Maharashtra Live Updates: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील राजकीय, क्रीडा, गुन्हेगारी जगतातील ताज्या घडामोडी आणि इतर महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर

प्राची आमले, एबीपी माझा Last Updated: 27 May 2024 07:51 AM
Abhijeet Panse: कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून अभिजीत पानसे यांना उमेदवारी जाहीर

Abhijeet Panse: महाराष्ट्र विधान परिषद कोकण विभाग पदवीधर मतदार संघात मनसे कडून अभिजीत रमेश पानसे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिलेली आहे

Malegaon Firing : मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार

Malegaon Firing : मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झालाय. अब्दुल मलिक युनूस इसा असं त्यांचं नाव आहे. मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान हा गोळीबार झाला. हॉटेलवर ते चहा पिण्यासाठी थांबले असता हा गोळीबार झाला. या गोळीबारानंतर मालेगावात तणाव आहे. MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी करत अटक करण्याची मागणी केलीय. 

Monsoon Update :  10 जूनला मान्सून मुंबईसह कोकणात दाखल होण्याची शक्यता

Monsoon Update :  राज्यात वाढत्या उकाड्यामुळे मान्सून लवकर येण्याचे संकेत मिळतायत.. एकीकडे राज्यात उन्हाचा तडाका वाढतोय. तर दुसरीकडे मान्सून आगेकूच करतोय.. १९ तारखेला अंदमानात दाखल झालेला मान्सून आता ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.. आणि महत्त्वाचं म्हणजे १० जून दरम्यान मुंबईसह कोकणात मान्सूनच आगमन होण्याची शक्यता आहे..तर १५ जूनपर्यंत मान्सूनचं नाशिक, पुणे, कोल्हापूर, सोलापूरसह मराठवाडा विदर्भात आगमन होण्याचा अंदाज आहे. (वाचा सविस्तर

SSC Result:  आज दहावीचा निकाल

SSC Result:  आज दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.  महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra SSC Exam Result 2024) दुपारी एक वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे.  (वाचा सविस्तर)

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे पूर्व इथल्या एसआरए मुख्यालयात आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात येणार आहे. हे कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार असून नियंत्रण अधिकारी २४ तास फोनद्वारे आपत्कालीन व्यवस्थापन कक्षातील ऑपरेटरशी संपर्कात राहतील. पावसाळ्यात दरवर्षी इमारत कोसळण्याच्या घटना घडतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित तसंच वित्तहानी होते. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करता यावी, यासाठी वांद्रेतील एसआरए मुख्यालयालगत आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष सुरु करण्यात येणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.