Maharashtra Breaking News 02 May 2022 : रवी राणाच्या मुंबईच्या फ्लॅटवर मुंबई महापालिकेची नोटीस

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 May 2022 11:05 PM
रवी राणाच्या मुंबईच्या फ्लॅटवर मुंबई महापालिकेची नोटीस

आमदार रवी राणा यांच्या मुंबईच्या खारमधील फ्लॅटमध्ये अवैध बांधकाम असल्याचा आरोप करून मुंबई महापालिकेकडून या फ्लॅटचं चार मे रोजी मोजमाप करण्यात येईल अशी नोटिस पाठवण्यात आली आहे.

Kalyan News Update : आज मध्यरात्री पासून उद्या सकाळी 11 पर्यंत गोविंदवाडी बायपास वाहतुकीसाठी बंद, कल्याणमधील वाहतुकीत बदल 

कल्याणमधील दुर्गाडी चौक येथे रमजान ईदनिमित्त रस्त्यावर नमाज पठणाचा कार्यक्रम मुस्लिम समाजातर्फे केला जातो. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक पोलिसांनी आज मध्यरात्रीपासून उद्या नमाज पठण होईपर्यंत म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत नमाज पठणाच्या वेळी गोविंदवाडी बायपास वाहतूकिसाठी बंद ठेवला आहे. गोविंदवाडी बायपास रस्ता ते दुर्गामाता चौकाकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. या कालावधीत सर्व प्रकारची अवजड वाहने, बहुचाकी वाहनांना कल्याण शहरातून प्रवेश बंद करण्यात येणार आहे.  

एमपीएससी पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक 2 केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाणार

MPSC Exam :  एमपीएससी पूर्व परीक्षा 2022 पासून प्रस्तुत परीक्षेतील पेपर क्रमांक 2 (CSAT - CIVIL SERVICE APTITUDE TEST) हा केवळ पात्रतेसाठी (म्हणजे या मध्ये किमान 33 टक्के गुण )ग्राह्य धरले जाणार आहे.  याआधी GS (general studies) आणि CSAT ह्या दोन्ही पेपरच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी जाहीर होत होती. आता मात्र, यामध्ये बदल करत पेपर 2 हा फक्त पात्रतेसाठी ग्राह्य धरला जाणार आहे. याबद्दल या व्यतिरिक्त राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेच्या स्वरूपात अन्य कोणताही बदल सद्यस्थितीत केलेला नाही.

ajit pawar : संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस  घालण्यासाठी अक्कल लागतन नाही ; अजित पवारांचा राज ठाकरेंवर निशाणा 

ajit pawar :  लोकांच्या मनात जे विष कालवत आहेत त्यांनी एखादी संस्था, एखादा कारखाना उभा केला आहे का? असा प्रश्न विचारत, संसार उभा करण्यासाठी अक्कल लागते, धुडगूस  घालण्यासाठी अक्कल लागत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला आहे.  

 Nashik News update : येवला येथील शिवसृष्टी प्रकल्पाचे उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन 

 Nashik News update : अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवसृष्टीचे येवला शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते भूमिपूजन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व शिवरायांच्या जीवनावरील ऐतिहासिक घटनांचे म्युनरल्सद्वारे शिवसृष्टी उभारण्यात येत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या या  प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांचा ब्रांझ धातूचा सिंहासनाधिष्टीत मेघडंबरीसह पूर्णाकृती पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावरील ठळक घडामोडी व महाराजांच्या सेनापतींचे चित्रशिल्प भित्तीचित्रे, ऑडिओ व्हिडीओ हॉल, शिवकालीन शस्रारांचे प्रदर्शन, पुस्तक व साहित्य विक्री केंद्र, माहिती केंद्र आणि कार्यालय, किल्ले स्वरूपाचे प्रवेशद्वार व अनुषंगिक मांडणी, वाहनतळ, शिवसृष्टी आवारात उद्यान, टप्पे स्वरूपातील कारंजे व सुशोभीकरणाच्या अनुषंगिक बाबी यात असणार आहेत. यासाठी सहा कोटींचा निधी मंजूर झाला असून दोन एकर जागेत शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. 

पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन

पुण्यातील अलका चौकात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन  करण्यात आले आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न थेट रद्द वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे.

Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत यांनी बाबरी मशीदवर बोलणे म्हणजे हलकटपणाचा कळस : नितेश राणे

Nitesh Rane On Sanjay Raut : संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या भाषणावर टीका केली आहे. संजय राऊत यांनी बाबरी मशीदवर बोलणे म्हणजे हलकटपणाचा कळस आहे.  जेव्हा बाबरी मशीद तोडली तेव्हा तुम्ही सामनाचा पगार तरी घेत होता का?  तेव्हा तुम्ही लोकप्रभामध्ये लिहीत होता. संजय राऊत यांनी रामाची राजकीय फरफट असे आर्टिकल लिहिलं आणि तोच संजय राऊत बोलत असेल तर हा हलकटपणाचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे

Pune News Update : पुण्यातील वानवडीमध्ये स्लॅब कोसळून पाच मजूर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर 

पुण्यातील वानवडीमध्ये स्लॅब कोसळून पाच मजूर जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर दौंडमधील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा

Pune News : औरंगाबाद या ठिकाणी झालेल्या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टिमेटमनंतर 16 वर्षांपासून पक्षात कार्यरत असलेले दौंड शहरातील मनसेचे शहराध्यक्ष जमीर सय्यद यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा मनसेचे राज्य उपाध्यक्ष सुधीर पाटसकर यांच्याकडे सोपवला आहे. जमीर सय्यद हे गेल्या तीन वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष पदावर कार्यरत होते. हनुमान चालीसा आणि भोंग्याचा राजकारणामुळे मनसेमधील मुस्लीम कार्यकर्ते राजीनामा देत आहेत.

नवाब मलिक यांच्या जामिनाला ईडीचा विरोध, वैद्यकीय कारणास्तव मलिकांनी दाखल केला आहे जामीन अर्ज- ED

नवाब मलिक यांच्या जामिनाला ईडीचा विरोध, वैद्यकीय कारणास्तव मलिकांनी दाखल केला आहे जामीन अर्ज

राणा दाम्पत्याच्या निकालावर संध्याकाळी 5 च्या सुमारास निकाल येणं अपेक्षित

राणा दांपत्याच्या निकालावर संध्याकाळी 5 च्या सुमारास निकाल येणं अपेक्षित आहे.


त्यामुळे आज जामीन मंजूर जरी झाला तरी दोघांची जेलमधून सुटका होणं कठीण


कारण आरोपीची सुटका करण्याचे कोर्टाचे निर्देश ठराविक वेळेत जेलबाहेरच्या लेटर बॉक्समध्ये पडण अपेक्षित


याशिवाय जामीनातील अटीशर्तींची पूर्तताही आरोपींकडनं होणं आवश्यक

शालेय शिक्षण विभागाच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजवणी करण्याचे आदेश

शालेय शिक्षण विभागाच्या 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजवणी करण्याचे आदेश विभाग स्तरावर शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी दिले आहेत


मुंबई पुणे ठाणे रायगड पालघर या विभागातील शाळांसाठी आदेश देण्यात आला आहे


12 ऑगस्ट 2021 रोजी शालेय शिक्षण विभागाने 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी 15 टक्के कपातीचा निर्णय घेतला होता


मात्र या विरोधात शाळा संस्थाचालक न्यायालयात गेल्याने अनेक शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही


आता पुन्हा एकदा शिक्षण विभागाच्या विविध विभाग पंधरा टक्के पीक कपातीची अंमलबजावणी करावी व ज्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे भरली आहे त्यांना पुढील वर्षीच्या फी मध्ये समायोजित करावी , अशा प्रकारचे परिपत्रक जारी केले आहे

कोल्हापुरातील भोंग्यांचं देशभर कौतुक.

Kolhapur News : राज्यात एका बाजूला भोंग्यावरुन वाद सुरु आहे. तर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं कोल्हापुरातल्या प्रत्येक चौकात आणि गाव खेड्यात उभारलेले भोंगे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. हे भोंगे मंदिर आणि मशिदीच्या दारातही आहेत. जिल्ह्यात आपत्कालीन घटना घडल्यास या भोंग्यांवरुन तात्काळ संदेश लोकांपर्यंत पोहोचवला जातो. तर जातीय सलोखा आणि नागरिकांमध्ये जनजागृतीही केली जात आहे. देशातील पहिलीच सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कोल्हापुरात राबवली जात असल्याने तिचं कौतुकही होत आहे.

