एक्स्प्लोर

Lok Sabha Election : राज्यात आठ मतदारसंघात महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता, अंतर्गत वाद होण्याची शक्यता, तीनही पक्षांची दावेदारी 

Lok Sabha Election : मिलिंद देवरा यांच्या शिवसेना प्रवेशानंतर दक्षिण मुंबई मतदारसंघाचा वाद निर्माण झाला असताना इतरही आठ ठिकाणी तशीच परिस्थिती असल्याचं समोर येत आहे. 

मुंबई: मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यानंतर दक्षिण लोकसभा मतदारसंघावरुन भाजपच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. दक्षिण मुंबई प्रमाणेच इतर देखील जागांवर वादाची ठिणगी महायुतीत आहे. अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीत देखील पाहिला मिळत आहे. 

माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून काढता पाय घेत शिवसेनेची वाट धरली आणि थेट दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचे संकेत दिले. मिलिंद देवरांच्या याच भूमिकेमुळे आता शिवसेना भाजप वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण या मतदारसंघातून भाजप आमदार मिलिंद देवरा आणि मंगलप्रभात लोढा आधीच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. 

केवळ दक्षिण मुंबईच नाही तर सध्या महायुतीत आणि महाविकास आघाडीत देखील विविध लोकसभा मतदारसंघावरुन धुसपूस सुरु आहे. भाजपने मिशन 45 प्लसचा विचार करता जर उमेदवार निवडून येणारा असेल तर प्रसंगी विरोधी पक्षातून आयात करुन निवडणूक लढण्याची भूमिका घेतली आहे. तर महाविकास आघाडीत ज्याची ताकद जास्त त्यालाच सर्वांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेण्यात आली आहे.  

वाद निर्माण होऊ शकेल असे महायुतीचे मतदारसंघ

1) रत्नागिरी-सिंधुदुर्ग- शिवसेनेच्या किरण सामंत लढण्यास इच्छुक तर भाजपकडून रविंद्र चव्हाण यांना तयारी करण्याचे आदेश.

2)  रायगड- राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी विरोध करताना धैर्यशील पाटील यांना उमेदवारी देण्याची मागणी.

3)  शिरुर- अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा केला, परंतु शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली.  

4)  मावळ- शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांना पुन्हा उमेदवारी मिळेल असा पक्षाकडून दावा करण्यात आला असला तरी राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीला जागा सोडण्याची अजित पवारांकडे मागणी केली आहे. 

5) सातारा- अजित पवारांनी जागा लढणार असं म्हंटलं असलं तरी भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आपणच निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

6) कोल्हापूर- शिवसेनेचे संजय मंडलिक खासदार, मात्र भाजपकडून अमल महाडिकांसाठी प्रयत्न सुरु आहेत.

7) अहमदनगर- भाजपचे सुजय विखे निवडणूक लढणार अशी चर्चा असताना निलेश लंके यांची राम शिंदे यांच्यासोबतची वाढती जवळीक विखे कुटुंबासाठी डोके दुखी ठऱण्याची शक्यता आहे कारण लंके स्वतः लोकसभेसाठी तयारीत आहेत 

8) संभाजीनगर लोकसभा युतीच्या जुन्या जागा फॉर्मुल्यानुसार शिवसेनेकडे येते. मात्र गेल्या वर्षभरापासून भाजपाचे भागवत कराड हे तयारी करत आहेत. शिवसेनेकडून देखील संदिपान भुमरे यांच्यासह अन्य नेते इच्छुक आहेत त्यामुळे या जागेवरून देखील ओढाताण होणार.

महाविकास आघाडीतील वाद निर्माण होणारे मतदारसंघ

1)  उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर उमेदवार असतील अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. मात्र संजय निरुपम यांनी या मतदारसंघावर दावा सांगताना कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली आहे. 

2) ईशान्य मुंबई- उद्धव ठाकरे यांनी संजय दीना पाटील या ठिकाणाहून लढतील अशी घोषणा केलीय. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने देखील राखी जाधव यांच्यासाठी या मतदारसंघावर दावा सांगितला आहे.  

एकंदरीतच महाविकास आघाडीपेक्षा महायुतीत जागा वाटपावरुन नाराजी नाट्य रंगण्याची शक्यता आहे. कारण महाविकास आघा़डीकडे उमेदवारांची वाणवा आहे तर महायुतीत उमेदवारांची भाऊगर्दी पाहिला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शिवसेना भाजपमध्ये जागा वाटप करताना वरिष्ठांची डोकेदुखी वाढणार हे निश्चित आहे.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget