Maharashtra News Live Update : सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, नाना पटोलेंची विरोधकांवर टीका

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर"

प्रज्वल ढगे Last Updated: 07 Jun 2024 03:47 PM
सत्ताधाऱ्यांनी जनतेला वाऱ्यावर टाकलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत, नाना पटोलेंची विरोधकांवर टीका

नाना पटोले


आमच्या 14 खासदारांचं मी अभिनंदन करतो 


सगळ्यांनी ज्यांनी निवडून आणण्यात मदत केली त्यांचे आभार 


सोनिया गांधी, राहुल गांधी यांचेदेखील आभार व्यक्त करतो


महाराष्ट्र मधील तमाम काँग्रेस कार्यकर्त्यांचा हा विजय आहे


महाराष्ट्रच्या जनतेचंदेखील मी आभार व्यक्त करतो 


भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी यांनी काढली


त्यामुळे ही निवडणूक राहुल गांधीमुळे घराघरात पोहोचली 


एक सक्षम विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका म्हणून काँग्रेस पक्ष उभा राहिला 


आज देशाचं संविधान बदलण्याचं काम सुरू होतं ते आपण थांबवलं आहे 


या वेळेस सगळे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिले 


सामूहिक विजयाचा हा उत्सव आहे


या सगळ्याचं श्रेय जातं राहुल गांधी यांना 


आज महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे


जनतेला वाऱ्यावर टाकलं गेलं, शेतकरी आत्महत्या करत आहेत. सरकारला कशाचं पडलेलं नाही.


महाराष्ट्रात खूप भयानक परिस्थिती आहे  


अजूनही आचारसंहिता सुरू आहे


या अडचणीच्या परिस्थितीत काँग्रेसने ही लढाई हिमतीने लढली


या विश्वासाला तडा आम्ही जाऊ देणार नाही

मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम, एका दिवसात 2 लाख 60 हजार 471 प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम,


मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक


काल एका दिवसात तब्बल 2 लाख 60 हजार471 प्रवाशांनी केला प्रवास


मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती


अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 मध्ये मार्गांचे झाले होते लोकार्पण...

मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम, एका दिवसात 2 लाख 60 हजार 471 प्रवाशांनी केला प्रवास

मुंबई मेट्रो 2 आणि 7 ने रचला नवा विक्रम,


मार्गिका सुरू झाल्यापासून आतापर्यंतच्या एका दिवसात सर्वाधिक प्रवासी वाहतूक


काल एका दिवसात तब्बल 2 लाख 60 हजार471 प्रवाशांनी केला प्रवास


मुंबईकर प्रवाशांची मेट्रो प्रवासाला पसंती


अंधेरी पूर्व गुंदवली ते अंधेरी पश्चिम नगर दरम्यान मेट्रो दोन आणि मेट्रो सात सेवा सुरू 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2023 मध्ये मार्गांचे झाले होते लोकार्पण...

Narendra Modi Oath Ceremony : राष्ट्रपती भवनात होणार मोदींचा शपथविधी, मंच उभारणीचे काम चालू!

एनडीएनने नरेंद्र मोदी यांची नेतेपदी एकमताने निवड केली आहे. आता राष्ट्रपती भवनात मोदी यांच्या शपथविधीची तयारी केली जात आहे. मान्यवरांसाठी आसने, शपथविधीसाठी मंच उभारणीचे काम चालू आहे. 

Narendra Modi On Election Result : विजय कसा पचवायचा असतो हे आम्ही 4 जून रोजी दाखवलं- नरेंद्र मोदी

आमच्या विजयाला लपवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण असे प्रयत्न टिकत नाहीत. चार जून रोजी निकाल आल्यानंतर आमच्या वागण्यातून विजय कसा पचवायचा असतो हे दिसून आले. 

Narendra Modi : एनडीएचा पराभव झाला, असे चित्र निर्माण करण्यात आले, निवडणुकीत लोकांचं विभाजन करण्याचा प्रयत्न- मोदी

Narendra Modi : इंडिया आघाडी तंत्रज्ञान, विकासाच्या विरोधक आहे. मी जगात सांगतो की आम्ही जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहोत. पण हे जगात जाऊन सांगतात की भारतात लोकशाही नाही. या निकालामुळे भारताची विशालता, व्यापकता जाणून घेण्यासाठी जग आकर्षित होणार आहे.


