Maharashtra Live Blog Updates: पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपण्यास तीन दिवस उरले आहेत. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची निवड केली जाणार का याकडे लक्ष सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर राज्यात देखील विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाजपच्या सर्व आमदारांची आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यात येणार आहे. राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि लाईव्ह घटनांचे अपडेटस् मिळवण्यासाठी क्लिक करा. जाणून घ्या सर्व बातम्या एका क्लिकवर.
चोरी केलेल्या रिक्षेवर घरखर्च भागवण्याचा प्रकार — पोलिसांनी आरोपीला रंगेहात केली अटक
Anchor:-"कामधंदा नाही, पैसेही नाहीत... मग घर चालवायचं कसं?" या प्रश्नाने त्रस्त झालेल्या एका तरुणाने चोरीचा मार्ग निवडत अनोख्या प्रकारे उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केला. कल्याण शहरातून रस्त्यावर उभी असलेली एक रिक्षा चोरी करून तीच रिक्षा चालवत तो प्रवासी भाडे घेत होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार फार काळ लपून राहिला नाही.
कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पथकाने तपास करताना संशयास्पदपणे रिक्षा चालवणाऱ्या या तरुणाला अडवले. चौकशीत चोरीचा प्रकार उघड झाला आणि पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली. आरोपीचे नाव आशिष मोरे असून तो कर्जतजवळील भिवपुरी परिसरात राहतो.
आशिष याच्याकडे कोणताही रोजगार नव्हता. आर्थिक तंगी वाढल्याने त्याने चक्क कल्याण शहरातील एक रिक्षा चोरी केली आणि त्याच रिक्षेतून प्रवासी सेवा देत दिवस काढू लागला. मात्र, संबंधित रिक्षा मालकाने चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपीचा शोध घेत त्याला रिक्षात प्रवासी बसवत असतांना महात्मा फुले पोलिसांनी त्याला रंगेहात अटक केली.
संजय जगताप यांना मी नेहमी सांगायचं तुम्ही चुकीच्या पार्टीमध्ये काम करतोय: रवींद्र चव्हाण
रवींद्र चव्हाण
ज्या विश्वासाने प्रवेश केलाय त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही
लोकप्रतिनिधी कसा असावा हे संजय जगताप यांच्याकडे बघून वाटायचं
संजय जगताप यांना मी नेहमी सांगायचं तुम्ही चुकीच्या पार्टीमध्ये काम करतोय
तेही सांगायचे मला कळतंय पण वळत नाही आज ती वेळ आली आहे
जेजुरी मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्ति आहे ते मला कळलं आणि त्या ठिकाणी जाऊन देखील मी दर्शन घेतलं
विमानतळ, गुंजवणी, पाण्याचा प्रश्न इथे जे जे प्रश्न आहेत यांना मार्गस्थ करणे महत्त्वाचा आहे
प्रत्येकाला विचाराच्या प्रवाहामध्ये कसा आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत
पुन्हा एकदा प्रकल्प असतील त्यावरती सरकार काम करेल


















