Maharashtra Live Updates: पुणे अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 28 May 2024 01:39 PM
Pune Accident News: पुणे अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर

Pune Accident News: कल्याणीनगर अपघातप्रकरणी इन्स्टाग्रामवर रॅप साँग तयार करणारा तरुण चौकशीला गैरहजर राहिला. पोलिसांनी या तरुणाला चौकशीला हजर राहण्यासाठी आणखी एक नोटीस पाठवली होती. पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने त्याला नोटीस पाठवून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र तो चौकशीसाठी  गैरहजर राहिला. रॅप साँग बनवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ४१ A नोटीस अंतर्गत त्याला पुण्यातील शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं होतं. माझ्यावरचा गुन्हा मागे घ्या अशी मागणी आर्यनने केली होती. 

Bhandara Temp:  भंडाऱ्यात आज सर्वोच्च तापमानाची नोंद

Bhandara Temp:  विदर्भातील तापमानात मागील काही दिवसात उच्चांकी नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे. यामुळं नागरिक अक्षरश: हैराण झालेले आहेत. आज भंडारा जिल्ह्यात 45 अंश डिग्री सेल्सिअस अशा सर्वाधिक तापमानाची नोंद हवामान विभागानं केली आहे. यावर्षीचा सर्वाधिक हॉट दिवस म्हणून भंडाऱ्याची आज नोंद करण्यात आली. महत्त्वाचे काम असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. त्यामुळं मुख्य वर्दळीच्या मार्गावर आणि चौकातही तुरळक गर्दी भंडाऱ्यात बघायला मिळत आहे....

Pune Accident News : ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी Not Reachable, रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्याचा शोध सुरू

Pune Accident News : ससून हॉस्पिटल मधील एक कर्मचारी not reachable असल्याची चर्चा आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचाऱ्याचा पोलीस शोध घेत आहे.  मात्र कोणीही बेपत्ता नसल्याचा पोलिसांचा दावा आहे. Cctv फुटेज मध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना चौकशी साठी  बोलावणार आहे. जे येणार नाहीत त्यांना घेऊन येणार , अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे.  

Arvind Kejriwal :  अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी

Arvind Kejriwal :  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अंतरिम जामिनाची मुदत सात दिवसांनी वाढवण्याची मागणी केलीय. मात्र तातडीची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिलाय. ही सुनावणी सरन्यायाधीशांसमोरच घेण्याची सूचना सुट्टीकालीन कोर्टाने केलीय. 

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत परदेशात, इंडिया आघाडीची 1 जूनच्या बैठकीला राहणार गैरहजर

Uddhav Thackeray :  इंडिया आघाडीची 1 जूनला बैठक होत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. परदेशात असल्याने ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत उपस्थित राहणार नाहीत. तर शरद पवार मात्र या बैठकीला जाणार आहेत. पवार सध्या काश्मीर दौऱ्यावर आहेत. तिथून पवार दिल्लीत बैठकीसाठी जाणार आहेत. 

Election 2024: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणूक, महायुतीत चार जागांवर खलबतं

Election 2024: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांवर निवडणूक होत आहे. महायुतीत आज या चार जागांवर खलबतं होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांत चारही जागांवर महायुती नावाांची घोषणा करेल अशी शक्यता आहे. एबीपी माझाला उच्चपदस्थ सूत्रांनी ही माहिती दिलीय. तसंच विधानपरिषदेत महायुती मनसेला मदत करणार का याकडे राजकीय वर्तुळात लक्ष लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेण्याची शक्यता आहे. दुपारी १ वाजता ही चर्चा होण्याची शक्यता आहे. 

Pune Accident News: पोर्श’ मोटारीच्या तपासणीतून अपघाताचे धागेदोरे हाती, अपघात कसा झाला याचा Video पोलीसांच्या हाती

Pune Accident News: ‘पोर्श’ मोटारीच्या तपासणीतून अपघाताचे धागेदोरे हाती लागणार  आहेत. मोटारीतील कॅमेऱ्याच्या चित्रीकरणातून अपघात कसा झाला, हेही स्पष्ट होणार आहे. आरटीओ अधिकाऱ्यांसह ‘पोर्श’ कंपनीच्या पथकाने मोटारीची सोमवारी तपासणी पूर्ण झाली आहे. मोटारीच्या इलेक्ट्रॉनिक डेटासह पुढील आणि मागील बाजूच्या कॅमेऱ्यातील चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. मोटारीचा ब्रेक किती वेळा दाबला? अपघातावेळी मोटारीचा वेग किती होता? किती वेळा ॲक्सिलेटर देण्यात आला? या बाबी स्पष्ट होणार

Nashik News : राज्यात दुष्काळाचं भीषण संकट, मुख्यमंत्र्यांची दुष्काळासंदर्भात महत्त्वाची बैठक

Nashik News : राज्यात दुष्काळाचं भीषण संकट आहे.. दुष्काळा संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी 11 वाजता आढावा बैठक होणार आहे.. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे.. जिल्ह्यातील धरण साठा केवळ16 टक्केच शिल्लक आहे..त्यामुळे इथल्या दुष्काळचा सामना करण्यासाठी नियोजनाकरता मुख्यमंत्र्यांची ही बैठक होणार आहे.. 

