मुंबई: बीड लोकसभा निवडणुकीत बबन गीते यांनी अनेक बोगस बुथ शोधून काढले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीतही ते बीडमध्ये (Beed news) विरोधकांसाठी डोकेदुखी ठरु शकतात. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी बबन गीते (Baban Gite) यांना अडकवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केला. बबन गीते यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भक्कमपने पाठीशी उभा आहे. माझ्या माहितीनुसार ज्यावेळी घटना घडली त्यावेळी बबन गीते जागेवर उपस्थित नव्हता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.
परळी गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपींना मदत केल्याप्रकरणी काल सहा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या सहा जणांपैकी चौघांना आता अटक करण्यात आली आहे. दुपारी त्यांना परळी येथील न्यायालयात हजर केले जाणार असून विषयासाठी पोलीस मागणी करणार असल्याचे सांगितले. आरोपींच्या तपासासाठी नेमलेली पथकं शोध घेतल असल्याची माहिती परळी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय लोहकरे यांनी दिली.
जितेंद्र आव्हाडांची संभाजी भिडेंवर टीका
संभाजी भिडे बोलतात की, महिलांनी पंजाबी ड्रेस घालून वटपौर्णिमेला वडाची पूजा करु नये. आताचे सत्ताधारी या भिडे प्रकरणावर गप्प का आहेत?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी नागपूरमध्ये एका शाळेने पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सफर घडवल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. मी सातत्याने सांगत होतो की, मनुस्मृती अभ्यासक्रमात आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. आता शाळेच्या मुलांना घेऊन संघ कार्यालयात जाणं, याचं प्रतीक आहे. मुलांना संघ माहिती करून देता मग बुद्ध, शिवशाहू, फुले आंबेडकर देखील माहिती करून द्या, असे आव्हाड यांनी म्हटले.
गर्जे यांना गद्दारीचं गिफ्ट मिळालं; आव्हाडांची टीका
आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव गर्जे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी शिवाजीराव गर्जे यांना लक्ष्य केले. गर्जे यांनी गद्दारी केली होती, त्याचं गिफ्ट त्यांना मिळालं. कारण त्यांनी ज्यावेळी पक्ष दुभंगला त्यावेळी गर्जे यांनी कागदपत्रं चोरी केली होती, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
आणखी वाचा
सरपंचावर गोळ्या झाडून हत्या, राजकारणाची किनार; बीडमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा का उडाला?