CET Exam Date : उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सीईटी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

CET Exam Date :  उच्च व तंत्र शिक्षण विभाग करून घेतल्या जाणाऱ्या सीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. नीट परीक्षा त्यासोबतच जेईई परीक्षा यांच्या तारखांचा विचार करून या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता त्याचा सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. 

बेकायदा होर्डिंग आणि बॅनरबाजीविरोधात काय कारवाई केली?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

राज्याभरातील बेकायदेशीर होर्डिंगचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर


बेकायदा होर्डिंग आणि बॅनरबाजीविरोधात काय कारवाई केली?, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल


13 जूनपर्यंत प्रतिज्ञापत्रावर राज्यातील सर्व महापालिका आणि नगरपालिकांना अहवाल सादर करण्याचे निर्देश


सर्व महत्त्वाच्या राजकीय पक्षांना नोटीस देण्याचे मूळ याचिकाकर्त्यांना निर्देश


हमी देऊनही राजकीय पक्ष त्याची अंमलबजावणी करत नसल्याची हायकोर्टात तक्रार


बेकायदा होर्डिंग, बॅनरविरोधात सामान्य नागरिकांना तक्रार देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा असणं आवश्यक - हायकोर्ट

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 23 मे रोजी होणार 

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुखांचे पुत्र ऋषिकेश देशमुख यांच्या  अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात 23 मे 2022 रोजी होणार 


देशमुखांविरोधातील आरोपपत्रात ऋषिकेश देशमुख यांचही नाव असल्यानं त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी केला आहे अर्ज

Pune MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्या पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उद्या पुण्यात होणारा महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आलाय.  मनसे, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी एकत्र येऊन तीन मे रोजी पुण्यातील सर्व प्रमुख मंदीरांमधे भोंगे लाऊन आरती करण्यात येईल असं शनिवारी जाहीर केलं होतं. त्यासाठी मनसेच्या सर्व विभागप्रमुखांना त्यांच्या त्यांच्या भागांमधे महाआरतीचे आयोजन करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या.  मात्र आता मनसेकडून  महाआरतीचा कार्यक्रम स्थगित करण्यात आलाय.  दुसरीकडे *मनसेच्या कार्यकर्त्यांची माहिती गोळा करण्याच काम पोलीस खात्याने सरु केलय.  मनसे कार्यकर्त्यांना त्यांच्या राहण्याचा पत्ता, शाखेच्या कार्यालयाचा पत्ता आणि इतर माहिती पोलिसांकडून विचारली जातेय.  त्याचबरोबर मनसेच्या  काही शाखांवर जाऊनही पोलीस चौकशी करतायत.

खासगी रुग्णालयात उपचार आणि घरचं जेवण, अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर 4 मे रोजी सुनावणी

Mumbai News : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या दोन्ही अर्जांवर 4 मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत निर्णय होणार आहे. खासजी रुग्णालयात उपचार आणि घरच्या जेवणासाठी अनिल देशमुख यांनी अर्ज केला होता. अनिल देशमुखांचा वैद्यकीय अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयाने जेजे रुग्णालयाला दिले आहेत.

वर्धा नगरपरिषद कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संपावर
Wardha News : वर्धा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला असून प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग आहे. आजपासून कार्यालयातील सर्व कर्मचारी आक्रमक भूमिकेत दिसून आले. कर्मचारी यांचे वेतन कोषागारामार्फत करणे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांचे समावेश न करणे, सफाई कामगारांना मोफत घरे बांधून देणे, संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रश्न अतितात्काळ सोडवणे. DCPS आणि NPS योजना शासकीय कर्मचार्या प्रमाणे लागू करणे व इतर १९ मागण्या या संपाच्या माध्यमातून  रेटून धरल्या आहेत. आपल्या विविध प्रलंबित मागण्या घेऊ नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सतत आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो, त्यामुळे मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली.
Anil Deshmukh News : जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे मागितली परवानगी

Anil Deshmukh News : जेजे रुग्णालयात उपचारासाठीच्या सुविधा अपुऱ्या, खाजगी रुग्णालयात उपचारासाठी अनिल देशमुखांनी कोर्टाकडे मागितली परवानगी