निवडणुकीच्या काळात हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करण्यात केला. देशात लोकांना विभाजित करण्याचा प्रयत्न केला. निवडणुकीच्या काळात लोकांना जोडण्याचा प्रयत्न करायचा असतो पण त्यांनी लोकांना विभाजित केलं. यावेळच्या निवडणुकीत एनडीएचा महाविजय झाला आहे. निकालानंतर एनडीएचा पराभव झाला आहे, असं चित्र निर्माण करण्यात आलं. कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून विरोधकांना तसं चित्र निर्माण करावंल लागलं.

विरोधक ईव्हीएमवर टीका करायचे, आता ते गप्प झाले- नरेंद्र मोदी

Narendra Modi Criticizes India Alliance : आपलं विकसित भारताचं स्वप्न आहे. येणाऱ्या 25 वर्षांत महाप्रभू जगन्नाथ यांच्या आशीर्वादाने ओदिशा या राज्याचे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान असेल. चार जून रोजी निकाल लागला. मी माझ्या कामात व्यग्र होतो. पण मी एका माझ्या सहकाऱ्याला विचारलं की देशात ईव्हीएम जिंवत आहे का, की ईव्हीएम मरून गेले आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास उडावा यासाठी विरोधकांकडून प्रयत्न करण्यात आला. विरोधक ईव्हीएम मशीवर टीका करायचे. पण 4 जून रोजी संध्याकाळपर्यंत ईव्हीएमने विरोधकांना गप्प केले. हीच भारताच्या लोकशाहीची, निवडणूक आयोगाची ताकद आहे. 


2019 साली ते पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनला घेऊन टीका करायाला सुरुवात करतील. निवडणुकीच्या काळात प्रत्येक तीन दिवसांनी त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामात अडथळा यावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ज्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा कसा आणता येईल, यासाठी प्रयत्न केले. निवडणूक आयोगावर आरोप करायचा, निकाल काहीही लागूदेत भारताची जगात बदनामी करायची, असा विरोधकांनी कट रचला होता. देश त्यांना कधीही माफ करणार नाही. 

केरळमध्ये कित्येक वर्षांनी आपला उमेदवार विजयी झाला- नरेंद्र मोदी

Narendra Modi On NDA Alliance : जिथे कमी तिथे आम्ही. आपल्याला दहा वर्षांचा अनुभव आहे. भारतीय नागरिकांच्या स्थानिक आणि देशपातळीवरील इच्छा आहेत, त्यात एक अतुट नातं असायला हवं. या नात्यातून हवादेखील जायला नको एवढं हे नातं मजबूत असायला हवं. दक्षिण भारतात एनडीएने नव्या राजकारणाचा प्रारंभ केला आहे. तेलंगणाचे उदाहरण घेऊ. आता कुठे त्यांचं तेलंगणात सरकार आलं होतं. आता लगेच तेथील लोकांनी एनडीएवर विश्वास ठेवलं आहे. मी तमिळनाडूच्या एनडीए युतीचं अभिनंदन करू इच्छितो. तमिळनाडूत एनडीएतील अनेक पक्ष असे होते, ज्यांचे तेथे उमेदवार नव्हते. पण त्यांनी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. आपले तेथे मतदानाचा टक्का वाढला आहे. केरळचे उदाहरण घ्या. तेथे एनडीएच्या कार्यकर्त्यांवर अनेक अत्याचार झालेले आहेत. समोर विजय दिसत नसतानाही तेथे कार्यकर्ते लढत होते. पण आज कित्येक वर्षांनी पहिल्यांदा आपला उमेदवार तेथून निवडून आला आहे. अरुणाचल प्रदेशात आपले सरकार अनेकवेळा आलेले आहे. आंध्र प्रदेशमध्येही एनडीएचे सरकार आलेले आहे.

