राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी; ट्विटर हँडलरवर कारवाई करा, सुप्रिया सुळेंची मागणी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह भेट घेतली. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी मागणी केली आहे (वाचा सविस्तर)
पवारांना धमकी आलेल्या ट्विटर हॅण्डलची शहानिशा करुन कारवाई करा, फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश
"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना ज्या ट्विटर हॅण्डलवरुन धमकी आली, त्याची शहानिशा करुन कारवाई करा," असा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त (Mumbai Police Commissioner) विवेक फणसाळकर (Vivek Phansalkar) यांना दिला आहे. शरद पवार यांना धमकी आल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासास्थानी जाऊन भेट घेतली. (वाचा सविस्तर)
मिरारोड प्रकरणातील आरोपी HIV पॉझिटिव्ह; चौकशीतून धक्कादायक खुलासा, पोलीस म्हणतात...
मृत्यूलाही भीती वाटावी, कुणाच्याही काळजाचा थरकाप उडावा, अशी घटना मुंबईला लागून असलेल्या बुधवारी रात्री मिरारोडमध्ये (Mira Road Crime) घडली. मिरारोडच्या घटनेचा खुलासा झाल्यानंतर अवघा देश हादरला. मनोजनं तो HIV पॉझिटिव्ह असल्याची माहिती पोलिसांना दिली. यामुळेच त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये तणाव होता, असंही तो म्हणाला. परंतु, पोलिसांचं म्हणणं आहे की... (वाचा सविस्तर)
दिलासादायक! पुढील तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता, वाचा कोणत्या भागात पडणार पाऊस?
केरळमध्ये मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. त्यामुळं आता महाराष्ट्रात मान्सूनचे (Maharashtra Monsoon) कधी आगमन होणार? याची वाट शेतकरी बघत आहेत. पाण्याअभावी शेतकऱ्यांची पिकं वाया चालली आहेत. अशातच एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मध्यम पावसाची शक्यता आहे. (वाचा सविस्तर)
कोल्हापुरात इंटरनेट सेवा पूर्ववत, खोळंबलेले व्यवहार पूर्वपदावर येण्यास सुरुवात
कोल्हापुरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या राड्यानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. कोल्हापुरातील इंटरनेट सेवा (Internet Service) आता पूर्ववत झाली आहे. शिवराज्याभिषेक दिनाला कोल्हापूर शहरातील तरुणांनी त्यांच्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टिपू सुलतान आणि औरंगजेबाचे फोटो ठेवल्याने मोठा राडा (Kolhapur Violence) झाला होता. (वाचा सविस्तर)