Maharashtra Live Update: काँग्रेस नेते करणार दुष्काळी भागाची पाहणी, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील महत्त्वाच्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा, या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेतला जातो.
Mumbai News: मुंबई शिक्षक मतदार संघावरून आता महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने येण्याची शक्यता आहे. मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये राष्ट्रवादीने शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी घोषित केलेली आहे. या उलट भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य व शिक्षक नेते अनिल बोरनारे यांनी मुंबई शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे ठरविले असून भाजपाकडून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता भाजप व राष्ट्रवादीमध्ये शिक्षक मतदार संघाच्या उमेदवारीवरून खडाजंगी होऊ शकते.
Nagpur News: नागपूर अमरावती महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसला आग, तळेगाव जवळची घटना
शेगाव येथून देव दर्शन करून बसमध्ये 18 प्रवाशी नागपूरला परत येत होते तेव्हा ही घटना घडली
गाडीतून धूर निघत असल्याने काही प्रवाशांना प्रसंगावध दाखवल्याने बस थांबवून प्रवाशी उतरल्याने सर्व प्रवाशांचे जीव वाचले
मात्र ट्रॅव्हल्स मालकाने बुकिंग करतेवेळी दुसऱ्या बसचा फोटो पाठवला व प्रत्यक्ष भंगार बस पाठवली, हि खाजगी बस प्रवासयोग्य नसतांना आम्हाला देण्यात आल्याने हा अपघात घडल्याचे घटनेत वाचलेल्या प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी या प्रवाशांनी केली आहे.
Pune Porsche Car Accident : पुणे ब्लड सँपल प्रकरणी आज दुपारपर्यंत कारवाई होणार
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे कृत्य केल्याच नमूद
डॉक्टर आणि शिपाई यांनी गंभीर स्वरूपाचे केलेलं कृत्य पाहता आज दुपारी 3 पर्यंत निलंबनाची कारवाई होण्याची दाट शक्यता
ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी तयार करण्यात आलेल्या एसआयटीच्या प्रमुख डॉ पल्लवी सापळे यांनी आपला अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवातकर यांना सादर केला आणि आता तो अहवाल वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना देखील प्राप्त झाला
अहवाल प्राप्त झाल्याने तातडीने क्लास वन अधिकारी डॉ अजय तावरे यांच्या कारवाई बाबत मुख्यमंत्र्यांना कळवण्याची प्रक्रिया सूरू तर डॉ श्रीहरी हरनोळ आणि शिपाई घटकांबळे यांचें तातडीने शासन स्तरावर थोडयाच वेळात निलंबन होणार
एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांची माहिती
Buldhana News : 26 मे 2024 रोजी मुंबईतील पायधुनी पोलीस स्टेशन हद्दीत एका 13 वर्षीय मोहम्मद आसिफ या बालकाचे अपहरण झाल होतं. याबाबत पायधूनी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांना हा बालक ट्रेन नं 12869 मध्ये असल्याचं समजल्यावर त्यांनी तात्काळ कोलकाता कडे जाणाऱ्या सर्व स्टेशन्स ला सूचना दिली. सूचनेनुसार शेगाव येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी गुप्तहेर पाठवून अपहरण झालेलं बालक एस 7 कोच मध्ये बसलेला असल्याचं माहीत करून शेगाव ला ट्रेन येताच त्याला रेस्क्यू केलं व त्याची सूचना मुंबई पोलिसांना दिली, त्यावरून काल त्या बालकाला विधिवत कार्यवाही पूर्ण करून मुंबई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या सहा वर्षीय चिमुकल्याच अपहरणकर्त्या च्या तावडीतून वाचवल मात्र अपहरणकर्ते सापडले नाहीत. पोलिसांच्या कामगिरी ने पुन्हा आरपीएफ विभागाचे नाव उंचावले आहे.
Santosh Bangar : कळमनुरी विधानसभेचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या हिंगोली शहरातील घरासमोर 27 मे रोजी फायरिंग झाले असल्याचं ट्विट ठाकरे गटाच्या सोशल मीडिया समन्वयक आयोध्या पोळ यांनी केल आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत राहतात आता त्यांच्या घरासमोरच एका व्यक्तीने शिवीगाळ करत गोळीबार केली आसल्याने ट्विट आयोध्या पोळ यांनी केला आहे या ट्वीटमध्ये पुढे म्हटलं आहे की, सत्ताधारी आमदार महाराष्ट्राच्या जनतेला काय खरं काय खोटं हे सांगतील का? असा सुद्धा सवाल आयोध्या पोळ यांनी आमदार बांगर यांना विचारला आहे. यामध्ये आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया अजून समजू शकली नाही.