Narendra Modi On NDA Alliance : सर्वजन मिळून विकासाचा नवा अध्याय लिहू- नरेंद्र मोदी

मी पूर्ण जबाबदारीने हे बोलत आहे. एनडीए सरकार आगामी 10 वर्षांत सुशासन, विकास, नागरिकांचा जीवनस्तर उचावणे यावर काम करणार आहे. मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग यांच्या  जीवनात सरकार जेवढं कमी हस्तक्षेप करेल तेवढ्याच प्रमाणात लोकशाही सशक्त होत असते. आम्ही विकासाचा नवा अध्याय लिहू. जनतेच्या समावेशाचा नवा अध्याय लिहू. सर्वजण मिळून आपण भारताचे विकसित भारताचे स्वप्न साकार करू. 


संसदेत कोणत्याही पक्षाचा कोणताही लोकप्रतिनी असो माझ्यासाठी सर्वजन समान असतील. आमच्यासाठी सर्वजन समान आहे. याच कारणामुळे गेल्या तीस वर्षांपासून एनडीए सरकार मजबुतीने पुढे जात आहे. 

Narendra Modi On Balasaheb Thackeray : नरेंद्र मोदी यांनी घेतलं बाळासाहेब ठाकरे यांच नाव, संसद भवनाच्या सेन्ट्रल हॉलमध्ये म्हणाले....

Narendra Modi : एडीए आघाडी ही राष्ट्रप्रथम या भावनेतून तयार झालेली आहे. भारताच्या राजकीय पटलावर ही एक ऑरगॅनिक युती आहे. आज अटलबिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव या अनेकांची मी नावं घेऊ शकतो. त्यांनी जे बीज रुजवलं होतं, त्या बिजाला पाणी घालून जनतेने त्या बिजाचा वटवृक्ष केलं आहे.गेल्या दहा वर्षांत एनडीच्या जुन्याच मूल्यांना घेऊन पुढे जाण्याचा, देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Narendra Modi : एनडीए आघाडी ही सर्वांत यशस्वी युती- नरेंद्र मोदी

Narendra Modi : आपला देश विविधतेने भरलेला आहे. पण एनडीएची यात्रा ही तीन दशकांची आहे. म्हणूनच मी मोठ्या गर्वाने सांगतो की संघटनेत मी एक कार्यकर्ता म्हणून एनडीए आघाडीचा भाग होतो. मी आज संसदेत बसून तुमच्यासोबत काम करतोय. मी सांगू शकतो की एनडीए आघाडी ही सर्वांत यशस्वी युती आहे. प्रत्येक सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ असतो. या एनडीए आघाडीने 30 वर्षांत पाच-पाच वर्षांचा कार्यकाळ तीन वेळा पूर्ण केलेला आहे. आता आपण चौथ्या कार्यकाळात प्रवेश करत आहोत.

सरकार चालवण्यासाठी बहुमत हवं, पण देश चालवण्यासाठी सर्वसंमती हवी- मोदी

Narendra Modi : आपली एनडीए आघाडी ही संविधानाला समर्पित आहे. गोवा असो, इशान्येकडील राज्य असो या भागात मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन धर्मीय राहतात. या राज्यांतही आपल्याला सेवा करण्याची संधी मिळाली होती. मित्रांनो भारताच्या राजकारणात याआधी निवडणुकीआधी केलेली युती याआधी कधीच एवढी यशस्वी राहिलेली नाही. या युतीच्या  काळात आपण अनेकवेळा बहुमतात आलेलो आहोत. मी याअगोदर अनेकवेळा म्हणालो आहे की सरकार चालवण्यासाठी बहुमत हवे आहे. त्याशिवाय सरकार चालवता येत नाही. पण देश चालवण्यासाठी सर्वसंमती असणं गरजेचं असतं. मी देशातील नागरिकांना आश्वासित करतो की तुम्ही आम्हाला बहुमत दिलं आहे. त्यामुळे आम्ही देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू.

Narendra Modi : 22 राज्यांत एनडीएचे सरकार, एनडीए युती देशाचा खरा आत्मा- नरेंद्र मोदी

Narendra Modi : तुम्ही माझी पुन्हा एकदा नेता म्हणून निवड केली आहे. म्हणजेच तुमच्यात आमाझ्यात विश्वासाचं नातं आहे. आपल्यातील नातं हे विश्वासावर टिकून आहे. भारतासारख्या महान देशाची ताकद पाहा. आज एनडीएचे देशातील 22 राज्यांत सरकार आहे. लोकांनी या 22 राज्यांत एनडीएला सेवा करण्याची संधी दिली. आपली ही एनडीए युती देशाचा खरा आत्मा आहे. आपली युती ही भारताचे प्रतिबिंब आहे. 

