एक्स्प्लोर

ऊसतोड कामगारांसाठी खुशखबर! घरी पाठवण्यासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदील

राज्यातील विविध कारखान्यांवर अडकलेल्या ऊसतोड कामगारांना अखेर घरी पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली आहे.

बीड : राज्यातील जवळपास 38 साखर कारखाने अंतर्गत एक लाख 31 हजार पाचशे ऊसतोड कामगार यांना आपापल्या घरी सोडण्या संदर्भामध्ये राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. यामध्ये ज्या ऊसतोड कामगारांचे 14 दिवस क्वॉरंटाईनचे पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरवरुन दिल्या आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यातील जवळपास 38 साखर कारखान्यांवर 1 लाख 31 हजार पाचशे ऊसतोड कामगार अडकले होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता अशा कामगारांना त्यांच्या घरी पोहचवावे, अशी मागणी सातत्याने होत होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. ज्या ऊसतोड कामगारांचे साखर कारखान्यांच्या निवाऱ्याच्या ठिकाणी 14 दिवस पूर्ण झाले आहेत. अशा ऊसतोड कामगारांची वैद्यकीय चाचणी करून त्यांच्यामध्ये सर्दी-खोकला-ताप अशी कोणतीही लक्षणं नाहीत, असे वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरच अशा ऊसतोड कामगारांना त्यांच्या घरी सोडण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे. राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी याची माहिती एबीपी माझाला दिली आहे. दरम्यान, शासनाने जीआर जारी केला असला तरी अजून शासकीय वेबसाईटवर बातमी लिहून होईपर्यंत अपलोड झालेला नाही.

लॉकडाऊनच्या काळात महिलांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाही; गृहमंत्री अनिल देशमुख यांचा इशारा

साखर कारखान्यांना सूचना या ऊसतोड कामगारांना स्वगृही परत पाठवण्यासाठी त्यांना बाहेर काढण्यासाठी योजना आखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये कामगारांची जिल्हा, तालुका आणि गावनिहाय कामगारांची संबंधित जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवण्यास सांगितली आहे. या संदर्भात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. "तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा." असे ट्विट करत त्यासोबत उपरोक्त माहिती दिली आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
A2MM Indradhanu Festival : अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
अमेरिकेत घुमला मराठी संस्कृतीचा गजर! 'ॲन आर्बर मराठी मंडळा'चा विसावा वाढदिवस; दोन दिवसीय 'इंद्रधनू' महोत्सव संपन्न
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
Sushant Shelar on Dipali sayyad : रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले,
रुपाली चाकणकरांच्या भूमिकेवरून दीपाली सय्यद यांना धमक्या! सुशांत शेलार म्हणाले, "विरोधकांनी 20 पैसे पर कमेंट..."

व्हिडीओ

Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड
Manoj Jarange Patil Jalna : काही मंत्री काम करतात पण 'चालक'च काम करत नाही - मनोज जरांगे पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
लातूर पुन्हा चर्चेत! इन्स्टावर 32 हजार फॉलोअर्स असलेली 'क्वीन रील स्टार' चक्क चोरटी निघाली; कॉपर वायरवर डल्ला मारल्याने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
Iran War Live Update: अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
अमेरिका आणि इराण 60 दिवसांच्या युद्धविरामासाठी सहमत; इराण 30 दिवसांच्या आत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरुंग हटवणार
Riteish Deshmukh on Raja Shivaji: रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
रितेश देशमुखची खास व्यक्तीला 'ध्रुवतारा' म्हणत इमोशनल पोस्ट; 'राजा शिवाजी'च्या शूटदरम्यानचे फोटो सुद्धा शेअर
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
ट्रम्पची पाकिस्तानकडे एकच मागणी अन् स्पष्ट शब्दात थेट नकार! असं नेमकं मागितलं तरी काय ज्यामुळे पाकिस्तानला जाग्यावर घामटा निघाला?
Bashir Badr: उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
उर्दू शायरींचे शहंशाह डॉ. बशीर बद्र यांचे निधन; उर्दू साहित्याचा आत्मा हरपला, 14 वर्ष स्मृतिभ्रंशात काढत नश्वर जगाचा निरोप, शायरीतून वेदना, प्रेम अन् जीवनातील कटू सत्य मांडत राहिले
Chhatrapati Sambhajinagar : अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
अवघ्या 500 रुपयांसाठी तरुणाचा गेम; 'टपका रे टपका' इन्स्टा रीलमुळे आरोपी गजाआड
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर
NEET Exam : मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
मोठी बातमी! 'नीट' पेपरफुटी रोखण्यासाठी आता थेट लष्कर मैदानात, वायूदलाच्या विमानांनी पोहोचवणार पेपर
Embed widget