Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 9 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Feb 2022 03:36 PM
Gujarat Corona Update : गुजरातमध्ये 2,560 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Gujarat Corona Update : गुजरातमध्ये 2,560 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,812 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Tamil Nadu Corona Update : तामिळनाडूत आज 3,971 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Tamil Nadu Corona Update : तामिळनाडूत आज 3,971 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16,473 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 5,339 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 5,339 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16,749 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Assam Corona Update : आसाममध्ये आज 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Assam Corona Update : आसाममध्ये आज 315 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,539 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Akola Corona Update : आज दिवसभरात अकोल्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Akola Corona Update : आज दिवसभरात अकोल्यात 49 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 452 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Jalna Corona Update : जालना जिल्ह्यात 24 तासात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Jalna Corona Update : जालना जिल्ह्यात 24 तासात 12 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

Parbhani corona update : परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 44 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Parbhani corona update : परभणी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 44 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : आज मुंबईत 447 रुग्णांची नोंद

Mumbai Corona Update : मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या आजही कायम राहिली आहे. काल 447 रुग्ण आढळले असताना आज 441 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 441 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 115 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 096 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 840 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 32 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.08% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत नऊ रुग्णांचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे.

Pune Corona Update : पुण्यात आज 1172 रुग्णांची नोंद

Pune Corona Update : पुण्यात आज 1172 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2846 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासात पुण्यात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 6 हजार 107  नव्या रुग्णांची भर पडली असून 57  जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 16 हजार 035  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 



राज्यात आज  57 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात आज 57  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 75 लाख  73 हजार 069  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.89 टक्के आहे.  सध्या राज्यात  6 लाख 39  हजार 490 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2412  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 57 लाख 68 हजार 634 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


मुंबईत 447 नवे कोरोना रुग्ण


मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 447 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 4 हजार 783 इतकी झाली आहे. तर कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 808 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत 48 दिवसांची वाढ यात झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.09% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. 



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.