BJP Manifesto Live : तीन कोटी घरे बांधणार, महिलांना लखपती करणार, वीज बिल शू्न्य करण्याचा प्रयत्न; निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध

Maharashtra Political News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2024 01:37 PM
Bhandara Lok Sabha Election 2024 : 98 वर्षीय जैनबी कुरेशी ठरल्यात राज्यातील पहिल्या गृह मतदार

भंडारा : दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक जे मतदान केंद्रापर्यंत मतदानासाठी जाण्यास असमर्थ आहेत, अशांसाठी निवडणूक आयोगानं यावर्षी गृह मतदानाची सोय केली आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील 98 वर्षीय जैनबी जब्बर कुरेशी या जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील पहिल्या गृह मतदार ठरल्या आहेत. मागील पाच वर्षात प्रकृती बरी राहत नसल्यानं त्यांनी मतदान केलं नव्हतं. मात्र, यावर्षी निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदान अधिकारी त्यांच्या घरी पोहचलेत आणि त्यांचं मतदान करून घेतलं. राज्यातील लोकसभेचं पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात होत आहे. त्याअनुषंगानं भंडाऱ्यात 7 एप्रिलला झालेल्या गृह मतदान प्रक्रियेत जैनबी कुरेशी यांचं मतदान झालं. 

Yavatmal News : महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ मनसे प्रचारकार्यात

Sudhir Mungantiwar : चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या समर्थनार्थ मनसे प्रचारकार्यात उतरली असून, मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजय संकल्प सभेला हजेरी लावली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि वेकोलीमध्ये स्थानिकांचे प्रश्न सोडविण्याचे वचन फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांचेकडून मिळाले असल्याने आणि राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मनसे पूर्ण ताकदीनिशी महायुतीच्या उमेदवाराला बहुमताने विजयी करेल असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला. यवतमाळच्या वणी उपविभागात मनसेची मोठी ताकद असून चंद्रपूर मध्येही मनसेचा कार्यविस्तार आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळाले आहे.

Abhijit Adsul Meet CM Shinde : अभिजीत अडसूळ मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी दाखल

Thane News : अमरावतीच्या लोकसभेसाठी इच्छुक असणारे अभिजीत अडसूळ मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी दाखल


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ-दीप निवासस्थानी अभिजीत अडसूळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा सुरू


अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी देखील अभिजीत अडसूळ दर्शवली आहे


अमरावतीचा लोकसभेचा तिढा अजून देखील कायम


बच्चू कडू यांच्यानंतर अभिजीत अडसूळ यांचा नवनीत राणांनाच्या विरोधात लढण्याची तयारी

Shindhudurg News : नारायण राणे आणि दिपक केसरकर यांची भेट

सिंधुदुर्ग : केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि दिपक केसरकर यांची केसरकर यांच्या सावंतवाडीतील निवासस्थानी भेट घेतली आहे. तब्बल दहा वर्षांनंतर राणे केसरकर यांच्या निवासस्थानी पोहोचले. 2014 च्या लोकसभा निवडणुकी दरम्यान केसरकर आणि राणे यांच्यात राजकीय मतभेद झाल्यानंतर केसरकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर राणे केसरकर यांचा राजकीय संघर्ष तब्बल दहा वर्ष पाहायला मिळाला. मात्र राज्यात सत्तांतर झाल्यानंतर केसरकर यांनी नारायण राणेंच्या कणकवली निवासस्थानी दाखल होत मैत्रीच एक पाऊल पुढे टाकलं होतं. दरम्यान आज खुद्द नारायण राणेचं केसरकर यांच्या निवासस्थानी दाखल होत केसरकर यांची सदिच्छा भेट घेतली. राणे आणि केसरकर दोघेही एकत्रच आज सावंतवाडी मतदारसंघात प्रचार करणार आहेत.

Yashomati Thakur : यशोमती ठाकूर यांचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल

अमरावती : काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांचा राणा दाम्पत्यावर हल्लाबोल केला आहे. अमरावतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडून संविधानाच्या प्रस्ताविकेच सामूहिक वाचन करण्यात आलं. अमरावतीची लढाई ही बदमाशाच्या विरुद्ध इमानदारीची लढाई अमरावतीची लढाई चोरा विरुद्ध लढाई आहे. अमरावतीची लढाई राणा विरुद्ध आणि अस्तित्वाची लढाई आहे. आज जर आपण चुकलो तर, गुंडाची लँडमाफीयांची अमरावती ओळखल्या जाईल, अशी यशोमती ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे.

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीचा नाशिकच्या जागेवरचा तिढा अद्यापही कायम

मुंबई : नाशिकचे खासदार हेमंत गोडसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभ- दीप निवासस्थानी दाखल 


दोन दिवसांपूर्वी केली होती खासदारश्रीकांत शिंदे यांच्यासोबत चर्चा..


नाशिकची जागा शिवसेनेला सुटावी असा हेमंत गोडसे यांचा आग्रह..


नाशिकचा जागेवरचा तिढा अजून देखील कायम..


जागावाटप संदर्भात चर्चा होण्याची शक्यता.

CM Eknath Shinde in Buldhana : आज मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर

बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यासाठी ते येत आहेत. दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री बुलढाण्यात पोहोचतील आणि त्यानंतर बुलढाणा शहराच्या धाड नाका परिसरात असलेल्या ओमकार लॉन्स येथे महायुतीचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

BJP Sankalp Patra Updates : देशात तीन मॉडेलच्या वंदे भारत ट्रेन धावणार - पंतप्रधान मोदी

BJP Manifesto Live : भाजप देशाच्या कानाकोपऱ्यात वंदे भारत ट्रेनचा विस्तार करणार आहे. वंदे भारतचे तीन मॉडेल देशात धावतील. वंदे भारत स्लीपर, वंदे भारत चेअरकार आणि वंदे भारत मेट्रो. आज अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू असून ते जवळपास शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्याचप्रमाणे उत्तर भारतात एक बुलेट ट्रेन, दक्षिण भारतात एक बुलेट ट्रेन आणि पूर्व भारतात एक बुलेट ट्रेन धावणार आहे. त्यासाठी सर्वेक्षणाचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं आहे.

BJP Manifesto Live : गरिबांसाठी तीन कोटी घरे बांधणार, पंतप्रधान मोदींची घोषणा

PM Modi BJP Manifesto Live : भाजप सरकारने गरिबांसाठी चार कोटी पक्की घरे बांधली आहेत. आता, राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या अतिरिक्त माहितीचा विचार करून, त्या कुटुंबांची काळजी करताना आणखी तीन कोटी घरे बांधणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे.

BJP Sankalp Patra 2024 : पाईपद्वारे घराघरात एलपीजी गॅस पोहोचवणार - पंतप्रधान मोदी

BJP Manifesto 2024 : आतापर्यंत आम्ही प्रत्येक घरापर्यंत स्वस्त गॅस सिलिंडर पोहोचवले आहेत, आता आम्ही प्रत्येक घरात स्वस्त पाईपचा स्वयंपाक गॅस पोहोचवण्यासाठी वेगाने काम करू, असं भाजपच्या जाहीरनाम्याच्या लोकार्पण कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

BJP Manifesto Live : आयटी, शिक्षण, आरोग्य, किरकोळ आणि पर्यटन क्षेत्रातील बचत गटांना प्रशिक्षण : पंतप्रधान मोदी

BJP Manifesto Live : पंतप्रधान मोदी म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत सुमारे 10 कोटी महिला स्वयं-सहायता गटांमध्ये सामील झाल्या आहेत. आम्ही या बचत गटांना माहिती तंत्रज्ञान, शिक्षण, आरोग्य, किरकोळ आणि पर्यटन या क्षेत्रात प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. खऱ्या अर्थाने सामाजिक विकास आणि सामाजिक समावेशासाठी भाजप अथक प्रयत्न करत आहे. आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि ट्रान्सजेंडर समुदायाला आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.

BJP Manifesto Live : ट्रान्सजेंडर समुदायाला आयुषमान भारता योजनेचा लाभ मिळणार - पंतप्रधान मोदी

BJP Manifesto Live : ट्रान्सजेंडर समुदाय आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत येईल असे भाजपने ठरवले आहे, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.

PM Modi Live : भारताच्या सर्व चार स्तंभांना मजबूत करणारं संकल्पपत्र - पंतप्रधान मोदी

PM Modi Live : भाजपचं संकल्पपत्र विकसित भारताच्या सर्व चार मजबूत स्तंभांना - युवा शक्ती, महिला शक्ती, गरीब आणि शेतकरी सक्षम करते. राहणीमान, जीवनाचा दर्जा आणि नोकऱ्या वाढवण्यावर आमचं लक्ष आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे.

Rajnath Singh : मोदींची गॅरंटी 24 कॅरेट सोन्यासारखी - राजनाथ सिंह

पंतप्रधान मोदींची गॅरंटी मोदींची गॅरंटी 24 कॅरेट सोन्यासारखी आहे, असं राजनाथ सिंह यांनी म्हटंल आहे.

