Anjali Damania on Santosh Deshumukh Case : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांचे केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झाले होते, त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झाले. त्यानंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता. धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितले होते. प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनला गेले, मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसवून ठेवल्याचे त्यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटले आहे. यावरून केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी गंभीर आरोप केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, प्रत्यक्षदर्शीचा जबाब सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यालाच साडेतीन बसवून ठेवले. पीआय महाजन आणि बनसोडे हेच अधिकारी होते, त्यामुळे हे अधिकारी या संपूर्ण कटात शामिल होते. पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहिले असते तर संतोष देशमुख वाचले असते.
10 पोलिसांना सहआरोपी करायला हवे
आवादा कंपनीने तर 8 महिने म्हणजे मे महिन्यापासून तक्रार केली होती. 28 मेला एका कर्मचाऱ्याचे अपहरण यांनी केले, सातपुडा बंगल्यात हे केले गेले. मे महिन्यापासून हे सुरू झाले. पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुख वाचले असते. पीआय महाजन यांना या कटाची कल्पना होती. अनेक गोष्टी त्यांना माहिती होत्या. पीआय महाजन यांना सहआरोपी करा, अशी मागणी मी केली आहे. चार्ज शिटमध्ये त्यांचे नाव नाही. 10 पोलीस अधिकाऱ्यांची यादी आहे. त्यांना सहआरोपी करायला हवे. त्यांनी आरोपींची मदत केली आहे. काही कटात ते शामिल आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडेंनी सगळ्यांना कॉर्डिनेट केलं
सुदर्शन घुलेच स्टेटमेंट अर्धवट आहे. गुन्हा कसा घडला? एवढेच आहे, पण ते कुठे गेले? फरार कुठे झाले? भिवंडीत कसे आले? पुण्यात कसे आले याची माहिती दिलेली नाही. मी एक ट्वीट ही केले आहे. पोलिसांनी देखील स्टेटमेंट कसे घेतले? या सगळ्यांना धनंजय मुंडे कॉर्डिनेट करत होते. सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप चॅटवर आहेत. पण, यांना सहआरोपी केले तर पुरावे समोर येतील, म्हणून त्यांना वाचविल जात आहे. तिघांचा जबाब सारखाच आहे. सुदर्शन घुले कुठे गेला? कुठे राहिला? पैसे कोणी दिले? हा घटनाक्रम कुठे आहे? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा. पण, यांचे काय?
हे प्रकरण 8 ऑक्टोबरपासून झालेले नाही तर त्या आधीपासून झालेले आहे. याच्या बैठका सातपुडा बंगल्यात झाल्या होत्या. धनंजय मुंडे, कराड या बैठकीला उपस्थित होते. याला यंत्रणा जबाबदार आहे. वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शंभुराज देसाई म्हणतात की, कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा. पण, यांचे काय? तसेच कृष्ण आंधळे कुठे आहे? त्यावर नाही वापरायचा का? येत्या बुधवारी मी संभाजीनगरला जाणार आहे. सगळे मुद्दे न्यायालयीन समितीकडे देणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले.
आणखी वाचा