Maharashtra Breaking News 03 May 2022 : नाशिक शहरातील 100 हून अधिक मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस  बजवल्या

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 May 2022 11:04 PM
Satara News Update : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील सुरवडी येथे कारचा अपघात, दोन ठार, 11 जण जखमी

सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यामधील सुरवडी येथे कारचा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. फलटण-लोणंद रस्त्यावर सुरवडी येथे तवेरा आणि इंडिगो गाडीची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातातील मृत मान तालुक्यातील वळई गावचे रहिवासी आहेत. सचिन काळेल आणि शुभम केवटे अशी मृतांची नावे असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 
 

Raj Thackeray : नाशिक शहरातील 100 हून अधिक मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस  बजवल्या

Raj Thackeray : नाशिक शहरातील 100 हून अधिक मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीस  बजवल्या आहेत.  विना परवानगी भोंग्यावर हनुमान चालीसा पठण केल्यास  होणार कारवाई करण्यात येणार आहे. दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईचा  इशारा दिला आहे.  हजारो पोलिसांचा बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे

Raj Thackeray : जबाब नोंदवण्यासाठी जाण्याच्या बातम्या तथ्यहीन : राज ठाकरे

Raj Thackeray : पोलिसांकडून कुठलीही नोटीस आलेली नाही', राज ठाकरेंनी एबीपी माझाला माहिती दिली आहे. जबाब नोंदवण्यासाठी जाण्याच्या बातम्या तथ्यहीन असल्याचे देखील ते म्हणाले. 

MUmbai crime news : मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक सेलकडून 71 किलो गांजासह तिघांना अटक 

MUmbai crime news :  मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नार्कोटिक सेलच्या आझाद मैदान युनिटने तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून 14.35 लाख रुपये किमतीचा 71 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी सिन्नर, नाशिक येथे छापा टाकून मुख्य पुरवठादार गणेश गोळेसर याला नाशिक येथून अटक केली आहे. अजीम सय्यद (वय 28 ) आणि राकेश निमोणकर ( वय 34 ) अशी इतर दोन आरोपींची नावे आहेत. 

गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा बाल्कनी निवांत

गुन्हा दाखल झाल्यानंतर राज ठाकरे पहिल्यांदा बाल्कनीत दिसून आले आहेत. 

Kolhapur News Update : उसने पैसे परत देत नसल्याच्या रागातून एकाला पेट्रोल टाकून पेटवलं, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील घटना

Kolhapur News Update : उसने पैसे परत देत नसल्याच्या रागातून एकाला पेट्रोल टाकून पेटवलंवण्यात आलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामधील आलास येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत दगडू तकडे हा तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी कर्नाटकातील एका विरोधात कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

Maharashtra News : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल

Maharashtra News : छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली आणि तिचा शोध महात्मा फुलेंनी  घेतला ; श्रीमंत कोकाटे  

Maharashtra News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे इतिहासाची मोडतोड करत असून त्याला आमचा आक्षेप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असून तिचा शोध महात्मा फुले यांनी घेतला आहे. शिवाजी महाराजांची मुद्रा कोणत्याही राजकीय पक्षाने वापरु नये. जबाबदार नेत्याने अभ्यासपूर्ण बोलायला हवे, जातीजातींमध्ये तेढ निर्माण करणे हे लोकनेत्याचं लक्षण नव्हे.  
राज ठाकरे हे बाबासाहेब  पुरंदरे, लोकमान्य टिळक यांचं समर्थन करतात, यातून त्यांची आयडॉलॉजी स्पष्ट होते. राज ठाकरे पुरंदरे प्रेमात अडकले आहेत. त्यांना इतर काही समजून घाययचे नाही. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचा एक दगड ही बांधला नाही. याउलट शिव स्मारकासाठी गोळा केलेला निधी स्मारकाच्या कामासाठी वापरला नाही. राज ठाकरे जातीयवादी आहेत त्यामुळे टिळक आणि पुरंदरे यांचे समर्थन करतात. 

Maharashtra News : राज ठाकरेंवर कारवाई आवश्यक वाटल्यास आयुक्त कारवाई करतील : पोलीस महासंचालक

Maharashtra News : औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांनी राज ठाकरेंच्या भाषणाचे विश्लेषण केलं असून, नियमानुसार जे काही करता येईल ते करू. तसेच जी कारवाई केली जाईल, ती आजच केली जाईल असं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगितलं. 