जेजे हॉस्पिटलकडून यावर अहवाल आल्यावर निर्णय घेऊ - कोर्ट


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज कोर्टात आपल्या आजारांबद्दल स्वतः न्यायाधीशांना माहिती दिली


अनिल देशमुख यांना खांदेदुखी असून -हदय विकाराची समस्या असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं


अनिल देशमुखांच्यावतीनं घरचे जेवण मिळावं म्हणून कोर्टाकडे अर्ज दाखल


खाजगी रूग्णालयात उपचार घेण्यासंदर्भात ईडीनं उत्तर देण्यास वेळ मागितला आहे


मात्र घरच्या जेवणासाठी ईडीचा विरोध नाही 


कोर्टानं याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा - ईडी

कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नाहीत : कृषीमंत्री दादाजी भुसे 

Dadaji Bhuse: बियाणे आणि खते  केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. 45 लाख मेट्रिक टन खत मिळणार असल्याची माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.  याला केंद्र सरकारने तत्वता मान्यता दिली आहे.  त्यामुळे कोणालाही बियाणे, रासायनिक खते कमी पडणार नसल्याचे भुसे म्हणाले. कृषी योजनांचा 50 टक्के लाभ महिलांना मिळणार आहे. लक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांचे नाव सातबाऱ्यावर लागणार आहे. 

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज ईडीतर्फे 2.30 वाजता उत्तर दाखल करण्यात येणार

Nawab Malik News Updates : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांच्या वैद्यकीय जामीन अर्जावर मुंबईतील विशेष न्यायालयात आज ईडीतर्फे 2.30 वाजता उत्तर दाखल करण्यात येणार


मुत्राशयाच्या विकारावर तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे 


मलिक यांनी वैद्यकीय आधारावर हा जामीन अर्ज दाखल केला आहे

Maharashtra News : राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला, दुपारी 2.45 वाजता निर्णय

Amravati News : राणा दाम्पत्यांच्या सुटकेसाठी गजानन महाराजांची आरती आणि 21 पारायणाचे पाठ

Amravati News : राणा दाम्पत्यांच्या सुटकेसाठी गजानन महाराजांची आरती आणि 21 पारायणाचे पाठ.


आरतीला सुरुवात


राणा दाम्पत्याच्या जामिनावर आज मुंबई सत्र न्यायालयात निकाल येईल. "जेल की बेल" याचा निर्णय आज होईल. 


यावेळी राणा दाम्पत्यांची तुरुंगातून सुटका व्हावी यासाठी युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमरावती येथील गजानन महाराज मंदिरात आरती आणि 21 पारायनाचे पाठ वाचण्यात येणार आहे.


काही तासातच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची सुटका होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...

मुंबईतील सीएसएमटी स्टेशनसमोर मनसेचं 'चला आयोध्या' असं पोस्टर

Mumbai News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे 5 जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्टेशनसमोर 'चला अयोध्या' असं पोस्टर लावत मनसेकडून अयोध्याला येण्याचं आवाहन करण्यात येत आहे. काल महाराष्ट्र दिन होता आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून सत्यनारायण महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. 

चंद्रपूरमध्ये दुर्गापूर इथे घरात घुसून बिबट्याचा हल्ला, 47 वर्षीय महिलेचा मृत्यू

Chandrapur News : चंद्रपूर शहरालगतच्या दुर्गापूर येथे पुन्हा एकदा झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात घरकाम करत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला. दुर्गापूरच्या वॉर्ड क्र. 3 मधील दिल्ली मोहल्ला येथील या घटनेने खळबळ उडाली आहे. गीता विठ्ठल मेश्राम असे या 47 वर्षीय मृत महिलेचे नाव आहे. रात्री 12 वाजता झालेल्या या घटनेत घरातच बिबट्याने नरडीचा घोट घेतल्याने दहशतीचे वातावरण आहे. वनपथक आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक तपास सुरु केला आहे. या दुर्गापूर-उर्जानगर भागात वाघ-बिबट्यांचे सातत्याने हल्ले होत असून बिबट्याच्या हल्ल्यातला गेल्या 3 महिन्यातला हा तिसरा मृत्यू आहे, वनविभागाने याआधी केलेल्या कारवाईत एक वाघ आणि एक बिबट जेरबंद केला होता. या परिसराला लागून वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या कोळसा खाणी आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बाह्य क्षेत्रातून खाणीच्या विस्तीर्ण क्षेत्रातून प्रवास करत वन्यजीवांचा या परिसरात प्रवेश होतो. वाघ-बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पुढे रेटली जात आहे.

