Kirit Somaiya :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावावर रायगडच्या कोर्लई गावात असलेले 19 बंगले  कुणी पाडले याची चौकशी पोलिसांनी केली पाहिजे, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. तसेच नक्की रश्मी ठाकरे मुख्यमंत्री आहेत की उद्धव ठाकरे, असं वक्तव्य सोमय्या यांनी  या दौऱ्यानंतर त्यांनी  केलं आहे.


सोमय्या म्हणाले, 19 बंगल्याचे रहस्य अधिक वाढत चालले आहे.  आता मुख्यमंत्र्यांनी या बद्दल स्पष्टता द्यायला हवी. 19 बंगले गायब करण्याचा काय प्लॅन आखला? त्यांनी ते स्वतः बंगले उडवले का?  मी राज्य सरकारला विचारू इच्छितो की ते बंगले का उडवले गेले याचे उत्तर द्यावे. जर उद्धव ठाकरे स्वतःच्या बायकोची संपत्ती  संपवत असतील आणि जर शिवसैनिक जागा शुद्ध करत असतील तर काय बोलावे. माफियासेनेकडून काय अपेक्षा ठेवू नका.


संजय राऊतने कोविडचा घोटाळयाकडील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी  रश्मी ठाकरेंकडे विषय वळवला आहे. आता हे लोक गोमूत्र शिंपडत आहेत. संजय राऊत यांची आरोप मालिका संपली तर आपण त्यांना विचारू आता एखादा तरी कागद द्या,  असे देखील किरीट सोमय्या या वेळी म्हणाले. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांचा बहुचर्चित कोर्लई गावचा दौरा अखेर शिवसैनिकांच्या प्रचंड घोषणाबाजीत पार पडला. भाजपच्या रायगडमधील नेते आणि कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह सोमय्या दुपारी कोर्लईत पोहोचले तेव्हा तिथं उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजी करून त्याला प्रत्युत्तर दिलं. किरीट सोमय्या ग्रामपंचायतीत होते तोवर बाहेर असलेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु ठेवली होती. तर दुसरीकडे भाजपचे कार्यकर्तेही घोषणाबाजी करत होते. जवळपास अर्धा तास हा सामना सुरु होता. त्यानंतर सोमय्या ग्रामपंचायतीबाहेर पडले आणि कोर्लईबाहेर निघाले.


संबंधित बातम्या :