Dhule News : उन्हाची तीव्रता वाढत असल्यानं शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतातील पाणी साठ्याचे वेगात बाष्पीभवन होत आहे. तसेच, पाणीपुरवठा करताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे जास्तीचा पाणी कपात करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यामुळे धुळेकर नागरिकांना पाणीटंचाईचा सामना जास्त प्रमाणात करावा लागणार आहे, पाण्याचा प्रश्न गंभीर झाल्याने आधीच शहरात आठ ते नऊ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे त्यात अधिक वाढ होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही.
Beed News : मागच्या काही दिवसांमध्ये बीड जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत अशातच एक व्यक्ती दुचाकी विकण्यासाठी बाजारात आलाय अशी माहिती पोलिसाला भेटल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि चोरीच्या दहा दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना एक्झाम चोरीची हिरो होंडा पॅशन मोटरसायकल विक्रीसाठी शहरात घेऊन आल्याची माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी बालाजी पायाळ याला ताब्यात घेतले. पाटोदा तालुक्यातील थेरला येथील या गावातील या तरुणाने दहा मोटासायकल चोरल्याची तपासात निष्पन्न झाले या दहा मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केले असून आणखी या मोटरसायकल चोरीचे रॅकेट आहे का याचा तपास बीड स्थानिक गुन्हे शाखा करत आहे.
Maharashtra News: राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता राज्यातील वेगवेगळ्या भागात जाऊन दुष्काळाची पाहणी करून सरकार कडून काय उपाययोजना केल्या जात आहे, यावर नजर ठेवण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन केली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मराठवाडा साठीच्या दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष राहणार आहेत.
विदर्भातील नागपूर विभागासाठी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती असेल.
तर अमरावती विभागासाठी आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वातील समिती पाहणी करेल.
उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात दुष्काळ पाहणी समितीची अध्यक्षता करतील.
तर पश्चिम महाराष्ट्रासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती काम करेल.
कोकण विभागासाठी नसीम खान यांच्या नेतृत्वात दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Pune Porsche Accident News Updates: अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी अटकेत असलेला डॉ अजय तावरेच्या अडचणी वाढणार आहेत. डॉक्टर तावरेने 2018 मध्येही असाच एक चुकीचा रिपोर्ट दिल्याचा आरोप शिरुरच्या मुलानी आणि शेख कुटुंबीयांनी केलाय. या कुटुंबियांचे आरोप नेमके काय आहेत, जाणून घेऊया.
रेहाना शेख यांचा 11 ऑगस्ट 2018ला प्रसूती नंतर मृत्यू झाला. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झाला, मात्र संबंधित डॉक्टरने रक्त उपलब्ध करून ठेवलं नव्हतं. डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने हा मृत्यू झाल्याचा आरोप रेहाना यांचे भाऊ आणि पती ने केला होता. त्यावेळी डॉक्टर अजय तावरेंच्या अध्यक्षतेखाली चौकशी नेमली गेली, मात्र तावरेंनी 27 नोव्हेंबर 2018ला डॉक्टरांच्या बाजूनं अहवाल दिला. मग या कुटुंबाने ब्लड बँकेतून 21 जानेवारी 2019 रीतसर माहिती घेतली, तेंव्हा डॉक्टर तावरेंनी पैश्यांसाठी चुकीचा अहवाल दिल्याचं या दोन्ही कुटुंबियांच्या लक्षात आलं.
Maharashtra Drought: महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस होत असताना, दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळतेय. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पंढरपूरमधील उजनी धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेलीय. तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे..धरणातील पाणी आटल्याने धरणाच्या जमिनीला भेगा पडल्याचं दृश्य दिसतंय.तर धरणातील पाणी कमी झाल्याने मंदिरंही आली बाहेर.
Sangli News : शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथे शेतकऱ्यावर गव्याने पाठीमागून येऊन गंभीर हल्ला केल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडलीय. खुंदलापूर येथे अभयारण्याच्या सीमेलगत खातवाड जवळ मालकी शेतात जनावरे सोडण्यासाठी गेलेल्या ठकुजी गंगाराम शेळके (वय 65) या शेतकऱ्यांवर गव्याने हल्ला केला. गव्याने शेतकऱ्यांवर हल्ल्या केल्याची माहिती गावात समजताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गव्याने जखमी शेळके यांना शेतात फेकून दिल्याने मोठी दुर्घटना टळली. त्याच्या पाठीत खोल जखम झाली आहे. शेजारीच घरात काम करत असलेल्या लोकांनी आरडाओरडा केल्याने गवा डोंगराच्या दिशेने पळून गेला. घटनास्थळावरून खासगी वाहनाने जखमी शेळके यांना मणदूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले व याची माहिती पोलिस पाटील धाकलू गावडे यांनी वन विभागास दिली. वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत याची माहिती वरिष्ठांना दिली. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. प्रज्ञा पाटील यांनी प्रथमोपचार करून वन विभागाने पुढील उपचारासाठी कन्हाड येथील कृष्णा रुग्णालयात पाठवले. या घटनेने पुन्हा एकदा खुंदलापूर व मणदूर गावासह परिसरात भीतीचे वातावरण आहे.
