Maharashtra Live Blog Updates: अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ
Maharashtra Live Blog Updates: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडी आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् जाणून घेण्यासाठी क्लिक करा...
LIVE

Background
Maharashtra Live Blog Updates: पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवारांचे (Parth Pawar Pune Land Scam) मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र पार्थ पवारांवर मात्र गुन्हा दाखल नाही. संगनमत करुन शासनाचा ५ कोटी ८९ लाख ३१ हजार आठशे रुपयांचा मुद्रांक शुल्क बुडल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झालेल्या अन्य तिघांमध्ये या जागेची पॉवर ऑफ एटर्नी असलेल्या शितल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे, मात्र दिग्विजय पाटलांचे व्यवसायिक भागीदार असलेल्या पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. जर एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरा भागिदार असलेल्या पार्थ यांच्यावर गुन्हा का नाही असा प्रश्न उपस्थित झालाय.
अजितदादा सर्वांना पुरून उरतात म्हणून त्यांच्यावर आरोप केले : नरहरी झिरवाळ
परभणी: इतके दिवस सर्व सुरळीत असताना ऐन निवडणुकीच्या काळात अजितदादांवर आरोप करण्यात आले आहेत. कारण अजितदादा सर्वांना पुरून उरतात. त्यामुळे त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या काळातही अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या परिवारातील अजून काय काय गोष्टी काढल्या जातील. मात्र कार्यकर्त्यांनी या गोष्टीकडे लक्ष न देता स्थानिक मुद्द्यावरिल या सर्व निवडणुका जिंकाव्यात, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांनी परभणीत केले आहे. परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत बोलताना झिरवाळ बोलले आहेत.
नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात परिसरात भीषण अपघात; टॅक्सी चालकाच्या गाडीवर ताबा सुटल्याने भीषण अपघात
Nandurbar : नंदुरबार शहरातील नेहरू चौक परिसरात परिसरात भीषण अपघात....
प्रवासी वाहतूक करणारी टॅक्सी चालकाच्या गाडीवर ताबा सुटल्याने भीषण अपघात....
या अपघातात चार जण जखमी तर रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या चार ते पाच मोटरसायकलींचे मोठ्या प्रमाणात नुकसान....
शहर पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर झालेल्या अपघात मुळे एकच खळबळ उडाली....
टॅक्सी चालक मध प्राशन करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती....
टॅक्सी चालकाला तात्काळ पोलिसांनी घेतले ताब्यात पुढील तपास सुरू असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू...