मी देशातील लाखो कार्यकर्त्यांचे आभार मानतो- नरेंद्र मोदी

Narendra Modi : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या बैठकीत भाषण केले. त्यांनी नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, विजयी होऊन आलेले सर्वजन अभिनंदनास पात्र आहेत. पण देशातील लाखो कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र काहीही पाहिले नाही. गर्मी पाहिली नाही. देशातील अनेक कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. मी संसदेच्या सेन्ट्रल हॉलमधून मी त्यांचे आभार मानतो. एनडीएचा नेता म्हणून माझी तुम्ही सर्वसंमतीने निवड केली. या निवडीमुळे मला नवी जबाबदारी मिळाली आहे.

लोकजनशक्ती पार्टीचा मोदींच्या नेतेपदी निवडीच्या प्रस्तावाल मान्यता, चिराग पासवान-नरेंद्र मोदींची गळाभेट

लोकजनशक्ती पार्टीचे प्रमुख चिराग पासवान यांनी नरेंद्र मोदी यांची गळाभेट घेतली.





Ajit Pawar On Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या नेतेपदी निवडीच्या प्रस्तावाचे माझ्या पक्षाकडून समर्थन- अजित पवार

Ajit Pawar On Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या नेतेपदी निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. मी या प्रस्तावाचे समर्थन करतो, असे अजित पवार म्हणाले.

Eknath Shinde On Narendra Modi : एनडीए-शिवसेना या दोन पक्षांतील युती हा 'फेविकॉल का जोड'- एकनाथ शिंदे

Eknath Shinde On Narendra Modi : एनडीए आणि शिवसेना या दोन पक्षांतील युती हा 'फेविकॉल का जोड' आहे. तो कधीही तुटणार नाही. लोकसभा निवडणुकीत मोदी यांनी मेहनत केली. त्यांनी सभा घेतल्या. त्यांची जादू पुन्हा एकदा दिसऱ्यांदा दिसली. त्यामुळेच मी त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा देतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले. फक्त राजकारण करणाऱ्यांना लोकांनी घरी बसवलं आहे, असंही शिंदे म्हणाले. 

Eknath Shinde On Narendra Modi : खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना लोकांनी नाकारलं- एकनाथ शिंदे

Eknath Shinde On Narendra Modi : आजचा दिवस हा ऐतिहासिक आहे. कारण आज नरेंद्र मोदी यांची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात येत आहे. आम्ही या प्रस्तावाला अनुमोदन देत आहोत. गेल्या दहा वर्षात मोदी यांनी या देशाचा विकास केला. या देशाला पुढे नेले. या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली. या देशाला नवी ओळख देण्याचे काम केले.  खोटा अजेंडा राबवला, लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला. पण खोट्या अफवा पसरवणाऱ्यांना लोकांनी नकारलं आहे. लोकांनी मोदी यांना स्वीकारलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Nitish Kumar On Narendra Modi : आम्ही पूर्ण कार्यकाळ मोदी यांच्यासोबत असणार आहोत- नितीश कुमार

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोदींच्या नेतेपद निवडीच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आज हा फार खुशीचा दिवस आहे. दहा वर्षांपासून मोदी हे पंतप्रधान आहेत. ते पुन्हा एकदा पंतप्रधान होत आहेत. त्यांनी देशाची सेवा केली. आम्ही संपूर्ण कार्यकाळ त्यांच्यासोबत राहणार आहोत. विरोधकांनी आतापर्यंत काहीही काम केलेलं नाही. बिहार, संपूर्ण देश आता पुढे जाणार आहे. आम्ही पूर्णवेळ मोदी यांच्यासोबत असणार आहोत. 

Chandrababu Naidu : भारताला योग्य वेळेला योग्य नेता मिळाला- चंद्राबाबू नायडू

Chandrababu Naidu : नरेंद्र मोदी यांच्याकडे दूरदृष्टी आहे. आज भारताला योग्य वेळेला योग्य नेता मिळत आहे. भारतासाठी ही मोठी संधी आहे. ही संधी गमावल्यास ती पुन्हा येणार नाही. जगातील इतर देशांचा वृद्धी दर हा दोन ते तीन टक्के आहे. पण गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशाचा वृद्धीदर मोठा आहे.

