Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानास्पद विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कोल्हापूर न्यायालयात शुक्रवारी एका वकिलाने हल्ला (Attack On Prashant Koratkar) केला. अमितकुमार भोसले असे वकिलाचे नाव आहे. कोल्हापूर न्यायालयातील युक्तिवाद संपल्यानंतर पोलीस कोरटकरला कोठडीकडे नेत होते. त्यावेळी वकील अमितकुमार भोसले यांनी प्रशांत कोटकरवर हल्ला केला होता. आता अमितकुमार भोसले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाले अमितकुमार भोसले?

अमितकुमार भोसले म्हणाले की, सर्वात आधी मी शिवभक्त आहे.  त्यानंतर वकील आणि इतर गोष्टी आहेत. काल अनेकांच्या डोळ्यांमध्ये मला तीव्र भावना दिसत होत्या. मात्र, प्रत्येकाच्या व्यक्त होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मी काल माझ्या पद्धतीने व्यक्त झालो. कोल्हापुरात फेटा देखील आहे आणि कोल्हापुरी पायताण देखील आहे. त्यामुळे कोल्हापुरातील जातीय सलोखा  कुणी बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला असला तरी हे त्यांचे काम करत आहेत. त्याबद्दल मला कुठलाही आक्षेप नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  

नेमकं काय घडलं होतं? 

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अटक करण्यासाठी पोलिसांना जवळपास महिन्याभराचा कालावधी लागला. कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. याआधी बुधवारी कोरटकरला न्यायालयात हजर केले असता त्याच्या शिवप्रेमींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर शुक्रवारी कोरटकरला न्यायालयात हजर करण्यात आले होते.  न्यायालयात 40 ते 45 मिनिटं युक्तिवाद झाला. त्यानंतर कोरटकर न्यायालयातच न्यायमूर्तींच्या आदेशाची वाट पाहत थांबला होता. न्यायाधीशांनी त्याची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली. यानंतर पोलीस त्याला घेऊन गेले. न्यायालयाच्या मागच्या दाराने त्याला बाहेर नेले जात होते. त्यावेळी वकिल अमितकुमार भोसले यांनी कोरटकरवर हल्ला केला. न्यायालयाचा मागील दरवाजा कँटिनच्या दिशेने उघडतो. तिथे वकील अमितकुमार भोसले आधीपासूनच उभे होते. कोरटकर दिसताच त्यांनी त्याला हाक मारली. शिवाजी महाराजांची बदनामी करतोस का? असा सवाल विचारत भोसले कोरटकरवर धावून गेले. त्यांनी कोरटकरवर झडप घातली. यानंतर पोलसांनी अमितकुमार भोसले यांना दूर केले होते.   

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Prashant Koratkar Rolls Royce Car: प्रशांत कोरटकरकडे असलेली रोल्स रॉईस कार कलाटेंच्या फॉर्महाऊसवर कशी? एबीपी माझाकडे कोरटकर अन् कलाटेंचा एकत्रित व्हिडीओ

कोरटकर घरात एकटा कमवता, वकिलाची बाजू, असीम सरोदे संतापले; कोल्हापूर न्यायालयातील A टू Z युक्तिवाद