उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार, पृथ्वीराज चव्हाण विधानसभा अध्यक्ष?

ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावची घोषणा करण्यात आली.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Nov 2019 11:34 PM
LIVE UPDATE | उपमुख्यमंत्रीपदासाठी जयंत पाटील यांचे नाव निश्चित, जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभेचं अध्यक्षपद सोपवण्याची शक्यता
आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर
सोनिया गांधी यांच्या घरी दाखल, 9.30 वाजता भेटण्याची वेळ
आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर
सोनिया गांधी यांच्या घरी दाखल, 9.30 वाजता भेटण्याची वेळ
महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक संपली, एकही नेता माध्यामांशी बोलायला तयार नाही. प्ररासमाध्यमांचा कॅमेरा पाहून अजित पवार यांनी मार्ग बदलला.
काँग्रेसचा विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचा तर उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच
महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तीन तास खलबतं,
खातेवाटपाचा आकडा अद्याप निश्चित नाही, उद्या पुन्हा बैठक होणार
वाय. बी. चव्हाण सेंटरमधील महत्त्वाची बैठक संपली. महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये तीन तास खलबतं
महाविकास आघाडीला धारेवर धरण्यासाठी फडणवीस सज्ज, विरोधी पक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड
बाळासाहेब थोरात उपमुख्यमंत्री झाल्यास नाना पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष?
शिवसेना-काँगेस-राष्ट्रवादीच्या महाविकासआघाडीविरोधात दाखल याचिकावर तातडीने सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार. निवडणूकपूर्व युती तोडून नव्या आघाडीचं सरकार बनवणं ही मतदारांची फसवणूक आहे. मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यापासून रोखावं,हिंदू महासभेचे नेते प्रमोद जोशींची याचिकेत मागणी
अजित पवारांच्या साथीबद्दल वेळ आल्यावर बोलणार - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माझ्या मंत्रिमंडळ सहभागाबाबत माझा पक्ष निर्णय घेईल. उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची घेणार आहेत, ते ठरवतील त्यांच्या मंत्रिमंडळात कोण असेल. मी कालही नाराज नव्हतो आणि आजही नाही. मला माझ्या घरी जाण्याचा अधिकार आहे म्हणून सिल्वर ओकला गेलो होतो, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे.
सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुराव रद्दीत विकले, असं म्हणत एकनाथ खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.
एवढंच नाही तर विनोद तावडे, मी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्यांना घेऊन निवडणूक लढली असती तर 25 जागा जास्त जिंकल्या असत्या, असं म्हणत भाजप नेतृत्वावर निशाणा साधला.
: येत्या काळात नवा महाराष्ट्र घडणार आहे, शपथविधीनंतर आदित्य ठाकरे प्रथमच लाईव्ह
राज्यपाल कोश्यारी यांना हटवण्याची शक्यता, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची नियुक्ती होणार

उद्धव ठाकरेंच्या शपथविधीसाठी राज ठाकरे आले तर आनंदच, असं शिवसेनेचे नेते विनायक राऊत म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे राज ठाकरेंना निमंत्रण देण्याची शक्यता आहे.
बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होणार, हितेंद्र ठाकूरांची एबीपी माझाला माहिती
बहुजन विकास आघाडीचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होणार, हितेंद्र ठाकूरांची एबीपी माझाला माहिती
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजभवनात दाखल, राज्यपालांची घेणार भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजभवनात दाखल, राज्यपालांची घेणार भेट
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राजभवनाकडे रवाना झाले आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेण्याआधी ते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारकीची शपथ घेतली
'मी राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीसोबतच आहे आणि राष्ट्रवादीसोबतच राहील. कारण नसताना कोणतेही गैरसमज करू नका. पवारसाहेब आमचे नेते आहे त्यांना भेटणं माझा अधिकार आहे', अजित पवार यांची 'एबीपी माझा'ला राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आमदारकीची शपथ घेतली
जयंत पाटील यांनी आमदारकीची शपथ घेतली
अजित पवार यांनी आमदारकीची शपथ घेतली
छगन भुजबळ यांनी आमदारकीची शपथ घेतली
काँग्रेसते नेते अशोक चव्हाण यांनी घेतली आमदारकीची शपथ
राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटिल यांनी आमदारकीची शपथ घेतली
हरीभाऊ बागडे यांनी आमदारकीची शपथ घेतली
विधानभवनात बहिण-भावाची गळा भेट, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची गळा भेट
विधानभवनात बहिण-भावाची गळा भेट, राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अजित पवार यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची गळा भेट
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विधीमंडळात पोहोचले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विधीमंडळात पोहोचले, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांचं स्वागत
मला सध्या काही बोलायचं नाही. योग्य वेळी बोलेन. मी आधीही बोललो होतो की, मी राष्ट्रवादीत होतो, राष्ट्रवादीतच आहे आणि राष्ट्रवादीतच राहणार. पवारसाहेब माझे नेते आहेत. राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पार्श्वभूमी

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकार कोसळल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्ता स्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झालं. त्यानंतर आज सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार आहे. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत.

वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मुक्कामाला असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार सकाळीच विधानभवनाच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवसेनेच्या आमदारांची हॉटेल लेमन ट्रीमधून तर ग्रॅण्ड हयात आणि सोफीटेल हॉटेलमधून राष्ट्रवादी आमदारांची बस निघाली. याशिवाय ग्रॅण्ड हयातमध्ये असलेले काँग्रेस आमदारही विधानभवनाला पोहोचणार आहेत. याशिवाय सुप्रिया सुळे, नवाब मलिक यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेतेही विधानभवनात उपस्थित असतील.

विधीमंडळाचं विशेष अधिवेशन
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बहुमत चाचणीसाठी आज महाराष्ट्र विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व 288 नवनिर्वाचित आमदारांना शपथ देणार आहेत. यानंतर बहुमत चाचणी होणार आहे. मंगळवारी (26 नोव्हेंबर) सर्वोच्च न्यायालयाने 27 नोव्हेंबरला बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यपालांनी कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.

मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंची घोषणा
ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी झालेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावची घोषणा करण्यात आली. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अधिक वेळ न दवडता महाविकासआघाडीकडून एकमताने उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.