एक्स्प्लोर

Maharashtra Heavy Rain: अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती; आठवडाअखेर पावसाचा जोर पुन्हा वाढणार, मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता

Maharashtra Heavy Rain: बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुणे: राज्यात एकीकडे पावसाने थैमान (Maharashtra Heavy Rain) घातलं आहे, अनेक जिल्ह्यात जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत (Maharashtra Heavy Rain)झालं आहे. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अशातच हे अस्मानी संकट आणखी गडद होण्याची भीती वर्तवली जात आहे. आठवडाअखेर पावसाचा जोर राज्यात पुन्हा एकदा वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात देखील पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. या आठवड्याच्या अखेर कोकण विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोबतच, विजांच्या कडकडाटासह मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.(Maharashtra Heavy Rain)

Heavy Rain: 27 सप्टेंबरपासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत मराठवाडा, विदर्भातील दक्षिण भागासह मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या राज्यात पाऊस पडतो आहे. मात्र येत्या दोन दिवसांत तो प्रभाव पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले आहे.

Heavy Rain: पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊन शेतजमिनी पाण्याखाली गेल्या असून मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील आठवडाही पावसाचा ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात येत्या तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असून  27 ते 29 सप्टेंबर दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. आधीच अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच पुन्हा आठवडाभर पावसाचा इशारा मिळाल्याने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.

बाहेर पडताना काळजी घ्या (Maharashtra Heavy Rain)

- राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून, २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल.
- विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस वाढू शकतो. यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज आहे.
- सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

ओला दुष्काळ म्हणजे काय ?

ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया फार जटील आहे. ज्या ठिकाणी किंवा भागात 20 तासांत 65 मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडतो किंवा सततचा पाऊस पडला असेल, पाणी साचल्याने पिकांचे 33 टक्यांहून अधिक नुकसान झाले असेल अशा ठिकाणी अतिवृष्टी झाली असे धरले जाते. तेथे गावच्या पीक आणेवारी समित्यांचे अहवाल महत्त्वाचे असतात. ही समिती पाहणी करुन पीक पाहणीच्या आधारे त्या भागात 50 टक्के पेक्षा कमी पीक आणेवारी आल्यास आणि त्या गावाच्या जीवनमानावर विपरित परिणाम झाल्याचे आढळून आल्यास दुष्काळ जाहीर केला जातो.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission : मतदार याद्यांवरून रणकंदन, आयोगाच्या उत्तराने विरोधक संतप्त
Voter List Row : मतदार याद्यांमध्ये घोळ, निवडणूक आयोगावर चौफेर टीका Special Report
Vote Jihad: 'उद्धव ठाकरेंना एका खानाला Mumbai वर लादायचंय', Ashish Shelar यांचा गंभीर आरोप
Devendra Fadnavis Agnry on Conratctor : प्रकल्प रखडलेले, मुख्यमंत्री भडकले Special Report
Pune Leopard Attack : नरभक्षक बिबट्या वनतारात? प्रशासन जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
हेच खरं प्रेम... अर्धांगवायु झालेल्या प्रेयसीच्या आयुष्यातील खरा 'हिरो'; सोलापूरची रिअल लव्हस्टोरी साऊथच्या 70 मिमि पडद्यावर
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
Embed widget