एक्स्प्लोर

Shivraj Rakshe : दुखापतीवर मात करून पटकावली मानाची महाराष्ट्र केसरीची गदा, जाणून घ्या कोण आहे शिवराज राक्षे

Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे हा पुण्यातील खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो महाराष्ट्रातील आघाडीचा मल्ल आहे.

Maharashtra Kesari 2023 : यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब नांदेडच्या शिवराज राक्षे ( Shivraj Rakshe) याने पटकावलाय. महाराष्ट्र केसरी 2023 च्या अंतिम लढतीत शिवराजने सोलापूरच्या महेंद्र गाडकवाड (Mahendra Gaikwad) याचा अवघ्या 55 सेकंदात पराभव केला आणि महाराष्ट्र केसरीच्या मानाच्या खिताबर नाव कोरलं.  

शिवराज राक्षे हा पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील राक्षेवाडीचा आहे. तो आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडे सराव करतो. तर उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यामधील शिरसीचा आहे. तो देखील आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल कात्रज येथे वस्ताद  काका पवार आणि गोविंद पवार यांच्याकडेच सराव करतो. एकाच तालमीतील मल्लांमध्ये महाराष्ट्र केसरीसाठी लढत झाली. यात शिवराजने विजय मिळवलाय. 

शिवराज राक्षेने गादी विभागात महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्याने पहिल्या फेरीत उस्मानाबादच्या धीरज बारस्करला 10-0 असे एकतर्फी, दुसऱ्या फेरीत साताऱ्याच्या तुषार ठोंबरेला 10-0 असे एकतर्फी तर तिसऱ्या फेरीत संभाजीनगरच्या (औरंगाबाद) पांडुरंग मोहारेला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या फेरीत शिवराजने पुण्याच्या हर्षद कोकाटेला पराभूत करताना गादी विभागातून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत हिंगोलीच्या गणेश जगतापवर 10-0 अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.     

शिवराज हा पुण्यातील खेड तालुक्यातील असला तरी तो सध्या नांदेड जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करतो. त्याने कनिष्ठ गटात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. तो महाराष्ट्रातील आघाडीचा मल्ल आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याने गतवेळच्या महाराष्ट्र केसरीमधून माघार घेतली होती. गेल्यावेळी देखील महाराष्ट्र केसरीच्या संभाव्य विजेत्यांमध्ये तो गणला जात होता. दुखापतीवर मात करून यंदाचा महाराष्ट्र केसरीचा खिताब मिळवायचाच या निर्धाराने तो मैदानात उतला होता. अखेर महाराष्ट्र केसरी होण्याचे त्याचे स्वप्न यंदा पूर्ण झाले.

Shivraj Rakshe : घरातूच कुस्तीचा वारसा

शिवराज याचे वडील शेती करतात. शेतीसोबत दुधाजा जोड व्यवसाय आहे. वडील, आई आणि भाऊ यांच्यासोबत शिवराज खेडमध्ये राहतो. शिवराजला आजोबापासून कुस्तीचा वारसा आहे. आजोबा आणि वडील दोघे पैलवान होते. त्यांचाच वारसा शिवराज याने पुढे चालवत आज महाराष्ट्र केसरी खिताबावर आपलं नाव कोरलंय. यासाठी खूप मेहनत घेतल्याचे शिवराज सांगतो.  

महत्वाच्या बातम्या  

Maharahstra Kesari 2023 Winner : शिवराज राक्षे महाराष्ट्र केसरी 2023, अंतिम सामन्यात महेंद्रला आस्मान दाखवलं, चितपट करत मिळवला विजय 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
Embed widget