Chandrababu Naidu On Narendra Modi : चंद्राबाबू नायडू यांच्याकडून नरेंद्र मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता!

Chandrababu Naidu On Narendra Modi : नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यावेळी एनडीएतील प्रमुख नेत्यांनी त्यांच्या नावाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. आंध्र प्रदेशचे नेते तथा टीडीएस पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनीदेखील मोदी यांच्या नावाला पाठिंबा दिला.

Amit Shah On Narendra Modi : मोदींनी देशाचे नेतृत्त्व करावे ही संपूर्ण भारताची इच्छा- अमित शाह

Amit Shah On Narendra Modi :" एनडीएच्या गटनेतेपदासाठी, लोकसभेच्या नेतेपदासाठी माझी सहमती आहे, असे अमित शाह म्हणाले.

Rajnath Singh : मी एनडीएच्या संसदीय दलाचा नेता म्हणून मोदींच्या नावाचा प्रस्ताव समोर ठेवतो- राजनाथ सिंह

देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी मोदींपेक्षा सर्वोत्तम नेता दुसरा असू शकतो. त्यामुळेच मी भारतीय जनता पार्टीचे संसदीय दलाचे नेते, एनडीएचे संससदीय दलाचे नेते तसेच लोकसभेचे नेते म्हणून मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवतो.

Rajnath Sing On Narendra Modi : मोदींच्या रुपात आपल्याला लोककल्याणकारी पंतप्रधान भेटत आहेत, हे आपले सौभाग्यच आहे- राजनाथ सिंह

Rajnath Sing :1962 नंतर दुसऱ्यांदा एखादा नेता सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहे. मोदी यांच्या रुपात आपल्याला संवेदनशील, लोककल्याणकारी पंतप्रधान आपल्याला भेटत आहेत, हे आपले सौभाग्यच आहे.

Rajnath Singh : मोदींचे नाव एनडीएच्या गटनेतापदासाठी सर्वोत्तम- राजनाथ सिंह

Rajnath Singh : सध्या भाजपचे नेते राजनाथ सिंह हे भाषण करत आहेत. मी सर्व नवनिर्वाचित उमेदवारांचे अभिनंदन करतो. आज आपण एनडीएच्या संसदीय दलाचा नेता निवडण्यासाठी जमलो आहोत. मोदी यांचे नाव या पदासाठी सर्वोत्तम आहे. मंत्रिमंडळात असताना मी त्यांचा सहकारी म्हणून त्यांची दुरदृष्टी पाहिलेली आहे. त्यांचे काम संपूर्ण देशाने पाहिले आहे. एनडीएच्या सरकारने दहा वर्षे मोदी यांच्या नेतृत्त्वात काम केले, त्याची भरतच नव्हे तर संपूर्ण जगात प्रशंसा होत आहे. 

J P Nadda On Narendra Modi : दहा वर्षांपूर्वी देशात उदासीनता होती, आता मोदींच्या नेतृत्त्वाखाली विकास होतोय!

J P Nadda On Narendra Modi : दहा वर्षांपूर्वी भारत देश उदासीन होता. दहा वर्षांपूर्वी काहीही होत नव्हते. मात्र आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकास होत आहे. गरिबांना ताकद मिळाली, युवकांच्या आशांना पंख फुटले, दलितांना पुढे जाण्यासाठी मार्ग निर्माण करण्यात आला, असे नड्डा म्हणाले.

J P Nadda : संसदेत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक, जे पी नड्डा यांचे भाषण सुरू

J P Nadda Speech : संसदेत सध्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे. सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे भाषण करत आहेत.

J P Nadda : संसदेत एनडीएच्या घटकपक्षांची बैठक, जे पी नड्डा यांचे भाषण सुरू

J P Nadda Speech : संसदेत सध्या एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान नरेंद्र मोदी यांची गटनेता म्हणून निवड केली जाणार आहे. सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे भाषण करत आहेत.

Narendra Modi Oath Ceremony: मोठी बातमी! नरेंद्र मोदी 9 जून रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार!

