मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारच उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र अजित पवारांचा शपथविधी आजच होणार का? याबाबत अद्याप स्पष्टता नाही. राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद मिळालं तरी, उपमुख्यमंत्री कोण होणार? याबाबत पेच होता. यापदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांचं नाव चर्चेत होतं. परंतु आता अजित पवार यांचं नाव उपमुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाल्याचं कळतं.


अजित पवारांनी बंड करुन भाजपसोबत हातमिळवणी केली आणि 23 नोव्हेंबरला सत्ता स्थापन केली. यानंतर 26 नोव्हेंबरला उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या सगळ्या घडामोडींमुळे उपमुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव मागे पडलं आणि जयंत पाटील यांचं नाव पुढे आलं. मात्र अजित पवार की जयंत पाटील यावरुन राष्ट्रवादीत तिढा होता. यानंतर अजित पवार समर्थकांच्या गटाने दबावाचं राजकारण केलं. त्यामुळे अजित पवारच उपमुख्यमंत्री होतील असं म्हटलं जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या रुपाने महाराष्ट्राला आज (28 नोव्हेंबर) नवा मुख्यमंत्री मिळणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत महाविकासआघाडीच्या तीन पक्षांमधील प्रत्येकी दोन आमदारही आज मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्धव ठाकरेंचं सरकार येत असलं, तरी मंत्रीमंडळाचा विस्तार मात्र 3 डिसेंबरनंतर होणार आहे.

संबंधित बातम्या

Maharashtra Govt Formation | अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल, नाराज असल्याची चर्चा

अजित पवार उपमुख्यमंत्री व्हावेत ही राष्ट्रवादीच्या आमदारांची इच्छा

जे झालं ते झालं, आता नवी सुरुवात करायची : अजित पवार

राजकारण वेगळ्या ठिकाणी, कुटुंब वेगळ्या ठिकाणी : अजित पवार