Maharashtra Breaking News 01 Junee 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 02 Jun 2022 06:23 PM
चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद

चंद्रपुर जिल्ह्यात आज पाच नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

चंद्रपुर जिल्ह्यात दुसऱ्यांदा मौसमतील सर्वाधिक तापमानाची नोंद

चंद्रपुर जिल्ह्यात दुसऱ्यांदा मौसमतील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. आज चंद्रपुरमध्ये 46.8 तापमानाची नोंद झाली आहे. 

Nashik Major Accident : नाशिक येथील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी भीषण अपघात, तीन जण जागीच ठार   

नाशिकच्या सप्तशृंगी गडाजवळील मार्कंडेय पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारी येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ट्रॅक्टर उलटून अल्टो कारवर पडल्याने तीन जण जागीच ठार झाले असून 10 ते 15 जण जखमी झाले आहे. जखमींना वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.                                                                                                                                                                                                       

गडचिरोली:- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये वाद

गडचिरोली:- राज्य राखीव पोलिस दलाच्या जवानांमध्ये वाद...  पोलीस मदत केंद्र मरपल्ली येथे तैनातीस होते दोन्ही जवान, दोघांच्या वैयक्तिक  वादातुन एकमेकांवर रायफलने फायर केल्याची प्राथमिक माहिती, घटनेत दोघेही मृत पावल्याची सूत्रांची माहिती,


श्रीकांत बेरड, बंडू नवथरे अशी आहेत मयतांची नावे, दोघेही दौंड पुणे येथील SRP कॅम्पचे जवान, वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल, दोन्ही शव उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात केले रवाना

Sourav Ganguly : सौरभ गांगुलीचा बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा

सौरभ गांगुलीने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आपण नवी इनिंग सुरू करणार असल्याचंही त्याने ट्विटरद्वारे जाहीर केलं आहे. 


 


 

Anil Parab : अनिल परब रिसॉर्ट प्रकरणी काय कारवाई केली?, अहवाल देण्याचे केंद्राचं राज्याला निर्देश

राज्य सरकारला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पत्र पाठवलं असून त्यामध्ये  राज्य सरकारने साई रिसॉर्टवर काय कारवाई केली याचा अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार

अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार घोषित करण्यात आलेय. सचिन वाझेनं दाखल केलेला अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं स्वीकारला आहे. सचिन वाझेलाही कोर्टापुढे व्हीसीद्वारे हजर करण्यात आलं होतं. आता 7 जूनच्या सुनावणीत वाझेला प्रत्यक्ष कोर्टापुढे हजर करण्याचे निर्देश देण्यात आलेत. या प्रकरणात आता सचिन वाझे नियमित जामीनासाठी अर्ज करणार

शब्द मागे घेऊन चालणार नाही, खैरेंनी जाहीर माफीच मागावी: वंचित बहुजन आघाडीचा इशारा

औरंगाबाद: प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी केलेल्या आरोपावरून वंचित बहुजन आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. खैरे यांनी शब्द माघे घेऊन चालणार नाही, तर त्यांनी जाहीर माफी मागावी असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले यांनी दिला आहे. त्यामुळे खैरेंच्या विरोधात आम्ही घेतलेल्या भूमिकेवर आम्ही ठाम असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बकले म्हणाले आहे. 


 

कल्याण एसटी डेपोत एसटीचा ७५ वा वर्धापन दिन

एसटी अर्थातच राज्य परिवहन महामंडळाच्या 75व्या वर्धांपन दीन कल्याण एसटी डेपोमध्ये जोरदार साजरा करण्यात आला. कल्याणएसटी  डेपो मध्ये रांगोळी काढण्यात आली होती  एसटी बस हार फुलांनी बस सजवण्यात आल्या. प्रवाशांना फुले देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रवाशांचे स्वागत केलं .याबाबत कल्याण एसटी डेपो चे मॅनेजर विजय गायकवाड यांनी  एसटी महामंडळ सुरु होवून 74 वर्ष पूर्ण झाली आहेत आज एसटी 75व्या अमृतमहोत्सव  वर्षांत पदार्पण करत आहे , प्रवाशांची अविरत सेवा करणारी एसटी अनेक संकटांनी ग्रस्त आहे . मध्यंतरी कोरोना संकट ,त्यानंतर पाच महिने सुरू असलेला संप यामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या मात्र या सर्व संकटावर मात करत एसटी पुन्हा एकदा उभारी घेतेय ,या सगळ्या संकटावर मात करत एसटी ने प्रवाशांची अविरत सेवा केलेली आहे ,विश्वास मिळवला असून चांगली व दर्जेदार सेवा देण्याचं काम एसटी महमंडळाकडून होत असल्याचं त्यांनी सांगितलं. 

