राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


फडणवीस म्हणतात पुन्हा येईन, म्हणजेच एकनाथ शिंदेंसाठी चिंतेची बाब; जयंत पाटलांची खोचक टीका


राज्यात राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवली जात असतानाच मी पुन्हा येईन असा नारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर त्यांच्या याच वक्तव्यानंतर राजकीय भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान यावरुन काही राजकीय प्रतिक्रिया देखील समोर येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचा खोचक टोला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. वाचा सविस्तर


सरकारकडून दडपशाही सुरु, पर्यावरणाची हानी होणार असेल तर रिफायनरी प्रकल्प नको : उद्धव ठाकरे


बारसू प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध आहे. त्यामुळं नागरिक जर या प्रकल्पाला विरोध करत असतील तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मी सुद्धा या प्रकल्पाला विरोध करणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारकडून दडपशाही सुरु आहे. पर्यावरणाची हानी होणार असेल तर हा प्रकल्प नको असेही ते म्हणाले. महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी असं केलं जात आहे. माझं म्हणणं आहे की, हा प्रकल्प गुजरातला न्या आणि वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात आणा असे उद्धव ठाकरे म्हणाले. वाचा सविस्तर


अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठत बैठकांना हजेरी लावली


राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. मात्र यात सगळ्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांची जास्त चर्चा रंगली. शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर अजित पवार कुठे गेले? ते नाराज आहेत का? या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र अजित पवारांनी मुंबईतून थेट दौंड गाठलं होतं आणि काही बैठकांना हजेरी लावली होती. वाचा सविस्तर


सांगलीत कारची डंपरला भीषण धडक, पाच जणांचा मृत्यू


सांगली जिल्ह्यात भीषण अपघात झाला. जतमध्ये विजापूर-गुहागर राज्य मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ मध्यरात्री स्विफ्ट कारचा अपघात या अपघाताच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे एकूण पाच जण या अपघातात मृत्युमुखी पडले. तर अपघातात एक मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सर्व मृत हे जतमधीलच असल्याचं समोर आलं आहे. वाचा सविस्तर


उजनी आज मायनस मध्ये जाणार, सोलापूरची चिंता वाढली


उन्हाळा सुरु होतानाच यंदा शंभर टक्के भरलेले उजनी धरण आज वजा पातळीत जाणार आहे. यामुळे दुष्काळी सोलापूर जिल्ह्याची चिंता वाढणार असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 37 दिवस आधी धरण मायनसमध्ये जाणार असल्याने पाणी वाटप प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.  त्यातच यंदा पाऊस काळ कमी असल्याचे हवामान खाते सांगत असताना उजनी झपाट्याने कमी होत चालल्याने पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार सोलापूर जिल्ह्याच्या डोक्यावर राहणार आहे. वाचा सविस्तर