Nashik Shivsena : शिवसेना (Shivsena) ठाकरे गटातून गेलेल्या दलालांना भुई सपाट करण्यासाठी शिवसेना पक्ष कटिबद्ध राहील. येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या निवडणुकांमध्ये गेलेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवू, अकरा नगरसेवकांमधला एकही निवडून येणार नाही, असा नाशिकच्या ठाकरे गटाने शिंदे गटात (Shinde Sena) प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांना दिला आहे. 


नाशिकच्या (Nashik) ठाकरे गटातून आज शिंदे गटात काही नगरसेवकांनी प्रवेश केल्याने खळबळ उडाली. यानंतर ठाकरे गटाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकीत निवडून येऊन दाखवा असे आव्हानच दिले आहे. यावेळी करंजकर म्हणाले कि, आज झालेल्या प्रवेशानंतर बोरस्ते यांनी प्रतिक्रियेत सिल्वर ओकचा विषय काढला, त्यानंतर जे काही बोलले अत्यंत चुकीचे आहे. ज्या माणसाचा प्रवास हा गेल्या 12 वर्षाचा या पक्षामध्ये आहे.  2010 मध्ये बोरस्ते याने पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पाच सहा वर्ष महानगरप्रमुख, त्यानंतर स्थायी समिती सदस्य चार वर्ष, त्यानंतर गटनेता, त्यानंतर विरोधी पक्ष नेता, मग विधानसभेची उमेदवारी या सर्व गोष्टी शिवसेना पक्षाकडून देण्यात आल्या. मात्र पक्षासाठी झटणारे, पक्षासाठी लढणारे या पक्षाला उभं करण्यामध्ये स्वतःच योगदान देणारे असे लोक असताना सुद्धा थोड्याच कालावधीमध्ये यांना सगळे काही उपभोगायला दिले, अशा लोकांनी पक्ष सोडून अत्यंत चुकीचा भूमिका घेतल्याचे करंजकर म्हणाले. 


करंजकर पुढे म्हणाले कि, शिवसेना अत्यंत ताकदीने उभा राहिलेला पक्ष आहे, शिवसेनेत कट्टर लोकांची कमी नाही असून ज्यांना ज्यांना या पक्षामध्ये सर्व काही मिळालं ते गेले, परंतु ज्यांनी या पक्षामध्ये राहून यांना मिळवून दिल, ते लोक मात्र आजही या पक्षामध्येच आहे. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. येणाऱ्या काळामध्ये निश्चितच असे दलालांना भुई सपाट करण्यासाठी हा पक्ष कटिबद्ध राहील. सर्वजण त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत सर्वजण एक संघ जिद्दीने कामाला लागलो आहोत. कोणाला कुठे रोखायचे यावर आमची चर्चच झाली असून आगामी निवडणुकांसाठी जिद्दीने कामाला लागू, येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या निवडणुका येतील, त्या त्या निवडणुकांमध्ये गेलेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम ठाकरे गट करेल यात शंका नसल्याचे ते म्हणाले. 


यापूर्वी अनेक वादळं आली, पण... 
दरम्यान यापूर्वी देखील शिवसेनेसमोर अनेक आव्हान आले, अनेक वादळ आले. पण ज्या ज्या वेळेला अशी आव्हान आली. त्या वादळांना लढा देऊन शिवसेना पुढे आली आहे. त्यामुळे आज नाशिक ठाकरे गटातून जे काही माजी नगरसेवकांनी काढता पाय घेतलं, त्यांनी त्यांच्या पायावर दगड मारून घेतला आहे. यापूर्वी शिवसेनेतून भुजबळ 18 लोक घेऊन गेले होते, नारायण राणे 11 लोकं घेऊन गेले होते, ते सगळेच्या सगळे पडले होते, हा इतिहास आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत एकही निवडून येणार नाही, असा शब्द आहे. मागील इतिहासाची पुनरावृत्ती येणाऱ्या कालखंडामध्ये होईल आणि ते करून दाखवल्याशिवाय शिवसैनिक स्वस्त बसणार नाही, असा इशारा ठाकरे गटकुन देण्यात आला आहे.