मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवल्याचा दावा राजकीय पक्षांकडून करण्यात येतोय. भाजपच्या वतीनं 6 हजारांपेक्षा जास्त जागा जिंकल्याचं म्हटलं आहे. तर शिवसेनेनं महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भगवा फडकावल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तर 80 टक्क्यांहून अधिक धावा महाविकास आघाडीनं जिंकल्याचा दावा करत, हा सरकारच्या कामांचा विषय असल्याचं म्हटलं आहे. अशातच आज भाजपच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन सर्वाधिक जागा त्यांनाच मिळाल्या असून जिल्हानिहाय आकडेवारीही सादर करण्यात आली. तसेच आज मुंबईत भाजपकडून संघटनात्मक बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.


ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालानंतर सहा हजारांहून अधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपच्या वतीनं केला जातोय. केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं की, "राज्यातील 1600 बिनविरोध ग्रामपंचायींपैकी आम्ही 580 ग्रामपंचायती बिनविरोध जिंकल्या आहेत. त्या वगळता आम्ही 6 हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. गडचिरोली आणि इतर ग्रामपंचायतीचे निकाल अद्याप बाकी असून त्यातही भाजपला घवघवीत यश मिळणार. प्रत्येक पक्षाने आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. आम्हीच कसे मोठे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुणाला काहीही दावा करू द्यात. माझ्या हातात आता आकडेवारी आहे. त्यानुसार आम्ही राज्यात सहा हजारापेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. भाजपचे कार्यकर्ते अनेक पॅनलमधून उभे होते. त्यातून ते निवडून आले आहेत. आम्ही कुणाच्याही विजयावर क्लेम करत नाही. आमचे कार्यकर्ते किती निवडून आले, त्यावरून हा दावा करत आहे. आम्ही बोलतो ते ठोस आकडेवारीवर बोलतो. उगाचच काहीही दावे करत नाही."


ग्राम पंचायत निवडणुकीबद्दल भाजपची आकडेवारी :


सिंधुदुर्ग 70 पैकी 45
रत्नागिरी 479 पैकी 59
रायगड 88 पैकी 33


ठाणे ग्रामीण 151 पैकी 105
पालघर 3 पैकी एकही नाही
नंदुरबार 87 पैकी 27


धुळे 218 पैकी 117
नाशिक 621 पैकी 168
जळगाव 783 पैकी 372


अहमदनगर 767 पैकी 380
बुलढाणा 527 पैकी 249
अकोला 222 पैकी 123


वाशिम 163 पैकी 83
अमरावती 553 पैकी191
यवतमाळ 980 पैकी 419


वर्धा 50 पैकी 28
नागपूर 130 पैकी 73
भंडारा 148 पैकी 91


गोंदिया 189 पैकी 106
गडचिरोली 368 पैकी अद्याप आकडेवारी नाही


चंद्रपूर 629 पैकी 344
नांदेड 1015 पैकी 442
परभणी 566 पैकी 229


हिंगोली 495 पैकी 191
जालना 475 पैकी 253
औरंगाबाद 618 पैकी 208


बीड 129 पैकी 67
लातूर 383 पैकी 211
उस्मानाबाद 428 पैकी 180


पुणे 748 पैकी 200
सोलापूर 658 पैकी 204
सातारा 879 पैकी 337


कोल्हापूर 433 पैकी 189
सांगली 152 पैकी 57


एकूण 14202 पैकी 5781


महत्त्वाच्या बातम्या :