Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 30 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Jan 2022 04:06 PM
आज राज्यात 22,444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज राज्यात 22,444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

पुण्यात आज 3896 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद   

पुण्यात आज दिवसभरात 3896 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. सध्या जिल्ह्यात 1239 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये आज 2133 नवे कोरोनाबाधित 

मागील 24 तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये 2133 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 500 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आज दिवसभरात अकोल्यात 153 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 153 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1654 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नांदेड जिल्ह्यात आज 305 रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात आज 305 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 403 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

कोल्हापूर जिल्ह्यात आज 402 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

कोल्हापूर जिल्ह्यात आज 402 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 4118  सक्रिय रुग्ण आहेत. 

चंद्रपूरमध्ये आज 282 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

चंद्रपूरमध्ये आज 282 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 469 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. 

वाशिम  जिल्ह्यात आ-166 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

वाशिम  जिल्ह्यात आ-166 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 248 व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

नाशिक जिल्ह्यात आज 2403 जणांनी कोरोनावर मात केली

नाशिक जिल्ह्यात आज 2403 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 957 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. नाशिकमध्ये आज कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 


 

बुलढाणा - जिल्ह्यात आज नवीन ३१० कोरोबधितांची नोंद.

बुलढाणा जिल्ह्यात आज नवीन ३१० कोरोबधितांची नोंद.


जिल्ह्यात २२८६ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.


जिल्ह्यात आजपर्यंत ६७९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात नव्याने एकूण 136 कोरोना रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात नव्याने एकूण 136 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण 840 तपासण्या करण्यात आल्या होत्या. रविवारी 115रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  सध्या एकूण 886 रुग्ण कोरोना बाधित  त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

अहमदनगरमध्ये 904 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

अहमदनगरमध्ये 904 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1357रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात 9675 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
 

Mumbai Corona Update : मुंबईत नव्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत दुप्पट नागरिक कोरोनामुक्त, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्क्यांवर

 मुंबईमधील नव्याने आढळणाऱ्या कोरोना (Corona)रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या बरीच अधिक असल्याच मागील काही दिवस सातत्याने दिसत आहे. आजदेखील (रविवारी) नव्याने आढळलेले मुंबईतील कोरोनाबाधित 1 हजार 160 असून 2 हजार 530 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 10 हजार 797 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. महानगर पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रविवारी सायंकाळी 6 पर्यंत समोर 1 हजार 160 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 612 झाली आहे. तर मागील 24 तासांत 2 हजार 530 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका आहे.  

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 27,971 रुग्णांची नोंद, 61 जणांचा मृत्यू


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाच्या  27 हजार 971 नव्या रुग्णांची भर पडली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हजार 142  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.  


राज्यात आज 85 ओमायक्रॉनबाधितांची नोंद 
राज्यात शनिवारी 85  ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.  राज्यात आतापर्यंत 3125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1674 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 61 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात शनिवारी 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे.  सध्या राज्यात 11 लाख 49 हजार 182 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,375 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 43 लाख 33 हजार 720 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.



मुंबईतील स्थिती

नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवस सातत्याने कमी होत आहे. शनिवारी मुंबई 1 हजार 411 नवे कोरोना (Corona) रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे मुंबईत सद्यस्थितीला 12 हजार 187 सक्रिय कोरोनारुग्ण आहेत. मुंबईत शनिवारी 11 जणांच्या मृत्यूची नोंद आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 602 झाली आहे. तर मागील 24 तासांत तब्बल 3 हजार 547 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 97 टक्के झाला आहे.

धारावीत 39 दिवसानंतर शून्य रुग्णांची नोंद
कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी (28 जानेवारी) धारावीत एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. धारावीत 20 डिसेंबर 2021 या दिवशी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढललेला नव्हता. तिसऱ्या लाटेनंतर धारावीमध्ये एका दिवसात कोरोनाची शून्य प्रकरणे नोंदवण्यास 39 दिवस लागले. दुसऱ्या लाटेदरम्यान 14 जून 2021 रोजी शून्य रुग्णसंख्येची नोंद होण्यासाठी 119 दिवसांचा कालावधी लागला. तर पहिल्या लाटेनंतर 20 डिसेंबर 2020 रोजी धारावीत शून्य रुग्णसंख्येची नोंद झाली होती. यासाठी तब्बल 269 दिवसांचा कालावधी लागला होता. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिलीय. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.