एक्स्प्लोर

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार; छगन भुजबळांची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस उलटले आहेत. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे.

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन नऊ दिवस उलटले आहेत. अद्याप मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेलं नाही. विरोधक मुख्यमंत्र्यांना आणि त्यांच्यासोबत शपथग्रहण केलेल्या मंत्र्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणू लागले आहेत. त्यामुळे राज्यातील लोकांना मंत्रीमंडळ विस्ताराची आणि खातेवाटपाची प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीदेखील शपथग्रहण केली आहे. आज पुण्यात माध्यमांच्या प्रतिनिधींनी भुजबळ यांना मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले, यावर उत्तर देताना भुजबळ म्हणाले की, विधीमंडळाचं अधिवेशन सुरु झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. विधीमंडळाचं अधिवेश 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. 17 डिसेंबर किंवा त्यानंतरच ठाकरे सरकारचा विस्तार होईल, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला अजून 9 ते 10 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आहे. 28 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर इतर 6 नेत्यांनी (शिवसेना 2 + राष्ट्रवादी + काँग्रेस 2) मंत्रीपदांची शपथ घेतली. मात्र या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेलं नाही. 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या बहुमत चाचणीत महाविकास आघाडीने त्यांच्याकडील बहुमत सिद्ध केलं आहे. तिन्ही पक्षांचा कॉमन मिनिमम प्रोग्रामदेखील ठरला आहे. महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेत्यांमध्ये अनेक बैठका, चर्चा झाल्या आहेत. या बैठका अजूनही सुरुच आहेत. परंतु अद्याप खातेवाटप आणि मंत्रीमंडळ विस्ताराचं घोडं कुठे अडकलं आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षात मंत्रीपदांबाबत रस्सीखेच सुरु असल्यामुळे खातेवाटपला मुहूर्त मिळत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. यावर पुढील 7-8 दिवसात तोडगा निघाला नाही तर मंत्रीमंडळ विस्तार लांबेल.

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले
Video: एकनाथ शिंदेंसाहेबांच्या नेतृत्वात काम करणार, ओमराजेंची घोषणा; निकालानंतर मुख्यमंत्र्यांचा फोन, ठाकरेंबद्दलही बोलले

व्हिडीओ

Vidhan Parishad Result | सोमवारी मतमोजणी; तयारी पूर्ण, निकालाकडे लक्ष | Special Report
Sanjay Dina Patil Daughter : वडिलांनी मातोश्रीची साथ सोडली, मुलगी ठाकरेंसोबतच? | Special Report
Omraje Thackeray: ठाकरेंचा फोन, ओमराजे म्हणाले, तुम्हीच मोठं केलंय, मी कुठलाही निर्णय घेतलेला नाही
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?
Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BEST employees strike finally called off: बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसह प्रलंबित ग्रॅज्युईटी देण्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा
Uddhav Thackeray: 'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
'कोल्हापुरात उपटसुंभा येऊन गेला, पण त्याला माहीत नाही..' अमित शाहांच्या शिवसेना आता एकच वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, 'बुडाखाली खूर्ची आहे म्हणून...'
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
बीडमध्ये किरकोळ कारणावरुन तरुणाला संपवलं; नाशिकमध्येही खळबळ, इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह
Omraje Nimbalkar: 'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'पैशाचा किंवा पदाचा हव्यास नाही, ना मला माझ्या व्यवसायाला संरक्षण घेण्यासाठी मला जायचंय, ना माझ्यावर ईडी, सीबीआयची धाड पडली..' ओमराजेंनी सत्तेतच जाण्यासाठी कोणती कारणे सांगितली?
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
'हे उजाडलेल्या गावाची पाटीलकी मी सोडतो, असं म्हणण्यासारखं, आता राहिलाच कोणता राजीनामा?' मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख सोडण्यावरून खोचक टोला
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पिकअप अन् दुचाकीची धडक; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Bhaskar Jadhav: 'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
'भास्करराव जाधव आजकाल..' थेट मिलिंद नार्वेकरांवर चिडलेला तो व्हिडिओ व्हायरल होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची खोचक टिप्पणी!
NEET Re Exam: नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
नीट पुर्नपरीक्षा, एक-दोन मिनिटे उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही; दुर्दैवी मुली गेटवर धाय मोकलून रडल्या, हैदराबादमध्ये विद्यार्थिनीनं गळ्याला दोरी लावली
Embed widget