Sangli News : सांगली (Sangli) जिल्ह्यात भीषण अपघात (Accident) झाला. जतमध्ये विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ मध्यरात्री स्विफ्ट कारचा अपघात या अपघाताच पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील चार जण आणि चालक असे एकूण पाच जण या अपघातात मृत्युमुखी पडले. तर अपघातात एक मुलगा जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सर्व मृत हे जतमधीलच असल्याचं समोर आलं आहे.


कसा झाला अपघात?


विजापूर-गुहागर राज्यमार्गावरील अमृत फाट्याजवळ मध्यरात्री हा अपघात झाला. स्विफ्ट कारने समोरुन येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी उभ्या असलेल्या डंपरला धडक दिल्याने हा अपघात घडला. गाणगापूरला देवाचे दर्शन घेऊन विजयपूरमार्गे जतकडे येत असताना हा अपघात झाला. ज्यात पाच जणांनी आपले प्राण गमावले.


दोनच दिवसांपूर्वी विटा-सातारा रोडवर अपघात


तर सांगलीत दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला होता. विटा सातारा रोडवर नेवरी गावाजवळ 4 मे रोजी सकाळी ट्रॅव्हल्स आणि कारच्या झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 1 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश होता. कारमधील सर्वजण तासगाव तालुक्यातील गव्हाण गावचे होते. अपघातात एकजण जखमी झाला. ही व्यक्ती ड्रायव्हरच्या बाजूला बसल्याने अपघातानंतर गाडीत असलेल्या एअर बॅग उघडल्याने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा अपघात सकाळी सातच्या दरम्यान शिवाजीनगरच्या पुढे विटा हद्दीत झाला. या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात अपघाताबात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स गुरुवारी सकाळी विटा महाबळेश्वर राज्य मार्गावरुन सातारच्या दिशेने निघाली होती. त्यावेळी फोर्ड फिएस्टा ही कार विटाच्या दिशेने भरधाव वेगाने येत होती. विटा हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील अकरा मारुती मंदिराच्या पुढे राज्यमार्गावर असलेल्या उताराच्या ठिकाणी हा अपघात झाला. कार गाडीमध्ये एकूण पाच जण प्रवास करत होते. कारचालकाला झोप आल्यामुळे हा अपघात झाल्याचे घटनास्थळावरील लोकांनी सांगितले.