राज ठाकरे यांच्या सभेनंतर गृह खातं अॅक्टिव्ह मोडमध्ये,गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची आज वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह बैठक

राज ठाकरे यांच्या सभेनंतर गृह खातं अॅक्टिव्ह मोडमध्ये


गृहमंत्री दिलीप वळसे पाटील वरिष्ठ पोलिस अधिकारी समवेत बैठक घेणार 


राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसच ईद सण असल्याने राज्सात आढावा घेतला जाणार 


वळसे पाटील आज रात्री उशीरा बैठक घेण्याची शक्यता 


राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राज्यातील संवेदनशील भागात घ्यायची काळजी या संदर्भात ही गृह मंत्रालय सूचना करणार

Ratnagiri News : रत्नागिरी : जयगड-निवळी मार्गावर निवळी येथे भीषण अपघात

Ratnagiri News : रत्नागिरी : जयगड-निवळी मार्गावर निवळी येथे भीषण अपघात, ट्रक आणि कारमध्ये भीषणमध्ये अपघात, अपघातामध्ये कारचालक जखमी, अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी, दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा

Akola News Updates : अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील धरणात बुडून तिघी मायलेकांची मृत्यू

Akola News Updates : अकोल्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील धरणात बुडून तिघी मायलेकांची मृत्यू. आई पाय घसरून पडल्याने वाचवायला गेलेल्या दोन मुलीही बुडाल्या. मृतांमध्ये आई सरिता घोगरे आणि अंजली, वैष्णवी या मुलींचा समावेश.

मनसे कार्यकर्त्यांवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करुन एक वर्ष जामीन मिळणार नाही अशी कारवाई करा, राष्ट्रवादीच्या मालेगाव शहराध्यक्षाची मागणी

Malegaon News : मनसे कार्यकर्त्यांवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करुन एक वर्ष जामीन मिळणार नाही अशी कारवाई करा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगांव शहराध्यक्ष आसिफ शेख यांनी ही मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाला धमकी दिलीं आहे, त्यांच्या धमकीला घाबरत नाही, पण सरकारने लक्ष द्यावं. 4 तारखेनंतर जे मनसे कार्यकर्ते मशिदीसमोर भोंगे लावण्यासाठी येतील त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करा, असं आसिफ शेख म्हणाले.

IPL 2022 : आज आयपीएलच्या मैदानात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने

IPL 2022 : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघाला राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवण्याची गरज आहे. तर, पुढील दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचं राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असेल.

PM Modi Europe Visit : आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर

PM Modi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सोमवारी पहाटे त्यांच्या तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यासाठी नवी दिल्लीहून जर्मनीला रवाना झाले. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) एका ट्विटमध्ये माहिती दिली, "पंतप्रधान मोदी बर्लिनला गेले, जिथे ते भारत-जर्मनीचे संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील.माहितीनुसार, पंतप्रधान सोमवारी बर्लिन, जर्मनी येथे पोहोचतील, जिथे ते जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ यांच्यासोबत 6 व्या भारत-जर्मनी चर्चेत (IGC) सहभागी होतील. पंतप्रधान मोदी मंगळवारी डेन्मार्कला जाणार आहेत आणि नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याचा समारोप पॅरिसमध्ये मुक्कामाने होईल, जेथे फ्रान्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतील.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Ganesh Naik : गणेश नाईक आज हायकोर्टाचं दार ठोठावणार?

Ganesh Naik : ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. एका महिलेनं त्यांच्यावर प्रदीर्घ कालावधीच्या संबंधांनंतर आरोप लावला आहे. बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. 

