Maharashtra Draught : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)  आज मराठवाड्यातील पाणीटंचाईची (Marathwada Water Crisis)  आढावा बैठक घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ही बैठक होणार असून, या बैठकीला मराठवाड्यातील पालकमंत्री गैरहजर असण्याची शक्यता आहे.  पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. काही ठिकाणी पाणी हा  लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. मात्र ज्याच्या हातात जिल्ह्याची सगळे सूत्रे असतात  असे पालकमंत्रीच बैठकीला  नसल्याने  आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. कारण काही पालकमंत्री विदेशात आहेत. तर काही पालकमंत्री दर्शनासाठी राज्याबाहेर आहेत. त्यामुळे अनेक पालकमंत्री बैठकीसाठी ऑनलाईन उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिलीय.


राज्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती गंभीर झाली.  सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.03 टक्क्यांवर आलाय. या परिस्थितीत सरकारमध्ये  जिल्ह्यचे प्रश्न मार्गी लावणारे तसेच  प्रशासन आणि  लोकप्रतिनिधी यातील दुवा म्हणून  काम पालकमंत्री  सध्या विदेशात गेले आहे.   हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार सध्या परदेशात आहेत. बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे परदेशात जाण्याच्या तयारीत आहेत. जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे देखील देवदर्शनासाठी संभाजीनगर जिल्ह्याच्याबाहेर आहेत. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे देवदर्शनासाठी राज्यबाहेर आहेत. संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे आजारी असून ते मुंबईत आहेत. त्यामुळे ते देखील बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. लातूर आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहणार आहेत. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत स्वतः बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 


राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई


राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधील पाणीसाठा 24.03 टक्क्यांवर आलाय.. तर दुसरीकडे पाण्याअभावी 23 जिह्यांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झालीये.. राज्यात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. अनेक गावं आणि खेडी तहानलेली आहेत. टँकरची वाट बघण्यात दिवसच्या दिवस जातोय. हंडाभर पाण्यासाठी कैक किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. पुण्या-मुंबईसारख्या शहरात रोज पाणी येतं. शॉवरनं आंघोळी होतायत, पण महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये पाण्याला सोन्यासारखं जपत आहेत.


पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा


 ग्रामीण भागांत घागरभर पाण्यासाठी जनतेचा टाहो सुरू आहे. जलस्राोत पूर्णपणे आटल्यामुळे आणि छोट्या धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्याने 23 जिल्ह्यांतील तब्बल 10 हजार गाव-पाड्यांना 3500 टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करावा लागत आहे. दुसरीकडे पाणी आणि चाराटंचाईमुळे विशेषत: दूध उत्पादक शेतकरी संकटात आलाय.. चारा छावण्या त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीये..  मराठवाड्यात पाण्याअभावी ओल्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यातच दुधाला चांगला भाव नसल्याने शेतकरी पशुधन विकू लागले आहेत. पुढील दीड महिना शेतकऱ्यांसाठी कसोटीचा ठरणार आहे.  अवकाळी आणि दुसरीकडे दुष्काळ-पाणीटंचाई अशा दुहेरी दुष्टचक्रात शेतकरी सापडला आहे. शेतातील पिके जगवण्यासाठी बळीराजा धडपड करतोय.


Video :



हे ही वाचा :


महाराष्ट्र तापला, जनावरं तहानली; मराठवाड्यातील गंगापूरमधून पहिली चारा छावणी