Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 4 February 2022 : राज्यासह देशातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Feb 2022 05:26 PM
दिल्लीत आज 1,604 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

दिल्लीत आज 1,604 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,324 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कर्नाटकात आज 12,009 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कर्नाटकात आज 12,009 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 25,854 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

मुंबईत आज 643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत आज 643 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,402 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

पुण्यात आज 1490 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

पुण्यात आज 1490 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आज नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

आज दिवसभरात अकोल्यात 79 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 79 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या जिल्ह्यात 786 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात 11 हजार 394 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 11 हजार 394  नव्या रुग्णांची भर पडली असून 68 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 21 हजार 667  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 13 हजार 840  नव्या रुग्णांची भर पडली असून 81 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 27 हजार 891  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद  नाही


राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3334 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1701 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 



राज्यात आज 81 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद

राज्यात आज 81 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.83 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 74 लाख  91 हजार 759  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.26 टक्के आहे.  सध्या राज्यात  8 लाख 52 हजार 419 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2396  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 52 लाख 54 हजार 877 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.