Dharavi Fire :  मुंबईतील धारावीत भीषण आग, सहा जण जखमी

Dharavi Fire :  मुंबईतील धारावीत भीषण आग लागली आहे. या आगीत सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहे. जखमींनी जवळील सायन रुग्णालयात दाखल केले आहे. 





 Lok Sabha Election:  लोकसभा निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बदल, सुमार कामगिरी असणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार

 Lok Sabha Election:  लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती मिळते... सुमार कामगिरी असणाऱ्या विस्तारकांना आता भाजप घरचा रस्ता दाखवणार असल्याची माहिती आहैे.. जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विस्तारक योजनेची पुन्हा फेररचना केली आहे.. त्यामुळे सध्या विस्तारकांना पुढील सुचना मिळेपर्यंत थांबण्याचे निर्देश देण्यात आलेत..

Delhi Airport Bom Threat:  दिल्ली विमानतळावर पहाटे विमानात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन

Delhi Airport Bom Threat:  दिल्ली विमानतळावर पहाटे विमानात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा फोन आलाय. इंडिगोच्या दिल्ली वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन आलाय. त्यामुळे उड्डाणाच्या तयारीत असलेलं विमान तातडीने धावपट्टीवर थांबवण्यात आलंय. सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आलंय. घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि इतर यंत्रणा दाखल झाल्या आहेत. 


 





Vidarbha Heat Wave:  पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट, दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नका

Vidarbha Heat Wave:  पुढील काही दिवस पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट असेल.  नवताप सुरू झालाय. त्यामुळे काहिली कायम राहील. नागपूर वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. यंदाच्या उन्हाळ्यात पहिल्यांदाच विदर्भात 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर वेध शाळेने विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ,, वाशीम अकोला, अमरावती या जिल्ह्यांना उष्णतेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवस तापमान चढेच राहील, त्यामुळे दुपारच्या वेळी कामाशिवाय बाहेर पडू नका असा इशारा देण्यात आलाय.

Sambhaji Nagar News: गंगापूर तालुक्यात रोज जवळपास  दीडशे टँकरने पाणी पुरवठा

Sambhaji Nagar News:  दुष्काळाशी सामना करणाऱ्या मराठवाड्यासाठी  सकारात्मक बातमी.... छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण दुष्काळ आहे.त्यात गंगापूर तालुक्यात रोज जवळपास  दीडशे टँकरने पाणी पुरवठा केला जातो.त्यातील 80 टँकर सुमित मुंदडा आपल्या विहिरीतून मोफत देतात.त्यासाठी त्यांनी आपल्या शेतीचं पाणी बंद केले. त्यांनी मोफत दिलेल्या पाण्यामुळे गंगापूरमधील पन्नास हजार लोकांची तहान भागवली जाते 

Jaykwadi Dam:  जायकवाडी धरणात केवळ पाच टक्केच पाणीसाठा

Jaykwadi Dam:  आशिया खंडातील सर्वात मोठं धरण असलेल्या जायकवाडी धरणात आता अवघा पाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.. धरणातील पाणी आटल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे धरणाला भेगा पडल्यात..धरण आटल्याने पाण्यात गेलेली मंदिर आता बाहेर आलीत..या धरणासाठी पूरनर्वसन करण्यात आलेल्या 102 गावांचे अवशेषही पहायला मिळतायत

Navi Mumbai Shortage: आज नवी मुंबईत पाणीपुरवठा बंद राहणार

Navi Mumbai Shortage:  नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर मान्सून कामं करण्यासाठी आज सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा 14 तास बंद राहणार आहे. त्यामुळं आज संध्याकाळी नवी मुंबई महापालिका क्षेत्रात होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसंच नवी मुंबई परवा कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे.

Monsoon 2024 : यंदा धो-धो बरसणार! राज्यात मान्सून जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दाखल होण्याची शक्यता

Monsoon 2024 : शेतकरी आणि शहरी माणूस.. दोघांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रासह देशभरात यंदा चांगला पाऊस होणार आहे. भारतात यंदा सरासरीच्या 106 टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतीसाठी पुढचं वर्षभर पाणीसाठा कमी पडणार नाही अशी अपेक्षा आहे. दरम्यान, महाराष्ट्रात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मान्सून पोहोचेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. 

पार्श्वभूमी

Pune Accident :  पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात पोलिसांनी केलेल्या कारवाईची...पोलिसांच्या या कारवाईनंतर या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे समोर आलंय...अल्पवयीन आरोपीच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आलीय...त्यात ससून रुग्णालयातले डॉ. अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोर यांचा समावेश आहे...याप्रकरणात ससून रुग्णालयाचा शिपाई अमित घटकांबळे यालाही अटक  करण्यात आलीय.. घटकांबळे याच्याच माध्यमातून पैशांची देवाणघेवाण झाल्याचा आरोप आहे..या तिन्ही आरोपींनी ३० मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय..दरम्यान अतुल घटकांबळे याच्याकडून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५० हजार रुपये जप्त केलेत. तर डॉ श्रीहरी हळनोर यांच्याकडून २.५ लाख रुपये जप्त करण्यात आलेत. आता ही रक्कम कोणी घटकांबळे याला दिली याचा शोध सुरू आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.