Rajesh Pawar : विकास कामावरून आमदार राजेश पवार यांना धरले धारेवर

नांदेड : भाजपाचे आमदार राजेश पवार हे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नायगाव मतदारसंघात गाठीभेटी घेत आहेत. नायगाव मधील गोदमगाव या गावात राजेश पवार प्रचारासाठी गेले असता, गेल्या पाच वर्षात तुम्ही गावाला कितीदा भेट दिली, असा सवाल करत गावकऱ्यांनी प्रश्न विचारले, आमदार राजेश पवार चर्चेला तयार झालेला असतानाही गावकऱ्यांनी मात्र विरोध दर्शवत कोणतीही चर्चा केली नाही, गावकऱ्यांच्या नाराजी मुळे आमदार राजेश पवार यांनाआल्या पावली गावातून बाहेर पडावे लागले आहे.

Sangli News : विशाल पाटील मंगळवारी आधी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज भरणार

सांगली : विशाल पाटील मंगळवारी आधी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्ज भरणार


जर काँग्रेस चिन्हावरच्या उमेदवारीचा निर्णय झालाच नाही तर पुन्हा विशाल पाटील अपक्ष अर्ज भरण्याची शक्यता 


काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची विशाल पाटील यांना अजूनही आशा


मंगळवारी गणपती मंदिर पासून काँग्रेस भवन रॅली काढून शक्तिप्रदर्शन करत विशाल पाटील अर्ज भरणार

JP Nadda Live : पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला : जे.पी. नड्डा

BJP Manifesto Live : समाजातील प्रत्येक वर्गांसाठी भाजप सरकारने काम केलं. राम मंदिरासाठी पंतप्रधान मोदींचं मोठं योगदान आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला, गावागावात रस्ते झाले, असं जे.पी. नड्डा यांनी म्हटलं आहे.

BJP Manifesto Lok Sabha Election 2024 : आज प्रसिद्ध होणार भाजपचा जाहीरनामा

BJP Manifesto Lok Sabha Election 2024 : आज प्रसिद्ध होणार भाजपचा जाहीरनामा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचं निमित्त साधून मतदारांसमोर जाहीरनामा मांडणार

Imtiyaz Jalil : खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचाराच्या रणसंग्रामात स्वतः उतरणार.

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे आज संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांच्या प्रचारासाठी आज शहरात  बैठका घेणार आहेत. गेल्या महिन्याभरात ते चौथ्यांदा आज संभाजीनगर दौरा करत आहे. एकीकडे वंचितने दिलेला उमेदवार मुस्लिम समुदायातील असल्याने जलील यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत वंचित आघाडी जलील यांच्यासाठी डोकेदुखी ठरते की काय, हे पाहाणं तितकच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे एमआयएमला संभाजीनगरची जागा टिकवणं हे मोठं आव्हान असणार आहे.

Bollywood Actor Govinda Road Show : यवतमाळ गोविंदाची रोडशो रॅली

Bollywood Actor Govinda Road Show in Yavatmal : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ शिंदे गटाचे नेते सिनेअभिनेते गोविंदा यांची आज यवतमाळ शहरात रोडशो रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने गोविंदा याला पाहण्यासाठी गर्दी केली. अनेकांनी गोविंदासोबत सेल्फी काढला. 


 

Yavatmal News : पैनगंगा नदी पात्रात काकूसह दोन पुतणींचा बुडून मृत्यू, कवठा बाजार येथील घटना

यवतमाळ : निर्माल्य विसर्जनासाठी गेलेल्या काकूसह दोन मुलींचा पैनगंगा नदी पात्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आर्णी तालुक्यातील कवठा बाजार येथे घडली. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (35), कु. अक्षरा निलेश चौधरी (13), कु. आराध्य निलेश चौधरी (11) अशी मृतकांची नावे आहेत. नदी पात्रात अवैध रेती उत्खननमुळे खोल खड्डे पडल्याने यात पडून मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. 


