खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी? खासदारांच्या शेतात 24 तास वीज, शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास लोड
Usmanabad News : खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभावमुळे शेतकरी मात्र पुरता वैतागला आहे
![खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी? खासदारांच्या शेतात 24 तास वीज, शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास लोड Maharashtra Marathi news 24 hours power from express feeder in MP Omraje Nimbalkar field खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी? खासदारांच्या शेतात 24 तास वीज, शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास लोड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/03/f0b158736ada9219636bd8ff232d62f2_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Usmanabad News : एकीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकरी वीजेच्या लोडशेडिंगने हैराण झालेला असताना उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. आणि त्याच भागातील शेतकऱ्याच्या नशीबी मात्र दुर्दैव आहे. कारण त्या शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड वीज मिळत आहे. खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभावमुळे शेतकरी मात्र पुरता वैतागला आहे
ओमराजे यांच्यासह काही शेतकऱ्यांना 24 तास वीज
तेर येथील एक्सप्रेस फिडरवरून डीपी टाकण्यात आला असून या फिडरच्या माध्यमातून ओमराजे यांच्यासह काही शेतकऱ्यांना 24 तास वीज दिली जात आहे, तर त्याच भागातील काही शेतकऱ्यांना मात्र वीज मिळत नसल्याने पिकांचे मोठे नुकसान् होत आहे. लोकप्रतिनिधी व सामान्य शेतकरी असा दुजाभाव होत असल्याने शेतकरी संतप्त झाला आहे. आम आदमी पार्टीने ओमराजे यांना 24 तास वीज मिळत असल्याचा आरोप केला आहे.
शेतकऱ्यांना दिवसरात्र विजेची वाट पाहावी लागतेय
उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकरी वीज नसल्याने वैतागला आहे, शेतात पाणी असले तरी केवळ वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही, दिवसरात्र विजेची वाट पाहावी लागत आहे. सामान्य शेतकरी यांनी ही विजेसाठी बिकट अवस्था असताना शिवसेनेचे खासदार ओमराजे यांच्या शेतात मात्र 24 तास वीज आहे. तेरणा साखर कारखानासाठी असलेल्या विशेष एक्सप्रेसवरून वरील डिपी वरून ओमराजे यांच्या शेतात वीज कनेक्शन देण्यात आला असून या फिडरला 24 तास वीज असते शेतकऱ्याला मात्र एक दिवसआड 8 तास वीज मिळते.
खासदार तुपाशी, शेतकरी उपाशी
खासदार तुपाशी शेतकरी उपाशी अशी परिस्थिती असून या दुजाभाव मुळे शेतकरी वैतागला आहे, तर खासदार ओमराजे यांचे प्रकरण असल्याने अधिकारी याबाबत बोलण्यास टाळाटाळ करित आहेत.
महत्वाच्या बातम्या
Dilip Walse Patil : महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आज गृहमंत्री घेणार बैठक, बैठकीकडे सर्वांचे लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)