Maharashtra Live Updates: जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का, निकटवर्तीयांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Maharashtra Live blog Updates: महाराष्ट्र आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील राजकारणात शिंदे आणि फडणवीसांचं कोल्ड वॉर चर्चेत
उद्धव ठाकरे यांनी भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे, असे वक्तव्य केले होते. यावर राज्यमंत्री पंकज भोयर यांना विचारले असता उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. ते तणावामध्ये असल्याने असे वक्तव्य करतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का बसलाय. आव्हाड यांचे अत्यंत निकटवर्तीय अभिजीत पवार, हेमंत वाणी आणि सीमा वाणी यांनी आव्हाडांची साथ सोडली आहे. या तीन नेत्यांची थोड्याच वेळात मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. प्रवेशासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कदाचित राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अजित पवार यांचे एकेकाळचे खंदे कार्यकर्ते आनंद परांजपे यांच्यानंतर आता अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांनी देखील आव्हाडांची साथ सोडली.
जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी भागातील एका तीन वर्षीय बालकाला जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) बालरोग विभाग अतिदक्षता वॉर्डात उपचार सुरू आहे. या आजाराचे जिल्ह्यात आतापर्यंत तीन रुग्ण आढळून आले असून. महिला रुग्णाला डिस्चार्ज दिला, तर रावेरच्या तरुणावर उपचार सुरू असून त्याची तब्येत सुधारत आहे. या बालकाला गेल्या काही दिवसांपासून पायदुखीचा त्रास जाणवत असल्याने रक्त तपासणी केली असता जीबीएस आजार झाल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर तत्काळ बालरोग तज्ञांनी उपचार सुरू केले. एकाच महिन्यात हा तिसरा रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे.
सिंधुदुर्ग : माजी आमदार वैभव नाईक यांना मोठा धक्का बसलाय. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आतापर्यंत शिवसैनिकांसाठी काम करताना प्रामाणिक व निष्ठेने न्याय देण्याचे काम केले. सध्या पक्षांतर्गत सुरू असलेल्या घडामोडीमुळे काम करणे शक्य नाही. यासाठी मी माझ्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देतोय, असं त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे.
धुळे : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पळासनेर परिसरात एका सराईत मोटारसायकल चोरट्याला दहा मोटारसायकलींसह अटक केली आहे. पोलिसांनी गमदास उर्फ गमा देवराम भिल या सराईत चोरट्याला बेड्या ठोकत त्याच्याकडून 3 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त केल्या आहेत. शिरपूर तालुक्यातील हाडाखेड येथून दीपक नंदू वंजारी यांची चोरी गेलेली हिरो कंपनीची मोटारसायकल आणि इतर गुन्ह्यांचा तपास करत असताना धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त माहितीच्या आधारे पळासनेर परिसरातून गमदासला ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाने ही कारवाई केली आहे.
अहिल्यानगर: कर्जत-जामखेड मध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र केसरी स्पर्धा मार्च महिन्यात होणार आहे...याबाबत पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली होती... तर अहिल्यानगर मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत आमदार रोहित पवारांनी ही कुस्ती स्पर्धा राजकीय लोकांसाठी होती अशी टीका केली होती... यावर नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवार यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे...कुस्ती स्पर्धेच्या स्टेजवर कुणाला बोलवायचे हा आयोजकांचा विषय आहे, हा काही बारामती ऍग्रो चा कार्यक्रम नाही...आम्ही आयोजित केलेल्या स्पर्धेला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी उपस्थिती लावली...ज्यांनी रोहित पवारांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि ते या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहिले म्हणून रोहित पवार यांना झोंबलं असावं म्हणून रोहित पवार अशा वल्गना करता आहेत असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी आमदार रोहित पवार यांना लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्या संध्याकाळी आग्र्यात पार पडणाऱ्या शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी दाखल होणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता विकी कौशल देखील शिवजन्मोत्सव सोहळ्याला हजेरी लावणार
दरम्यान, उद्या सकाळी मुख्यमंत्री शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार
सोबतच, बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीतील कार्यक्रमासाठी देखील मुख्यमंत्री उपस्थित असणार
डान्सबार संदर्भात आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा
डान्सबार संदर्भात नवीन कायदा येत्या अधिवेशनात मांडला जाणार त्याला आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता मिळणार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जुन्या कायद्यात बदल करत नविन तरतुदी या कायद्यात असणार
डान्सबारमध्ये नोटांची उधळण करता येणार नाही
डिस्को आणि आॅक्रेस्ट्रा संदर्भात राज्य सरकारची परवानगी संदर्भात ही बदल करण्यात येणार
डान्सबार संदर्भात नियम आणि कायदा करताना समितीमध्ये डान्सबार यांच प्रतिनिधी असावा....
