Maharashtra Gram Panchayat Election : राज्यातील विविध जिल्ह्यांतील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या (Sarpanch Election)  सार्वत्रिक निवडणुकांसाठी 18 डिसेंबर 2022 रोजी मतदान होणार आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून आता रविवारी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचं लक्ष आहे. या निवडणुकीचा निकाल  20 डिसेंबर रोजी लागणार आहे. गावगाड्यात गेल्या काही दिवसांपासून मतदारांची प्रत्यक्ष भेट होत नसेल तर फोन, मेसेजद्वारे मतदारापर्यंत भूमिका पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. सोशल मीडिया सुद्धा प्रभावीपणे वापर प्रचारात करण्यात आला आहे. दुसरीकडे, पंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने प्रचारामध्ये प्रत्येक गावात महिलांचा सुद्धा मोठा सहभाग दिसून आला.  


विविध जिल्ह्यांत निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या


अहमदनगर- 203, अकोला- 266, अमरावती- 257, औरंगाबाद- 219, बीड- 704, भंडारा- 363, बुलडाणा- 279, चंद्रपूर- 59, धुळे- 128, गडचिरोली- 27, गोंदिया- 348, हिंगोली- 62, जळगाव- 140, जालना- 266, कोल्हापूर- 475, लातूर- 351, नागपूर- 237, नंदुरबार- 123, उस्मानाबाद- 166, पालघर- 63, परभणी- 128, पुणे- 221, रायगड- 240, रत्नागिरी- 222, सांगली- 452, सातारा- 319, सिंधुदुर्ग- 325, सोलापूर- 189, ठाणे- 42, वर्धा- 113, वाशीम- 287, यवतमाळ- 100, नांदेड- 181 व नाशिक- 196. एकूण- 7,751. 


नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका (Nashik Gram Panchayat Election) 


नाशिक जिल्ह्यात 14 तालुक्यातील 196 गावांमध्ये होणार निवडणुका. पिंपळगाव बसवंत, नांदूर शिंगोटे, दाभाडी, वडाळीभोई , उमराळे, डांगसौंदाणे या ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती होणार आहेत  


नाशिक जिल्हा - 
एकुण ग्रामपंचायती : 196
बिनविरोध ग्रामपंचायती : 07
बिनविरोध सरपंच : 19 
बिनविरोध सदस्य : 579
मतदान होणाऱ्या जागांची संख्या : 1291
सरपंचासाठी मतदान जागा : 177
एकुण मतदान केंद्र : 745
कर्मचारी संख्या : 4470
एकूण सदस्य पदासाठी 2897 तर सरपंच पदासाठी 577 उमेदवार रिंगणात


कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी  (Kolhapur District Gram Panchayat Election)


कोल्हापूर जिल्ह्यातील 431 ग्रामपंचायतीसाठी रणधुमाळी जोरात सुरु आहे.  उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी 23 लोकनियुक्त सरपंच आणि 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सरपंचपदासाठी 1 हजार 456 उमेदवारांनी माघार घेतल्याने सरपंचपदासाठी 1 हजार 193 उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 7 हजार 362 उमेदवारांनी माघार घेतल्याने 8 हजार 995 उमेदवार रिंगणात आहेत. 



सिंधुदुर्ग जिल्ह्यात 293 ग्रामपंचायतीत मतदान होणार(Sindhudurg Gram Panchayat Election)


सिंधुदुर्ग  जिल्ह्यात 325 ग्रामपंचायतीपैकी 293 ग्रामपंचायतीसाठी 933 केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठीच्या मतदान यंत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे. 


अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींची निवडणूक (Amravati Gram Panchayat Election)


अमरावती जिल्ह्यातील 257 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी 14 तालुक्यांतील 2 हजार 97 पदांसाठी 4 हजार 796 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे 257 सरपंचपदासाठी तब्बल 1279 उमेदवार झुंज देत आहेत. यंदा थेट सरपंचपदाची निवडणूक असल्याने चुरस आणखी वाढली आहे.विशेष म्हणजे यापूर्वी सहा सरपंच व 413 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत.  


