एक्स्प्लोर

महाराष्ट्र दिनाला राज्यभरात महाश्रमदान!

मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अनेक भागात महाश्रमदानाला सुरुवात झाली. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून हजारो व्यक्ती गावखेड्यांकडे श्रमदानासाठी गेले होते.

मुंबई : महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून राज्यभरात महाश्रमदान करण्यात आलं. मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत अनेक भागात महाश्रमदानाला सुरुवात झाली. इतिहासात पहिल्यांदाच या श्रमदानासाठी शहरांमधून हजारो व्यक्ती गावखेड्यांकडे श्रमदानासाठी गेले होते. महाश्रमदानामध्ये राज्यभरातील राजकीय नेते, मराठी चित्रपटसृष्टी आणि बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी झाले. उद्योग जगतातील मोठ्या मंडळींनीही श्रमदानासाठी हातभार लावला. श्रमदानात सहभागी होण्याचं आवाहन अभिनेता आमीर खानने केलं होतं. लातुरात आमिर खान आणि आलिया भट्टच्या हातात कुदळ-फावडं लातूरमध्ये आमिर खान आणि अभिनेत्री आलिया भट्टी कुदळ-फावडं घेऊन महाश्रमदानात सहभागी झाले. नाशिकमध्ये किरण राव, सत्यजित भटकळ, अनिता दाते (माझ्या नवऱ्याची बायको फेम राधिका) सहभागी झाले. पुरंदरच्या सकलवाडीत सई ताम्हणकर, तर वाघापूरमध्ये गिरीश कुलकर्णी, अमेय वाघ, ज्योती सुभाष यांनी महाश्रमदान केलं. याशिवाय जितेंद्र जोशी, पुष्कर श्रोत्री, स्पृहा जोशी, सुनिल बर्वे, अलोक राजवाडे-पर्ण पेठे या कलाकारांनीही विविध ठिकाणी महाश्रमदान केलं. सकाळी सहा ते आठ आणि संध्याकाळी चार ते सात अशा दोन भागांमध्ये महाश्रमदान करण्यात आलं. यासाठी श्रमदानाच्या साहित्यांचे तब्बले 13 हजार सेट तयार ठेवण्यात आले होते. कुदळ, फावडे आणि तीन टोपल्यांचा मिळून एक सेट तयार करण्यात आला. अहमदनगरला पाथर्डीत मोनिका राजळेंचं महाश्रमदान अहमदनगर जिल्ह्यातही महाश्रमदान करण्यात आलं. यंदाच्या पाणी फाऊंडेशनच्या कामाचा शुभारंभ पाथर्डीच्या जोगेवाडीतून झाला होता. अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली होती. त्यामुळे पाथर्डीकरांनी महाश्रमदानात हिरीरीने सहभाग घेतला होता. पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांनी पाणी फाऊंडेशनच्या कामांना भेटी देऊन श्रमदान केलं. पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारुन पाणी फाउंडेशनच्या कामात त्यांनी झोकून दिलं. पिंपळगाव टप्पा या गावात नागरिकांनी महाश्रमदान केलं. या श्रमदानात अबाल-वृद्धांपासून महिलांचा मोठा सहभाग होता. एका इंजिनिअर नव दाम्पत्याने आपल्या लग्नाचा वाढदिवस श्रमदानाने केला. यावेळी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची, आरोग्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्याचबरोबर जेवणाचा बेतही होता. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं. पाथर्डीत पंधरा ते वीस गावात पाणी फाऊंडेशनचं काम सुर आहे. नंदुरबार जिल्ह्यात जयकुमार रावळांचं महाश्रमदान नंदुरबार तालुक्यातील आसाने गावात पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित महाश्रमदान कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावळ यांनी सहभागी घेतला. नंदुरबार तालुक्यातील पूर्वपट्टा नेहमीच दुष्काळी असल्याने या भागाला पाणीदार करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिवसभर श्रमदान केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
Jalgaon Crime News: ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
ना सरकारी नोकरी, ना स्वतःचे घर, म्हातारे वडिलही सोबत राहणार...; लग्नासाठी लागोपाठ मिळालेल्या नकाराने खचलेल्या तरूणाचं टोकाचं पाऊल, जळगावातील घटना
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
Virar Crime News: विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...
विरारमध्ये अल्पवयीन मुलावर मंत्र-तंत्राद्वारे उपचार करण्याचे आमिष; आईसोबत नको ते केलं, आरोपीने आधीही तरुणीसोबत...

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Gold Rate : गुड न्यूज,सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
सोने चांदीच्या दरात घसरण, चांदी 6500 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर
Ambernath Crime Cat death: मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
मांजरीला ढकलणाऱ्या माथेफिरुच्या घरी पोलीस धडकले, मुलगा म्हणाला, 'माझे बाबा वयस्कर, आताच रिटायर्ड झालेत'
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
ही काय संसद आहे का? MIDC मधील कंपनीच्या गेटवर अडवताच भाजप नेता संतापला; कंपनी प्रशासनाला दिला इशारा
Embed widget