कोर्टाने काय अटी घालून दिलेल्या होत्या...
डान्सबार फ्लोअरवर चारपेक्षा अधिक बारबाला नको
बारबाला आणि ग्राहकांमध्ये किमान दोन मीटरचे अंतर असावे
ग्राहकांना डान्स फ्लोअरवर जाता येणार नाही
डान्सबारमध्ये धूम्रपानास मनाई
बारबालांचे वय १८ वर्षांपेक्षा कमी नसावे
बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत
गाडय़ांसाठी पार्किंगची व्यवस्था असावी
अशा अनेक नियमावली असणार आहे
यवतमाळ : एटीएम कार्डची अदलाबदल करून बँक खातेदाराच्या खात्यातून रोकड उडविणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखा पथकाला यश आले आहे या टोळीतील दोन सदस्यांच्या मुस्क्या आवळुन रोख. कार आणि मोबाईल असा 6 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहना व्यंकट रमण चिंताला आणि कृष्ण भिमनळीकर अशी अटकेतील टोळी सदस्यांची नावे आहेत यांच्यावर महाराष्ट्रासह पर राज्यातही या टोळीवर डजनभर गुन्हे दाखल असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
नाशिकच्या शरणपूर रोड भागात अल्पवयीन मुलांची दहशत...
अल्पवयीन मुलांकडून पार्किंगमध्ये उभे असलेल्या दुचाकीवर कोयत्याने वार...
परिसरात असलेले कमर्शियल बॅनर देखील फाडल्याची माहिती...
रात्रीच्या वेळी दहशत वाजवण्याच्या उद्देशाने केली दुचाकीची तोडफोड....
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद.....
घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल, शहर पोलिसांचा तपास सुरू
जीबीएसमुळे पुण्यात नववा मृत्यू
वाघोलीयेथील ३४ वर्षीय पुरुषाचा ससून रुग्णालयात मृत्यू
रुग्णाला श्वसनाचा त्रास झालं होता आणि स्नायू कमजोर झाले होते
ससून रुग्णालयात ३ फेब्रुवारीपासून उपचार सुरू होते. मात्र त्रास वाढत गेला आणि उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला.
पुण्यात जीबीएसचे एकूण २१० रुग्ण आहेत.
४१ आयसीयूत तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे आणि बाकी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मुंबई: कुठलाही राजकारणी मोठ्या पदावर गेला की तो पंचतारांकित संस्कृतीत रुळतो... यात जवळपास देशातील सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे नेते मोडतात. मात्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे बुलढाण्याहून स्वतःच्याच मोटारीने मुंबईत दाखल झाले आणि कुठल्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये न थांबता ते थांबले चक्क गिरगावच्या नाना चौकातील सर्वोदय आश्रमात....! रात्रभर ते जमिनीवर झोपले. याबाबत त्यांना विचारलं असता , ते म्हणाले की, मी नेहमीच सर्वोदय आश्रमात थांबत आलोय. मी जमिनीवरचा कार्यकर्ता असल्याने मला नेहमीच सर्वोदय आश्रम भावत आल आहे. त्यांचं हे वक्तव्य काँग्रेसच्या पंचतारांकित राजकारणासाठी फार सुचक मानल्या जात आहे.
जालन्यातील जुन्या एमआयडीसी भागामध्ये कुलरच साहित्य बनवनाऱ्या कंपनीत मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे कुलरचे साहित्य जळून खाक झालय, या आगीचं नेमक कारण स्पष्ट नसले तरी शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लागलेल्या ही आग पहाटेपर्यंत विझविण्याचे काम अग्निशमन दलाकडून करण्यात आल, तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आल.
मिठी स्वच्छतेप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नेमलेल्या SITने पालिका आणि MMRDA याच्याकडे नदीच्या स्वच्छतेसाठी देण्यात आलेल्या कंत्राटाबाबत कागदपत्रांची मागणी केली आहे. नदीच्या उगमस्थळापासून पवई ते कुर्ला या ११ किलोमीटर ८४० मीटरचे सफाईचे जबाबदारी महापालिका व उर्वरीत ६ किलोमीटर ८०० मीटरची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे.