नाशिकमध्ये गोविंदांनंद महाराज यांची पत्रकार परिषद, पत्रकार परिषदेनंतर गुजरात रवाना होणार 

Nashik Hanuman Birth Place : नाशिकमध्ये शास्रार्थ सभेत झालेल्या गोंधळानंतर गोविदानंद महाराज पत्रकार परिषद घेतली असून या परिषदेनंतर ते गुजरातला रवाना होणार आहेत. मात्र गोविंदानंद महाराज यांच्या भूमिकेवर अंजनेरी ग्रामस्थ आक्रमक झाले होते. त्यांनी गोविंदानन्द महाराज यांची हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. तर गोविदानंद महाराज हे पत्रकार परिषदेत काय भूमिका मांडतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

नांदेडमधील अंबुलगा इथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तर वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली

Nanded News : नांदेड जिल्ह्यात काल (31 मे) सायंकाळी झालेल्या जोरदार वारा आणि गारांच्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर नांदेड शहरातील रस्त्यावरील झाडे वाहनांवर पडून वाहनांचे नुकसान होऊन रहदारीस अडथळा निर्माण झाला. मुखेड तालुक्यातील अंबुलगा (बु) इथे चंद्रकलाबाई व्यंकटराव झाडे (वय 42 वर्षे) यांच्या अंगावर वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. दरम्यान जोरदार मान्सून पूर्व पावसाच्या सरीने सामान्य जनजीवन मात्र विस्कळीत झालं आहे.

सिंधुदुर्गात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघात, डंपर चालकाचा जागीच मृत्यू

Sindhudurg News : मुंबई-गोवा महामार्गावर टायर फुटल्याने उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही धडक एवढी मोठी होती की उभा असलेला डंपर चक्क डिव्हायडरवर चढला आणि मागील डंपरचा चालक कॅबिनमध्ये अडकून पडला. परशुराम चिन्नी राठोड (राहणार विजापूर कर्नाटक) असे चालकाचे नाव आहे. जेसीबीच्या सहाय्याने डंपर मागे खेचून गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक ग्रामस्थांसह डंपर चालक-मालक उपस्थित असून सावंतवाडी पोलीसही दाखल झाले आहेत.

रत्नागिरीत आजपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं मत्स्य विभागाचं आवाहन

Ratnagiri News : रत्नागिरीत आजपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे बाजारात ताजे, फडफडीत मासे कमी प्रमाणात उपलब्ध असणार आहेत. यांत्रिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना हा नियम लागू असणार आहे. समुद्राला पावसात उधाण येत असते शिवाय माशांच्या प्रजननाचा देखील कालावधी असल्यामुळे या काळात मासेमारी बंद असते. सध्या किनारपट्टी भागात मत्स्य विभागाने याबाबतचे नोटिफिकेशन लावले असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

रत्नागिरीत आजपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं मत्स्य विभागाचं आवाहन

Ratnagiri News : रत्नागिरीत आजपासून 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद असणार आहे. त्यामुळे बाजारात ताजे, फडफडीत मासे कमी प्रमाणात उपलब्ध असणार आहेत. यांत्रिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना हा नियम लागू असणार आहे. समुद्राला पावसात उधाण येत असते शिवाय माशांच्या प्रजननाचा देखील कालावधी असल्यामुळे या काळात मासेमारी बंद असते. सध्या किनारपट्टी भागात मत्स्य विभागाने याबाबतचे नोटिफिकेशन लावले असून मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असे आवाहन केले आहे.

Sachin Vaze : सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर सुनावणी

Sachin Vaze : सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात माफीचा साक्षीदार  होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तपासयंत्रणा यावर आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 

Saki Naka Rape Case : साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी

Saki Naka Rape Case : साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालय आजच निकाल देण्याचा शक्यता आहे. 10 सप्टेंबर 2021 रोजी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कारनंतर झालेल्या पाशवी हल्याचं हे प्रकरण आहे. पीडित महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर सुनावणी

शीना बोरा हत्येप्रकरणी नुकताच जामीन मिळालेल्या इंद्राणी मुखर्जीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भायखळा महिला कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये मारहाण प्रकरणानंतर कारागृहात कैद्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांवर नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.