नरेंद्र मोदी 9 जून रोजी पुन्हा एकदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी सहा वाजता हा शपथविधी सोहळा होईल.

Mahendra Bhavsar : नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी

विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याकडून महेंद्र भावसार यांना उमेदवारी जाहीर


त्यांचा अनुभव पाहता त्यांना उमेदवारी देण्यात आली. 


शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


महायुतीमध्ये बिघाडी नाही. अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होतील.


असे अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण म्हणाले.

एनडीएचे सर्व खासदार संसद भवनात दाखल, लवकरच मोदींची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड!

नवी दिल्ली : देशभरातील एनडीएचे सर्व खासदार, प्रमुख नेते संसदीय दलाच्या बैठकीसाठी संसद भवनात 


संसद भवनातील विविध पक्षांच्या दालनामध्ये त्यांची बैठक होऊन एनडीएतील घटक पक्ष आपापले गटनेते आणि प्रतोद निवडणार 


संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव संसदीय दलाचे नेते म्हणून मांडला जाणार 


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यात येईल 


पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करतील 


नरेंद्र मोदी सर्व खासदारांचं अभिनंदन करतील 


त्यानंतर एनडीएच्या वतीने सरकार स्थापनेचा दावा केला जाणार

मोठी बातमी! शिंदे गटाचे सहा आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात? महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आणि निकालानंतर  शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा केला प्रयत्न, सूत्रांची माहिती 


पक्षफुटी नंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध किंवा विरोधात कुठल्याही प्रकारे प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता


आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची सूत्रांची माहिती


शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी आणि तटस्थ भूमिका घेतली त्यांचाच विचार केला जाणार असल्याची माहिती

Eknath Shinde Capm Meeting : एनडीएच्या खासदारांच्या बैठकीनंतर दिल्लीत शिंदे गटाच्या खासदारांची होणार बैठक

शिवसेनेच्या सर्व खासदारांची दिल्लीत होणार बैठक 


एनडीएच्या खासदारांची बैठक संपल्यावर होणार बैठक 


श्रीकांत शिंदे यांची गटनेतेपदी निवड करण्याकरिता होणार बैठक

मुंबईत फक्त एक जागा जिंकता आल्याने आशिष शेलार दिल्लीत, शीर्षस्थ नेते घेणार आढावा!

मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारही दिल्लीत


आशिष शेलार यांच्याकडून मुंबईचा आढावा घेतला जाणार


मुंबईतही भाजपला फक्त एक जागा जिंकता आल्याने आशिष शेलार यांनाही केंद्रीय नेतृत्वाने दिल्लीत बोलावले

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस-ठाकरे गट आमनेसामने, दोघेही भरणार अर्ज!

कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीत काँग्रेससोबत शिवसेना ठाकरे गटसुद्धा भरणार उमेदवारी अर्ज


 शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार किशोर जैन हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज आज सकाळी 11 वाजता  कोकण भवन येथे भरणार आहेत 


 या आधीच काँग्रेसकडून रमेश कीर यांनी कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे 


 असे असताना आता शिवसेना ठाकरे गटसुद्धा कोकण पदवीधर मतदारसंघात आपला उमेदवार देत आहे 


 एकीकडे इतर जागा महाविकास आघाडी एकत्र लढत असताना कोकण पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आघाडी धर्म पाळला जात नसल्याचा दिसतय

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून आज तीन जण अर्ज भरणार

भाजपकडून आज विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी तीन जण अर्ज भरणार


कोकण पदवीधर - निरंजन डावखरे


मुंबई पदवीधर - किरण शेलार


मुंबई शिक्षक - शिवनाथ दराडे

पार्श्वभूमी

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देश तसेच राज्यातील राजकीय स्थिती बदलली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचा दावा केला जातोय. तर दुसरीकडे निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी भाजपवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आज महायुतीच्या घटकपक्षांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हेदेखील आज दिल्लीमध्ये असून ते भाजपच्या केंद्रीय नेत्यांची भेट घेणार आहेत. या सर्व घडामोडींसह इतरही महत्त्वाच्या घटनांची संपूर्ण माहिती मिळवा एका क्लीकवर...   

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.