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका : पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांचं आवाहन

Mumbai News : कोणीही कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेतल्यास कारवाई केली जाईल. राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका, राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी हे आवाहन केलं आहे. गृहमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलीस महासंचालक म्हणाले की, "कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सज्ज आहे. सीआरपीएफच्या 87 कंपनी आणि 30 हजारांपेक्षा जास्त होमगार्ड तैनात आहेत. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. कर्मचारी आणि अधिकारी रस्त्यावर आहेत."

गडचिरोलीत - भामरागडमधील डोडराज पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक पोलीस जखमी

Gadchiroli News : गडचिरोलीमध्ये पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरु आहे. या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्याला हेलिकॉप्टरमधून तात्काळ नागपूरला हलवल्याची माहिती मिळाली आहे. भामरागड तालुक्यातील डोडराज पोलीस मदत केंद्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात ही चकमक सुरु आहे. अतिदुर्गम भाग असल्याने संपर्क होणं देखील कठीण आहे. डोडराज परिसरात नक्षल विरोधी अभियान राबवत असताना चकमक झाली. अजूनही त्या भागात चकमक सुरु असल्याची माहिती मिळली आहे.

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर ते मुंबई असा शाहू विचार जागर यात्रेचं आयोजन

Kolhapur News : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूर ते मुंबई असा शाहू विचार जागर यात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे. शाहू महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती, यांच्या प्रमुख उपस्थितीत ही यात्रा शिवाजी पेठ इथून निघाली आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे-मुंबई असा या यात्रेचा प्रवास असणार आहे. 5 मे रोजी ही यात्रा कामाबाग चौक गिरगाव इथल्या राजर्षी शाहू स्मृती स्तंभाजवळ पोहोचणार आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर 5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका, पुढची राजकीय दिशा जाहीर करणार

Prashant Kishor News : निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर 5 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका, पुढची राजकीय दिशा जाहीर करणार आहेत. बिहारमधल्या पाटण्यात 5 तारखेला सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. स्वतःचा पक्ष की इतर कुठली राजकीय भूमिका याबद्दल सुरु असलेल्या चर्चांना उत्तर देणारी ही पत्रकार परिषद असेल.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची थोड्याच वेळात डीजी कार्यालयात बैठक, राज ठाकरे यांना 149 ची नोटीस द्यायची की नाही यावर चर्चा होण्याची शक्यता

Mumbai News : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची थोड्याच वेळात डीजी कार्यालयात बैठक सुरु होईल. शिराळा कोर्टाच्या नोटीस संदर्भातही बैठकीत चर्चा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना 149 ची नोटीस द्यायची की नाही यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासोबत संध्याकाळी बैठक होणार आहे. आज ईद असल्याने मुंबई पोलीस आयुक्तांना या बैठकीला बोलवण्यात आलेलं नाही.

राज ठाकरेंचं शिवरायांबद्दलचं वक्तव्य इतिहासाला धरून नाही, संभाजीराजे छत्रपतींची टीका

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य इतिहासाला धरून नसल्याचं म्हणत त्यांच्यावर टीका केली आहे. शिवरायांची समाधी टिळकांनी बांधल्याचा दावा राज ठाकरे यांनी केलाय. यावर संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेचा कार्यकाळ आज संपणार आहे.





Nawab Malik : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल

Nawab Malik : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल, सोमवारी (2 एप्रिल) सकाळी रक्तदाब कमी झाल्यानं रुग्णालयात दाखल, जेजे रुग्णालय प्रशासनानं एबीपी माझाला दिली माहिती





नवरदेवाचे अनैतिक संबंध माहित पडताच नवरीकडच्यांची पोलिसात तक्रार, हळद लावलेल्या नवरदेवाची पोलिसांनी काढली वरात

Buldhana News : लग्न ठरलं... साखरपुडा झाला... पण ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी नवरदेवाचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे नवरीला पुराव्यानिशी माहित पडलं आणि नवरीने याबाबत फोनवरुन जाब विचारताच चिडलेल्या नवरदेवाने नवरीच्या घरी येऊन राडा केला. यानंतर नवरीच्या आईने फसवणुकीची तक्रार केल्यानंतर मलकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करत हळद लावलेल्या नवरदेवाची वरात काढल्याची घटना घडली. अमोल पारेकर अस नवरदेवाचं नाव असून तो मोताळा तालुक्यातील बोराखेडी येथील आहे. सुरत इथे भारतीय रेल्वेत तो मोटरमन म्हणून नोकरीला आहे. पोलिसांनी अमोल पारेकर याला न्यायालयासमोर उभं केलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

Akshaya Tritiya 2022 : अक्षयतृतीयेनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य

Akshaya Tritiya 2022 : अक्षयतृतीयेनिमित्त पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात बाप्पांना 11 हजार आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला आहे. या आंब्यांची सुरेख आकर्षक रचना करून बाप्पाच्या चरणी मांडणी करण्यात आली आहे. पुण्यातील आंब्याचे व्यापारी देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने दरवर्षी अक्षयतृतीयेनिमित्त हा आंब्याचा महानैवेद्य दाखवण्यात येतो. हे आंबे उद्यापासून मधील रुग्ण, अनाथाश्रम, वृद्ध आश्रम, दिव्यांग आणि भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येणार आहे. आंब्यांची ही आरास पाहण्यासाठी भाविकांनी आज सकाळपासूनच गर्दी केली होती. 

EID 2022 : देशभरात ईदचा उत्साह

EID 2022 : आज देशभर ईदचा सण आज साजरा केला जाणार आहे. ईद हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा सण आहे. मुस्लिम समाज 30 दिवस उपवाचा उपवास आज सोडून ईदचा सण साजरा करेल. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा ईदच्या दिवशी अलर्ट राहिल. समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्यासह अनावश्यक गर्दी जमू देऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आपापल्या जिल्ह्यात गस्त घालणार आहेत. 

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार

PM Modi : तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार आहेत. तेथे ते दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये थोड्या वेळासाठी थांबतील. तेथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.




 


Maharashtra News : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत गृहमंत्र्यांची आढावा बैठक

Maharashtra News : महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि DGP सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहमंत्री घेणार बैठक


महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि DGP सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे.


नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार
तीन देशांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डेन्मार्कला भेट देणार आहेत. तेथे ते दुसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होतील. दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यावर पंतप्रधान मोदी फ्रान्समध्ये थोड्या वेळासाठी थांबतील. तेथे ते फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.


देशभरात ईदचा उत्साह 
आज देशभर ईदचा सण आज साजरा केला जाणार आहे. ईद हा मुस्लिम बांधवांसाठी आनंदाचा सण आहे. मुस्लिम समाज 30 दिवस उपवाचा उपवास आज सोडून ईदचा सण साजरा करेल. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कठोर भूमिकेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांचा ईदच्या दिवशी अलर्ट राहिल. समाजकंटकांवर विशेष लक्ष ठेवण्यासह अनावश्यक गर्दी जमू देऊ नये यासाठी सर्व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आपापल्या जिल्ह्यात गस्त घालणार आहेत.


चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात
डेहराडूनमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्री मंदिरांचे दरवाजे आज उघडले जाणार आहेत. उद्या म्हणजे अक्षय्य तृतीयेपासून चारधाम यात्रा सुरू होणार आहे. केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी उघडतील, तर बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे 8 मे रोजी उघडतील.


अक्षय्य तृतीया आणि परशुराम जयंती
आज अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. आज परशुमाम जयंती आहे. या निमित्ताने मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान भोपाळमध्ये भगवान परशुराम यांच्या सर्वात मोठ्या मुर्तीचे अनावरण करणार आहेत.  


सर्वात उंच राम मंदिराचे बांधकाम आजपासून सुरू होणार
जगातील सर्वात उंच राम मंदिराचे बांधकाम आजपासून सुरू होणार आहे. पूर्व चंपारणच्या केसरिया ब्लॉकमध्ये असलेल्या कैथवालियामध्ये हे मंदिर बांधले जाणार आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज बेंगळुरू दौऱ्यावर आहेत. ते येथे चार सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेणार आहेत.   


गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडणार 
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 49 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज एकमेकांशी भिडणार आहेत. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. तर, अर्धातासपूर्वी नाणेफेक होणार आहे. उद्याचा सामना पंजाबच्या संघासाठी महत्वाचा असणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.