Pune News : पुणे येथे एका अल्पवयीन मद्यपी कारचालक मुलाने दुचाकीस्वार दोघांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहे. पुण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यात देखील मद्यपी चालकांवर कारवाईच्या सुचना पोलिसअधीक्षक यांनी दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या 4 दिवसात 50 पेक्षा अधीक मद्यपी वाहन चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सर्वच पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची मोहिम राबविण्यात येत आहे. या कारवायांसाठी पोलिसांना माऊथ अनालायझर हे उपकरण उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याद्वारे चालक मद्य पिला आहे किंवा नाही हे कळते. काही ठिकाणी संशयित वाहन चालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. गेल्या चार दिवसात पोलिसांनी 50 पेक्षा अधिक जणांवर मद्य पिऊन वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. यापुढील काळात देखील ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.
Maharashtra Drought: महाराष्ट्रात एकीकडे मान्सूनपूर्व पाऊस होत असताना. दुसरीकडे विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती पाहायला मिळतेय. यंदाच्या भीषण दुष्काळामुळे पंढरपूरमधील उजनी धरणातील पाणी पातळी नीचांकी पातळीवर गेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणात पाच टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील पाणी आटल्याने धरणाच्या जमिनीला भेगा पडल्याचं दृश्य दिसतंय.तर धरणातील पाणी कमी झाल्याने मंदिरंही आली बाहेर.
Maharashtra Weather Updates : एकीकडे केरळमध्ये मान्सूनची चाहूल लागली असताना महाराष्ट्रासह उत्तर भारतात उन्हाचा तडाखा जाणवतोय. रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला आहे. त्यामुळे आगामी 2-3 दिवसांत मान्सून केरळमध्ये प्रवेश करण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांची होरपळ होत आहे. हवामान खात्याने पुढील एक ते दोन दिवस विदर्भात तापमान वाढीची शक्यता वर्तवली आहे. या काळात कमाल तापमान 44 ते 49 अंशापर्यंत वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Monsoon Updates : कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असून आता सर्वसामान्यांना पावसाचे वेध लागले आहेत. उन्हाच्या तडाख्यापासून लवकरच सुटका होणार आहे. कारण, येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबईत पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओदिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Palghar Local Issue: विरार : पश्चिम रेल्वेच्या पालघर स्टेशनजवळ काल संध्याकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गुजरातहून मुंबईकडे जाणारी मालगाडीचे डबे घसरल्याने ट्रॅक नंबर दोन तीन आणि चार हे नादुरुस्त झाले होते. त्यामुळे अप आणि डाऊन ची दोन्हीही रेल्वे सेवा प्रभावित झाले आहे.
विरार ते चर्चगेट ही सेवा सुरळीत सुरु आहे . मात्र विरार ते डहाणू ही उपनगरीय सेवा बंद आहेत. अप आणि डाऊनच्या काही ट्रेन रद्द ही करण्यात आल्या आहेत. तर लांब पल्ल्याच्या ट्रेन विलंबाने धावत आहेत. त्या विरार ते डहाणू दरम्यानच्या रेल्वे स्थानकावर थांब घेत आहेत. बोईसर येथे औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्यांचे प्रवाशांचे हाल होत आहेत. अनेक प्रवाशी विरार रेल्वे स्थानकावर सकाळी आले आहेत.
Pune Porsche Accident: पुणे : पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी 'एआय'द्वारे जिवंत करणार अपघाताची घटना घडली आहे. डिजिटल पुराव्यासाठी पोलिसांचा मोठा निर्णय, कल्याणीनगर अपघातातील दोषींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर देण्यात आला आहे.
'आर्टिफिशल इंटेलिजन्स'द्वारे अपघाताची घटना जिवंत करणार आहेत. 'एआय'मधील तज्ज्ञांसह वाहन आणि रस्ते वाहतुकीशी संबंधित केंद्रीय संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिका , पोलीस प्रशासन, उत्पन्न शुल्क विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने शहरातील डान्सबार, पब , बार, अनधिकृत धाब्यांवर तोडक कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विभाग प्रमुख राहूल गेटे यांच्या पथकाकडून रात्रभर ही कारवाई करण्यात आली. वाशी , नेरूळ , सीबीडी येथील 10 डान्स बार, 5 पब, लिकर बार, अनधिकृत धाब्यांवर कारवाई केली आहे. चुकीच्या पद्धतीने बांधकाम करणे, परवानही पेक्षा मोठा बोर्ड लावणे, वेळेचे बंधन न पाळता डान्सबार सुरू ठेवणे आदी कारणास्तव ही कारवाई करण्यात आली. यावेळी पब , डान्स बार मधील नियमबाह्य बांधकाम तोडण्यात आले.