पहिल्या 'शिवाई' इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते

राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. उद्यापासून पहिली इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती.

Raj Thackeray : राज ठाकरेंवर आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत. 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असून आज मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गाभाऱ्याची पायाभरणी करण्यात येणार असून यावेळी उत्तर प्रदेशमधील मंत्री, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास चे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्यासह एकूण 250 साधू संत आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. ही पायाभरणी झाल्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत या गाभाऱ्याचं काम पूर्ण होणार आहे. तर जानेवारी 2024 पर्यंत या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 

Krishnakumar Kunnath : बॉलिवूडमधील लखलखता तारा निखळला, प्रसिद्ध गायक KK यांचं निधन

Krishnakumar Kunnath Died : गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.


कार्यक्रमादरम्यान मंचावरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. बॉलिवूडमधील 200 हून अधिक सुपरहिट गाणी त्यांनी गायली आहेत. 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमातील 'तडप तडप के इस दिल से' हे त्यांचं गाणं लोकप्रिय झालं होतं. केके यांचा कोलकाता येथील विवेकानंद कॉलेजमध्ये कार्यक्रम होता. केके यांनी स्वत: या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली होती. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

पार्श्वभूमी


राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.


अयोध्येतील राम मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी


अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली असून आज मंदिराच्या गाभाऱ्याची पायाभरणी होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते या गाभाऱ्याची पायाभरणी करण्यात येणार असून यावेळी उत्तर प्रदेशमधील मंत्री, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यास चे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांच्यासह एकूण 250 साधू संत आणि राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. ही पायाभरणी झाल्यानंतर डिसेंबर 2023 पर्यंत या गाभाऱ्याचं काम पूर्ण होणार आहे. तर जानेवारी 2024 पर्यंत या मंदिराचं बांधकाम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. 


राज ठाकरेंवर आज होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आज होणारी शस्त्रक्रिया ही पुढे ढकलण्यात आली आहे. राज ठाकरे यांच्या रिपोर्टमध्ये कोविड डेड सेल्स असल्याचं निदान झालं असून त्यामुळे त्यांना अॅनास्थेशिया देणं शक्य नाही. या वैद्यकीय कारणास्तव ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरे यांच्या शरीरात कोविड डेड सेल्स असल्याचं आढळलं. या सेल्स डेड असल्याने त्यांना कोरोनाची लागण नाही असं डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे त्यांना अॅनास्थेशिया म्हणजे भूलीचं इंजेक्शन देण्यात येऊ शकणार नाही. त्यामुळेच आता ही शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून राज ठाकरे आता त्यांच्या घरी परतले आहेत. 


गायक केके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन 
गायक केके (Krishnakumar Kunnath) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कोलकाता येथील लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांना CMRI रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. वयाच्या 53 व्या वर्षी कोलकात्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केके यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली असून अनेकांनी त्यांच्या निधनावर हळहळ व्यक्त केली आहे.


पहिल्या 'शिवाई' इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते
राज्याची लालपरी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस आता नव्या रूपात सर्वांसमोर येत आहे. उद्यापासून पहिली इलेक्ट्रिक एसटी बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे. पहिल्या 'शिवाई' या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. 1 जून, 1948 रोजी पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर एसटी महामंडळाची पहिली बस धावली होती.


इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेवर सुनावणी
शीना बोरा हत्येप्रकरणी नुकताच जामीन मिळालेल्या इंद्राणी मुखर्जीनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. भायखळा महिला कारागृहातील वॉर्डन मंजुळा शेट्ये मारहाण प्रकरणानंतर कारागृहात कैद्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि इतर महिला कैद्यांवर नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मुख्य मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे.


साकीनाका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेवर सुनावणी
साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी मोहन चौहानच्या शिक्षेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालय आजच निकाल देण्याचा शक्यता आहे. 10 सप्टेंबर 2021 रोजी एका 30 वर्षीय महिलेवर बलात्कारनंतर झालेल्या पाशवी हल्याचं हे प्रकरण आहे. पीडित महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.


सचिन वाझेच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर सुनावणी
सचिन वाझेनं माफीचा साक्षीदार बनण्यासाठी दाखल केलेल्या अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टात सुनावणी होणार आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या खटल्यात माफीचा साक्षीदार  होण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. तपासयंत्रणा यावर आज आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. 


भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
'माझी संसदेतील भाषणे' या माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि खासदार संजय राऊत, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. हा कार्यक्रम संध्याकाली 5 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.