Hanuman Chalisa Row : राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला

Hanuman Chalisa Row : राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला आहे. मुंबई सत्र न्यायालय राणांच्या जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. राणा दांम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार होते. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. शनिवारी (23 एप्रिल) पोलीसांनी राणा यांच्या खार निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतलं.  युवासेनेनं राणांच्य़ा घराविरोधात आंदलन केलं होतं. खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना 24 एप्रिल 2022 रोजी वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.  राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली. शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आमदार रवी राणा विरोधात 17 तर खासदार नवनीत राणांविरोधात सहा केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध.

Raj Thackeray Rally : लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

Raj Thackeray Rally : मशिदींवरचे भोंगे उतरत नसतील तर अजिबात शांत बसू नका! असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलंय. औरंगाबादेत आज राज ठाकरेंची सभा झाली. सभेला राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मशिदीवरील भोंग्यांना अल्टिमेटमची आठवण करुन देताना राज ठाकरेंनी एकदा होऊनच जाऊ द्या असं म्हंटलंय.

पार्श्वभूमी

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..


लाऊडस्पीकर उतरवा अन्यथा 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही, राज ठाकरेंचा इशारा


मशिदीवरचे भोंगे उतरत नसतील तर अजिबात शांत बसू नका! असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. 4 तारखेपासून आम्ही अजिबात ऐकून घेणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हंटलंय. औरंगाबादेत आज राज ठाकरेंची सभा झाली. सभेला राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मशिदीवरील भोंग्यांना अल्टिमेटमची आठवण करुन देताना राज ठाकरेंनी एकदा होऊनच जाऊ द्या असं म्हंटलंय.


राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला


राणा दाम्पत्याच्या भवितव्याचा आज फैसला आहे. मुंबई सत्र न्यायालय राणांच्या जामीन अर्जावर आज आपला निकाल जाहीर करणार आहे. राणा दांम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार होते. मात्र शिवसेनेच्या विरोधानंतर त्यांनी माघार घेत असल्याचं जाहीर केलं. शनिवारी (23 एप्रिल) पोलीसांनी राणा यांच्या खार निवासस्थानातून त्यांना ताब्यात घेतलं.  युवासेनेनं राणांच्य़ा घराविरोधात आंदलन केलं होतं. खा.नवनीत राणा आणि आ. रवी राणा यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहे. 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना 24 एप्रिल 2022 रोजी वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा भायखळा तुरुंगात तर रवी राणा ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.  राणा दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, अनिल परब आणि शिवसैनिकांविरोधात तक्रार दाखल केली. शनिवारी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. आमदार रवी राणा विरोधात 17 तर खासदार नवनीत राणांविरोधात सहा केसेस आहेत. त्यामुळे सरकारी वकिलांचा या जामीनाला विरोध.


 गणेश नाईक आज हायकोर्टाचं दार ठोठावणार?


ठाणे सत्र न्यायालयानं दिलासा नाकरल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आज हायकोर्टात धाव घेण्याची शक्यता आहे. एका महिलेनं त्यांच्यावर प्रदीर्घ कालावधीच्या संबंधांनंतर लावला आहे बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. 


औरंगाबाद पोलीस आयोजकांवर कारवाई करणार का?


औरंगाबाद  पोलीस सोमवारी राज ठाकरेंच्या भाषण ऐकणार आहे. त्यानंतर ठाकरेंच्या सभेत अटी पाळल्या की नाही , याची माहिती घेऊन आयोजकांवर कारवाई करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आजपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर


आजपासून  पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनी, डेन्मार्क  आणि फ्रान्सच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहे.  


कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने


आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 47 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स आमने सामने येणार आहेत. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना खेळला जाणार आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताच्या संघ आठव्या क्रमांकावर आहे. तर, राजस्थानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफच आव्हान टिकवण्यासाठी कोलकाताच्या संघाला राजस्थानविरुद्ध चांगली कामगिरी करून दाखवण्याची गरज आहे. तर, पुढील दोन सामने जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचं राजस्थानच्या संघाचा प्रयत्न असेल.


आज इतिहासात 


1920 : शास्त्रीय आणि नाट्यसंगीत गायक डॉ. वसंतराव देशपांडे यांचा जन्म. 


1921 : ख्यातनाम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचा जन्म


1975 : चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी आणि गीतकार शांताराम आठवले यांचे निधन


1998 : गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते  पुरुषोत्तम काकोडकर यांचे निधन

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.