एका चिमुकलीचा तोल जाऊन ती पडली. त्यानंतर तिला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी गेली. दोन्ही चिमुकल्या बुडत असल्याचे पाहून काकूने मदतीसाठी धाव घेतली. मात्र त्या काकूदेखील बुडाल्या. घटनेनंतर गावकऱ्यांनी नदीपात्राकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत तिघीही खोल खड्ड्यात बुडाल्या होत्या. 
Ratnagiri Narayan Rane Nomination Form : उमेदवारीची घोषणा नाही पण, नारायण राणेंनी घेतले चार उमेवारी अर्ज

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Election 2024 : रत्नागिरी - सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण? याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. एकीकडे नारायण राणे यांनी जोरात प्रचाराला सुरूवात केली आहे. तर, दुसरीकडे इच्छुक उमेदवार किरण सामंत यांनी मुंबईत ठाण मांडलं आहे. पण, इकडे नारायण राणे यांनी मात्र उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार नारायण राणे यांच्या प्रतिनिधींनी चार उमेदवारी अर्ज घेतले आहेत. नारायण राणेंच्या नावाची अद्याप तरी घोषणा नाही. पण, भाजपकडून महायुतीचे उमेदवार राणेच असतील असा दावा केला जात आहे. दरम्यान, राणे यांच्यासह विनायक राऊत यांनी चार, वंचितच्या उमेवाराकडून एक, अपक्ष उमेदवाराकडून एक असे एकूण 17 उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतले गेले आहेत. 

Vasantrao Chavan : भाजपमध्ये या म्हणून अशोकराव चव्हाणांकडून ऑफर - वसंतराव चव्हाण 

नांदेड : काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण यांनी आज मरळक येथे प्रचाराचा नारळ फोडत सभा घेतली त्यात त्यांनी अशोक चव्हाण यांनी मला भाजपात येणाची ऑफर दिल्याचा दावा केला. माझं अभिनंदन करणार की नाही, असे सुद्धा चव्हाण म्हणाल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यानंतर मी तुमच्या सोबत कसायाला येऊ, असे देखील मी अशोक चव्हाण यांना सांगितल्याचा दावा वसंत चव्हाण यांनी मरळकच्या सभेत केला आहे.

Aditi Tatkare : लेक आणि सून यामध्ये काहीच फरक नसतो - आदिती तटकरे
रायगड : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य मूळचे पवार आणि बाहेरचे पवार या विधानावर मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलंय की,  राजकारण आणि निवडणुका एका बाजुला असतात. घर आणि नातेवाईक एका बाजुला असतात. घरातल्या व्यक्तीने जर राजकीय भूमिका घेतली असेल त्यामुळे घरातला आणि बाहेरचा हे उल्लेख होण निश्चितच दुर्दैव आहे. आज सूनेत्रा वहिनी 30 वर्षापासून अधिक त्या घरातल्या सून आहेत, लेक आणि सून यामध्ये काहीच फरक नसतो. सून ही लेकी सारखीच असते. राजकारण एका बाजूला कुटुंब एका बाजूला, मुलगी असो किंवा सून असो त्यांच्या घरावर तितकाच अधिकार आहे, असंहील आदिती तटकर यांनी म्हटलं आहे.
PM Modi Maharashtra Tour : पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 एप्रिलला परभणीत

Parbhani News : परभणीत मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायला आलेलो आहे, जातीपातीच्या नाही, इथला खासदार ना निधी खर्च करतो, ना संसदेत जातो, असा खोचक टोला महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांना लागवलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः माझ्या प्रचारासाठी येत्या 20 एप्रिल रोजी परभणीत येणार असल्याची माहिती ही महादेव जानकर यांनी भर सभेत दिली आहे.

Nashik Election Public awareness : लग्न पत्रिकेद्वारे केली जातेय ' मतदान ' जनजागृती..

नाशिक : लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी भारत सरकार मार्फत विविध जनजागृतीचे उपक्रम राबविले जात असतांना नाशिकच्या नितीन  पाटील या उपक्रमशील शिक्षकाने आदियोगी फाऊंडेशन च्या माध्यमांतून लग्न पत्रिकेद्वारे मतदानाची जनजागृती करत आहेत. चि.मतदान आणि चि.सौ.का.लोकशाही यांचा शुभ विवाह असल्याने ' आम्ही भारताचे लोक ' यांच्या विनंतीला मान देवून मतदान करायला यायचं हं असे आग्रहाचे निमंत्रण दिले जात आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात गेल्या 15 दिवसांपासून ही अभिनव लग्नपत्रिका ते वाटत असून लोकशाहीच्या अनोख्या लग्नपत्रिकेने मतदारांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मुंबईच्या दिशेनं रवाना

Kolhapur News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहाटे मुंबईच्या दिशेनं रवाना


धैर्यशील माने यांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली


हातकणंगले लोकसभा मतदार संघात रात्रभर लावल्या जोडण्या


मध्यरात्री आमदार विनय कोरे आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची घेतली भेट


रात्री 1 वाजता मुख्यमंत्री वारणानगर इथं विनय कोरे यांच्या घरी


तर रात्री अडीच वाजता जयसिंगपूर इथं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर घरी भेट

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...


 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.