Sangli News : कापसाचे गड्ढे घेऊन कोल्हापूरकडे निघालेला चौदाचाकी ट्रक मिरज-पंढरपूर रस्त्यावर उलटला. मात्र, सुदैवाने चालक आणि क्लिनर हे यातून बचावले.वर्धा येथून कापसाचे गढे घेऊन कोल्हापूरला निघालेला चौदाचाकी ट्रक ओव्हरलोड असल्याने मिरज- पंढरपूर रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटलं. ट्रक पलटी झाल्यानंतर ट्रकमध्ये अडकलेला चालक इम्रान महंमद आणि क्लिनर मुश्रीफ अली हे ट्रकच्या पुढील बाजूस असलेली काच फोडून बाहेर पडले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली.सुदैवाने चालकासह दोघेही बचावले. अपघातात ट्रकच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. याबाबत पोलिसांत मात्र नोंद नसल्याचे सांगण्यात आले. क्रेनच्या साह्याने ट्रक उचलून कापसाचे गड्ढे दुसऱ्या ट्रकमधून कोल्हापूरला नेण्यासाठी चालकाचे प्रयत्न सुरू होते. ट्रक उलटत असलेला व्हिडीओ मात्र सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता.
PM Modi : 10 वर्षातल्या घोटाळ्यांचे जप्त केलेले पैसे गरिबांना वाटणार असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलंय. 10 वर्षात 2 हजार कोटी जप्त केल्याचं मोदी म्हणाले. लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी त्यांनी एबीपी नेटवर्कला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. गांधी परिवाराला आपण वेळोवेळी मदत केल्याचंही मोदींनी सांगितलंय.
Palghar News : पालघर रेल्वे स्थानकावर झालेल्या मालगाडी अपघाताचा परिणाम पश्चिम रेल्वेवर दिसून येतोय. पहाटेपासूनच डहाणू ते विरार लोकलसेवा ठप्प आहे. त्यामुळे या भागातून मुंबईकडे कामासाठी येणाऱ्यांचे कमालीचे हाल होत आहेत. गाड्या बंद असल्यामुळे प्लॅटफॉर्मवर कामावर जाणाऱ्यांची गर्दी वाढू लागलीय.
पार्श्वभूमी
Maharashtra News LIVE Updates : राज्यासह देशातील आजच्या ठळक बातम्या...
1. माझे आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित, मी निवडणुकांचे कल किंवा निकालावर लक्ष देत नाही, पंतप्रधान मोदींचा दावा, थोड्यात वेळात मोदींची एक्स्लुझिव्ह मुलाखत
2. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी उपमुख्यंमत्री अजित पवार यांची नार्को टेस्ट करा, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांची मागणी, अजितदादांना बोलायला 4 दिवस का लागले, दमानियांचा सवाल
3. पुण्यातील ससून रुग्णालयातील प्रकरणात फडणवीसांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मागणी
4. ससूनमधल्या ब्लड सॅम्पल फेरफारप्रकरणी चौकशी समितीच्या अध्यक्षा पल्लवी सापळेच वादात, भ्रष्टाचाराचे आरोप असल्याचं सांगत मविआच्या नेत्यांनी केला नियुक्तीला विरोध
5. जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टलरी प्रकल्पाबाबत नोटीस, याआधी ईडीकडून या प्रकरणात अजित पवारांना क्लीनचिट
6. भाजपच्या 400 पारच्या घोषणेवरुन छगन भुजबळ आणि निलेश राणेंमध्ये जुंपली, मोदींच्या वक्तव्यावर आक्षेप घेणारे भुजबळ कोण, निलेश राणेंचा संताप
7. अजितदादांना देवाची आठवण म्हणजे तडीपारी नक्की, नाना पटोलेंचा टोला; लोकसभा निवडणुकीत काय होईल हे ब्रह्मदेवही सांगू शकत नाही, या अजितदादांच्या वक्तव्यामुळे संभ्रम
8. निरंजन डावखरेंची पदवीधर विधानपरिषदेची जागा भाजपच लढणार, आशिष शेलारांचा दावा; तर त्या जागेसाठी मनसेकडून अभिजीत पानसेंची उमेदवारी जाहीर
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -