार आहे. शनिवारी दुपारी  फ्लोरिडा येथील कॅनिडी स्पेस सेंटरमधून (Kennedy Space Center) दोन वाजून 17 मिनिटांनी मून रॉकेट अवकाशात भरारी घेईल. दरम्यान, याआधी तांत्रिक कारणामुळे लाँचिंग रोखण्यात आलं होतं.

Amit Shah Kerala Visit Today : गृहमंत्री अमित शाह केरळ दौऱ्यावर

Amit Shah Kerala Visit Today : केंद्रीय गृहमंत्री शनिवारी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. ते दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. पाणीवाटप, किनारपट्टी सुरक्षा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगाना राज्य सहभागी होणार आहेत.

Jammu Film Festival : आजपासून सुरू होणार दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव

Jammu Film Festival : दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव  3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. 15 देशांतील 54 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

Arvind Kejriwal Gujarat Rally : अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर

Arvind Kejriwal Gujarat Rally : आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे 'होमपिच' असलेल्या गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज  गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. 

पार्श्वभूमी

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...


अरविंद केजरीवाल गुजरात दौऱ्यावर
आम आदमी पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे 'होमपिच' असलेल्या गुजरातवर लक्ष केंद्रीत केले आहे. आपचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आज  गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. 


आजपासून सुरू होणार दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव  
दुसरा जम्मू चित्रपट महोत्सव  3 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.  15 देशांतील 54 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहे. 


गृहमंत्री अमित शाह केरळ दौऱ्यावर 
केंद्रीय गृहमंत्री शनिवारी केरळ दौऱ्यावर जाणार आहेत. ते दक्षिण प्रादेशिक परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. पाणीवाटप, किनारपट्टी सुरक्षा आणि इतर महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, तेलंगाना राज्य सहभागी होणार आहेत.


नासा मून रॉकेट  लाँच करणार 
 नासा (NASA) शनिवारी ताकदवर मून रॉकेट (Moon Rocket) लाँच करणार आहे. शनिवारी दुपारी  फ्लोरिडा येथील कॅनिडी स्पेस सेंटरमधून (Kennedy Space Center) दोन वाजून 17 मिनिटांनी मून रॉकेट अवकाशात भरारी घेईल. दरम्यान, याआधी तांत्रिक कारणामुळे लाँचिंग रोखण्यात आलं होतं.


आशिया चषक सुपर 4 फेरीला सुरुवात 
हाँगकाँगचा तब्बल 155 धावांनी पराभव करत पाकिस्तान संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. शनिवारपासून आशिया चषकातील सुपर 4 फेरीला सुरुवात होत आहे. अफगाणिस्तान, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान संघानं सुपर 4 मध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.