Swabhimani Shetkari Sanghatana : सांगलीत काढण्यात आलेल्या मोर्चात स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात पुतळा काढून घेण्यावरून झटापट आणि धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्वाभिमानी पक्षाने क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा विश्राम बाग चौक ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा काढला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक तिरडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी भर रस्त्यातच राजू शेट्टी (Raju Shetti) यांचे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यात प्रतिकात्मक पुतळा काढून घेण्यावरून धक्काबुक्की झाली. यावेळी रस्त्यावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


स्वाभिमानी संघटनेने आपल्या विविध मागणीसाठी हा मोर्चा काढला होता. ज्यामध्ये वीज तोडणी थांबवावी, दिवसा दहा तास वीज देण्यात यावी, ऊस वजनातील काटामारी थांबवावी, तोडी साठी घेतले जाणारे पैसे बंद करावेत, द्राक्ष पीक विमा योजना बारमाही करावी, द्राक्ष बागांना पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी आवश्यक संरक्षक कागद व अन्य खर्चासाठी अनुदान देण्यात यावे आणि नियमित कर्ज भरणाऱ्याना 50 हजार प्रोत्साहन अनुदान तातडीने देण्यात यावा, यासारख्या मागणीचा समावेश आहे. तसेच दुधाला हमीभाव जाहीर करा आदीसह अन्य मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.  


इतर महत्त्वाच्या बातम्या:




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha