Marathi Language : मराठीला 'अभिजात' दर्जा मिळावा, नाना पटोलेंचे राष्ट्रपती व पंतप्रधानांना पत्र
Marathi Language : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून केली आहे.
मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा गेल्या जवळपास दशकभरापासून या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्राला आहे. आता मराठी भाषा दिवस जवळ येत असतानाच राज्य सरकारनं पुन्हा या मुद्द्यावर केंद्रावर दबाव टाकण्यासाठी हालाचाली केल्या आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्र लिहिले आहे.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा व लोकभाषा आहे. मराठी भाषेचे स्वतंत्र व्याकरण, लिपी व विपुल साहित्य संपदाही आहे. जगात दहावी व देशात तिसऱ्या क्रमांकाची मराठी भाषा असून मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या 10 कोटी आहे. प्राचीन शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळतो. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी असलेल्या सर्व निकषांना मराठी भाषा पात्र ठरत असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पत्र पाठवून केली आहे.
पंतप्रधान व राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात पटोले पुढे म्हणातात की, मराठी भाषा प्राचीन भाषा असून तिसऱ्या शतकातील सातवाहन राजवटीतील घारापुरी लेण्यांमध्ये सापडलेल्या नाण्यांवर मराठीचा उल्लेख आढळतो. सहाव्या शतकात राजा हाल लिखित 'गाथा सप्तशती' लिहीला तर 12 व्या शतकात मुकुंदराज या कवीने 'विवेकसिंधू' या काव्यग्रंथाची निर्मिती मराठी भाषेत केली. प्राचीन काळातील अनेक शिलालेखावरही मराठी भाषेचा उल्लेख आढळून आलेला आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तेलंगणा, गोवा, गुजरात या राज्यात तसेच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, न्युझीलंडसह विविध देशात मराठी बोलणारे असंख्य लोक आहेत. अमेरिकेच्या 23 विद्यापिठांमध्येही मराठी भाषा शिकवली जाते. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करण्यासाठी असेलले सर्व निकष मराठी भाषेत असल्याने याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, असे या पत्रात म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Marathi Language : मराठीला 'अभिजात' दर्जा मिळावा या मागणीची चार हजार पोस्ट कार्डस राष्ट्रपतींकडे रवाना
- Marathi : मराठी भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याला विलंब का? ही आहेत कारणं
- Priyanka Chaturvedi: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळणार; खा. प्रियंका चतुर्वेदींच्या प्रश्नाला केंद्रीय मंत्र्यांचं उत्तर