मागील वीस वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असून ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना याकाळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. महापालिकेतील कंत्राटांमधील कथित अनियमिततेबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत सहा विशेष तपास पथके स्थापन केली आहे. त्यात खिचडी गैरव्यवहार, कोरोना काळात मृतदेहांना ठेवण्यासाठी पिशव्या खरेदी, आॅक्सिजन प्रकल्प अशा विविध प्रकरणांमध्ये यापूर्वीच गुन्हा दाखल करून चौकशी सुरू झाली आहे
नागपूर जिल्ह्यातील कोतवाल बड्डी एशियन फायर वर्क्स या कंपनी मध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या ब्लास्ट प्रकरणी नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.. एक जुलै 2023 ला फायर सेफ्टी डिपार्टमेंट आणि इंडस्ट्रियल डिपार्टमेंट ने या कंपनीला बंद करण्याची नोटीस दिली होती... नोटीस दिली असताना सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती... हा फार मोठा गुन्हा आहे.. त्यामुळे यावर पोलिसांनी जिल्हाधिकारी यांनी कडक कारवाई करावी अशी अपेक्षा बावनकुळेंनी व्यक्त केली आहे.
यामध्ये संपूर्ण चौकशी केली जाणार असून जे जे दोषी आहे.. मग तो मॅनेजर असो किंवा मालक यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे बावनकुळे म्हणाले.. मृत्युमुखी पडलेल्यांच्या परिवाराला मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे जखमींना सुद्धा उपचार दिले जात आहे.. दोषपूर्ण इंडस्ट्री चालविणे हा फार मोठा गुन्हा आहे.. या बद्दल इन्क्वायरी होऊन कारवाई केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन हद्दीत सोमवारी क्वार्टर परिसरात कार्तिक चौबे नामक गुंड प्रवृत्तीच्या युवकाची हत्या क्षुल्लक कारणावरून त्याच्या सोबत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी केली. महत्वाचं म्हणजे मृतक आणि आरोपी हे सोबत दारू प्यायला बसले होते. तिथे त्यांच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि आरोपीने कार्तिक चौबे याच्यावर वार केले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी आणि मृतक हे एकमेकांना ओळखणारे होते सोबत दारू सुद्धा पीत बसले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन ते तीन जण त्याठिकाणी होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून इतरांचा यात काही सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.
काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे आज त्यांच्या पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. हर्षवर्धन सपकाळ हे कालच त्यांच्या खाजगी मोटारीने मुंबईत दाखल झाले. मुंबईतील गिरगावच्या सर्वोदय आश्रमात हर्षवर्धन सपकाळ थांबलेले आहेत.
टोरेस गैरव्यवहाराप्रकरणी आतापर्यंत ३५ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असून त्याशिवास टोरेस कंपनीशी संबंधीत छोट्यामोठ्या वस्तू, सात-आठ मोटरगाड्या व महागडे खडे जप्त करण्याची परवानगी आर्थिक गुन्हे शाखेने MPID न्यायालयाकडे मागितली आहे. याशिवाय याप्रकरणी सक्षम अधिकारी नियुक्ती करण्याबाबतही प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सहा महिन्यात सर्व प्रक्रिया संपवून तक्रारदारांना रक्कम परत करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
याप्रकरणी आतापर्यंत १२ हजार ७८३ गुंतवणूकदारांची १३० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपींनी परदेशातही अशाच प्रकारे कंपनी स्थापन केली असून तेथेही गुंतवणूक योजना राबवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी संशयित सूत्रधार ओलेना स्टोइयान, व्हिक्टोरिया कोव्हालेन्को, मुस्तफा कराकोच, ओलेक्झांडर बोराविक, ओलेक्झांडर झापिचेंको, ओलेक्झांड्रा ब्रुंकीव्स्का, ओलेक्झांड्रा त्रेडोखिब, आर्टेम ओलिफरचुक आणि इयुर्चेंको यांच्या विरोधात ब्लू कॉर्नर नोटिस जारी केली आहे.
ज्ञानेश कुमारांची 370 कलम रद्द करण्यात महत्त्वाची भूमिका, राम मंदिर ट्रस्ट निर्मितीमध्ये योगदान, निवडणूक आयोगातील वर्षपूर्तीपूर्वीच बढती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा.
समृद्धी महामार्गावर पुन्हा एका खाजगी ट्रॅव्हल्सचा अपघात झाला आहे. काही प्रवासी जखमी. 24 तासात दुसरा मोठा अपघात. समृद्धी महामार्गावर गेल्या 24 तासात दुसरा मोठा अपघात. खाजगी ट्रॅव्हल बसचा अपघात झालायय पुण्यावरून रायपूरला जाणाऱ्या हंस ट्रॅव्हल्सचा कारंजा इन्टरचेंज टोल प्लाझा जवळ भीषण अपघात झाला. या अपघातात काही प्रवाशी जखमी झाले असल्याची माहिती कळते. रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या खड्यात बस उतरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, अपघाताच कारण कळू शकलेले नाही.
