मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) निकाल लागल्यानंतर आता एनडीएकडून (NDA) सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केला जातोय. एनडीएतील सर्व घटकपक्षांनी भाजपल्या पाठिंब्याचे पत्र दिले आहे. आज (7 जून) मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. दुसरीकडे या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही मोठ्या घडामोडी घडत आहेत. जागा कमी झाल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आज फडणवीस हे दिल्लीत असून ते केंद्रातील भाजपच्या (BJP) नेत्यांशी चर्चा करणार आहेत.


 फडणवीस दिल्लीत, अमित शाहांसोबत करणार महत्त्वाच्या विषयांवर चर्चा


फडणवीस हे आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान तेआज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित यांची भेट घेणार आहेत. काल (6 जून) रात्री अमित शाह यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये दिड तास चर्चा झाली होती. या चर्चेत सरकारमधून बाहेर पडण्याची माझी भुमिका ही कोणत्याही नाराजीतून नाही तर राज्यात पक्षसंघटनेला बळकटी आणण्यासाठीच आहे अस देवेंद्र फडणवासांनी अमित शाह यांना सांगितल्याच कळतंय. याशिवाय संघटनेच्या कामात तळागाळातील कार्यकर्ता ते स्थानिक पातळीवरचे प्रश्न समजून घेत विधानसभेची जोरदार मोर्चेबांधणी करता येईल, सरकारच्या बाहेर राहून देखील सरकार व्यवस्थित चालवता येऊ शकत असा विश्वासही दिला. 


अंतिम निर्णय भाजपचे नेतृत्त्व घेणार


सरकारमधून राजिनाम्याच्या भूमिकेचा अंतिम निर्णय हे भाजप नेतृत्त्वच घेईल मात्र त्यांना माझा निर्णय योग्य कसा आहे, हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न देवेंद्र फडणवीसांकडून केला जाणार असल्याची माहिती आहे. आज दुपारनंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट होईल त्या दरम्यान ही चर्चा होण अपेक्षित आहे.


महाराष्ट्राच्या राजकाणात मोठ्या घडामोडी


दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देश तसेच राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. अशा स्थितीत आगामी काळात महाराष्ट्रात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


 हेही वाचा :


लोकसभा निवडणुकीच्या काळात शेअर बाजारात मोठा स्कॅम, राहुल गांधींचा आरोप; 1 मे ते 4 जूनमध्ये नेमंक काय घडलं?


Maharashtra News Live Update : सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, नाना पटोलेंची विरोधकांवर टीका