नागपूर जिल्ह्यात 236 सरपंच पदांसाठी 761 उमेदवार (Nagpur Gram Panchayat Election)


राज्यात सात हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका (Gram Panchayat Election)पार पडत आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये एकूण 236 ग्रामपंचायत मध्ये निवडणूक होत असून त्यासाठी 761 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात आहे. तर याच 236 ग्रामपंचायतींमध्ये एकूण 2054 सदस्य पदासाठी एकूण 4891 उमेदवार रिंगणात आहे.


सोलापूरमध्ये 1418 जागांसाठी मतदान (Solapur Gram Panchayat Election)


सोलापूर निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायत एकूण 189 आहेत. यामध्ये 1752 जागांवर निवडणूक होईल.  त्यापैकी 329 बिनविरोध निघाल्या आहेत. उर्वरित 1418 जागांसाठी मतदान प्रक्रिया होईल.  सरपंचपद वगळून 20 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.. सरपंचसहित 15 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत.


बीड जिल्ह्यात 670 सरपंच पदासाठी 1 हजार 932 उमेदवार रिंगणात (Beed Gram Panchayat Election)


बीड जिल्ह्यात 34 ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वी बिनविरोध निवडून आल्याने उर्वरित 670 ग्रा.पं.साठी येत्या 18 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 670 सरपंच पदासाठी जिल्ह्यात 1 हजार 932 उमेदवार निवडणूक लढवत आहेत तर  ग्राम पंचायत सदस्यपदासाठी 2 हजार 107 जागांसाठी 12 हजार 219 उमेदवार मैदानात आहेत.  जिल्ह्यात 185 मतदान केंद्रे संवेदनशील असून अन्य काही केंद्र अतिसंवेदनशील आहेत. अशा ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे


अहमदनगर जिल्ह्यात 15 सरपंच बिनविरोध (Ahmednagar Gram Panchayat Election)


अहमदनगर जिल्ह्यात जिल्ह्यात 1965 सदस्यांपैकी 301 सदस्य बिनविरोध झाले, तर 15 सरपंच बिनविरोध झाले. जिल्ह्यातील 11 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत, तर 2 ग्रामपंचायतमध्ये समोरच्या पॅनलचे सर्व अर्ज बाद झाल्याने तिथेही निवडणूक बिनविरोध झाली. म्हणजे जिल्ह्यात एकूण 13 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. आता 203 पैकी 190 ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. 


अकोला : ग्रामपंचायत निवडणूक दृष्टीक्षेप  (Akola Gram Panchayat Election)


निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती : 266
सरपंचपदाच्या जागा : 266
ग्रामपंचायत सदस्यांच्या एकूण जागा : 2074
सरपंच आणि सदस्य पदासाठीचे एकूण उमेदवार : 40857
एकूण मतदार : 3 लाख 10 हजार 249
पुरूष मतदार : 1 लाख 61 हजार 895
स्त्री मतदार : 1 लाख 48 हजार 351
तृतीयपंथी मतदार : 03
बिनविरोध सरपंच : 04 : हिंगणी खुर्द (तेल्हारा), धामणगाव (अकोट), अकोली जहाँगीर (अकोट) आणि उमरी (मुर्तिजापुर) 
सरपंच पदासाठी एकही अर्ज न आलेल्या ग्रामपंचायती : 04 : बांबर्डा (अकोट), भौरद (अकोला), परंडा (बार्शिटाकळी) आणि गोंधळवाडी (पातूर) 
संपूर्ण (सरपंच आणि सदस्य) बिनविरोध झालेली ग्रामपंचायत : धामणगाव (अकोट) 
बिनविरोध निवडून आलेले सदस्य : 554


ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रत्येक घडामोडीसाठी हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा...


Maharashtra Gram Panchayat Election 2022 Live Updates: राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम सुरू; प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...