Maharashtra Politics LIVE Updates : महाराष्ट्रात 'शिंदे'शाही! राज्यातील राजकीय नाट्याला वेगळं वळण, सर्व अपडेट्स एका क्लिकवर...

Maharashtra Politics LIVE Updates : महाराष्ट्रात शिंदे सरकार... भाजपच्या धक्कातंत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेशाहीची सुरुवात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

एबीपी माझा वेब टीमLast Updated: 01 Jul 2022 05:01 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Eknath Shinde Timeline LIVE Updates : शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात (Maharashtra Government Formation)  झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह...More

कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्र्याना शुभेच्छा एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा उद्धव ठाकरे यांचे देखील फोटो .....

 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरात जागोजागी  त्यांना शुभेच्छा देणारे बनर  लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसैनिकांनीच हे बनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो शिंदे यांच्या समवेत झळकला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना दुसरीकडे शिवसैनिक काहीशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर आणि बॅनरवर देण्यात आलेल्या शुभेच्छामुळे चर्चेला उधाण आल्यानंतर आता आपण शिवसैनिक असून ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला असून मुख्यमंत्री आपण आजही शिवसेनेचे नेते असल्याचे सांगत आहेत. डोंबिवलीतील रमेश म्हात्रे, कल्याणातील नवीन गवळी, मोहन उगले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि माजी नगरसेवकांनी शुभेच्छा देणारे बनर लावले आहेत. याबाबत नगरसेवकांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मंत्री ,एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे आमचे दैवत आहेत शिवसैनिक म्हणून आम्ही हे बॅनर लावलेत यांनी एकत्र यावं हीच आमची इच्छा आहे असं सांगितलं मात्र याबाबत कॅमेरावर बोलण्यास नकार दिला. 

कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शुभेच्छा, बॅनरवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो  

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कल्याण डोंबिवली शहरात जागोजागी  त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर  लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे शिवसैनिकांनीच हे बॅनर लावले असून त्यावर उद्धव ठाकरे यांचा देखील फोटो शिंदे यांच्यासोबत झळकला आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देताना दुसरीकडे शिवसैनिक काहीशी सावध भूमिका घेताना दिसत आहेत. सोशल मिडीयावर आणि बॅनरवर देण्यात आलेल्या शुभेच्छांमुळे चर्चेला उधाण आले आहे. आपण शिवसैनिक असून ठाणे जिल्ह्याला शिंदे यांच्या रूपाने प्रथमच मुख्यमंत्री पदाचा मान मिळाला असून मुख्यमंत्री आजही शिवसेनेचे नेते असल्याचे सांगत आहेत. डोंबिवलीतील रमेश म्हात्रे, कल्याणमधील नवीन गवळी, मोहन उगले यांच्यासह अनेक शिवसैनिक आणि माजी नगरसेवकांनी शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. 


"शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे हे आमचे दैवत आहेत. शिवसैनिक म्हणून आम्ही हे बॅनर लावले आहेत, यांनी एकत्र यावं हीच आमची इच्छा आहे असे  नगरसेवकांनी यावेळी सांगितले.