इंडियाज गोट लॅटंट प्रकरणात रणवीर अलाहाबादी तपास यंत्रणेच्या संपर्कात नाही. महाराष्ट्र सायबर विभाग तसेच गुवाहाटी पोलिसांनी रणवीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, खार पोलिस देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत परंतु रणवीर अद्याप या तीन तपास यंत्रणेच्या संपर्कात आलेला नाही. महाराष्ट्र सायबर आणि गुवाहाटी पोलिसांव्यतिरिक्त, आता जयपूर पोलिसांनी रणवीरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे परंतु रणबीर इलाहाबादि अद्याप कोणत्याही तपास यंत्रणेच्या संपर्कात नाही. महाराष्ट्र सायबर विभागाने रणवीरला २४ तारखेला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रणवीर अलाहाबादिया या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या सर्व एजन्सींच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे.
भुंकत असलेल्या कुत्र्याला हकलल्याचा राग अनावर झालेल्या २५ वर्षीय तरुणाने एका २६ वर्षीय तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना जुहू चौपाटी येथे रविवारी सायंकाळी घडली. या हल्यात अर्जुन कैलास गिरी हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल केले आहे. पवई येथे राहणारा अर्जुन शेअर मार्केट ट्रेडिंगचे काम करतो. अर्जुन हा रविवारी जुहू चौपाटीवर आला होता. त्यावेळी चौपाटीवरील एक कुत्रा अर्जुनच्या मागे लागून भू़ंकत होता. स्वत:च्या बचावासाठी अर्जुनने तिथली एक खूर्चीने कुत्र्याला भीती घालून हाकलवले.
हे पाहून आरोपी ओमकार मनोहर मुखिया उर्फ ओमकार शर्मा याला राग अनावर झाला. ओमकार अर्जुनला जाब विचारण्यासाठी गेला असता. दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. कालांतराने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या ओंमकारने जवळील खाद्यविक्री स्टाॅलवरील चाकू घेऊन ओंमकारच्या पोटात, दोन्ही हातावर डोक्यावर चाकूने सपासप वार केले. स्थानिकांनी याची माहिती नियंत्रण कक्षाला देत पोलिसांना पाचरण केले. अर्जुनला उपचारासाठी कुपर रुग्णालयात दाखल केले. अर्जुनच्या तक्रारीवरून जुहू पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी ओंमकारला अटक केली आहे. या प्रकरणी जुहू पोलिस अधिक तपास करत आहेत
हजारो मुंबईकरांना कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणार्या टोरेस गैरव्यवहारातील आरोपींनी आता 'बल्गेरिया' मध्ये आपली दुकानं थाटल्याची माहिती समोर आली आहे. या गैरव्यवहारातील आरोपींनी भारतानंतर आता बल्गेरियातील नागरिकांना लक्ष करण्याचा प्रयत्न केली आहे. गुंतवणुकीवर जास्त पैसे देण्याचे आमीष दाखवून तेथील लोकांची फसवणूक करण्याच्या प्रयत्नात ही टोळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबईत या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे 12 हजार 783 लोकांनी तक्रार केली आहे. तर आतापर्यंत 130 कोटींचा चुना लावून आरोपी फरार झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मुंबईप्रमाणे देशात बेंगलोर, सूरत, चैन्नई कोलकत्ता येथेही टोरेसची कार्यालय उघडून फसवणूकीचा या टोळीचा डाव वेळीच उघडकीस आला. मात्र, आता भारतातून पलायन केल्यानंतर या टोळीने बल्गेरिया या देशाला लक्ष केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्याने दिली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ईडीनेही स्वतंत्र गुन्हा नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात EOW पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. तर EOW पोलिसांनी या प्रकरणातील फरार युक्रेनियन आरोपींविरोधात आता 'ब्ल्यू काॅर्नर' नोटीस जारी केली आहे
मुंबईतील तापमानाचा पारा तीन दिवस सातत्याने 36 अंशांच्या वरती राहिल्यानंतर सोमवारी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला. सोमवारी रविवारच्या तुलनेत कमाल तापमान पाच अंशांनी घसरले. पुढील दोन-तीन दिवस राज्यातील कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Live Updates: देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीवरुन वादंग होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील शीतयुद्ध सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठीचा दबाव सातत्याने वाढत आहे. याप्रकरणी आता अजित पवार हे काही निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -