Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 20 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Jan 2022 03:38 PM
कराडमध्ये 30 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित

कराड शहर पोलिस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. तब्बल 30 पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. बाधितांमध्ये दोन पोलिस अधिकाऱ्यासह गरोदर महिला पोलिस कर्माचाऱ्यांचाही समावेश आहे. बाधितांच्या कुटुंबांचीही तपासनी करण्यात आली आहे.

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 165 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 32 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 855 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 565 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 565 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 

आज राज्यात 40,805 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 70,67,955 रुग्ण कोरोनामुक्त

आज राज्यात 40,805 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर  70,67,955 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  94.15% झाले आहे. तर राज्यात आज 44 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. 

मुंबईत आज 2550 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 2250 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर 13 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय, 217 जणांनी कोरोनावर मात केलीय. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 10 लाख 34 हजार 833 वर पोहचलीय. यापैकी एकूण 9 लाख 95 हजार 786 जण कोरोनामुक्त झालेत आणि 16 हजार 535 रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. मुंबईत सध्या 19 हजार 808 रुग्ण सक्रीय आहेत.

आज दिवसभरात अकोल्यात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

आज दिवसभरात अकोल्यात 352 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 2504 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 

गव्हर्नमेंट मेडिकल नागपूरमध्ये 76 निवासी डॉक्टर पोझिटिव्ह

मेडिकल मधील निवासी डॉक्टरांनी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनन्य साधारण कामगिरी बजावली. संपूर्ण नागपूरचा कोविड रुग्णांचा मेयो व मेडीकल येथील निवासी डॉक्टरांवरच आहे. कोविडची तिसरी लाटही सौम्य असून यातही निवासी डॉक्टर आपली कामगिरी पार पाडत  आहेत. रुग्णांना सेवा देत असताना अनेक निवासी डॉकटांना कोरोना होत आहे.  मेडिकल मध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुमारे विविध विभागाचे 76 निवासी डॉक्टरांना कोरोना झालाय. 


 

नांदेड जिल्ह्यात आज 786 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात आज 786 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

जालना जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ

आज जालना जिल्ह्यात 442 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात1803 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

पार्श्वभूमी

राज्यात 46 हजार 393 नवे कोरोनाबाधित


मागील 24 तासात राज्यात कोरोनाच्या 46 हजार 393 नव्या रुग्णांची भर पडली असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 30,795 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. काल राज्यात कोरोनाच्या  48 हजार 270 रुग्णांची नोंद झाली होती म्हणजे आज  कालच्या पेक्षा दीड हजाराने रुग्ण संख्या कमी झाली आहे. 


कोरोनाचा नवा विषाणू असणाऱ्या ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण जगभरात आढळत आहेत. भारतातही रुग्ण वाढत असून महाराष्ट्रात शनिवारी ओमायक्रॉनची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळून आली. नव्या 416 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामधील सर्वाधिक रुग्णसंख्या ही मुंबई महापालिका क्षेत्रात आढळली असून मुंबईमध्ये तब्बल 321 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईपाठोपाठ नागपूरात 62, पुण्यात 13, वर्ध्यात 12, अमरावतीत 6 आणि भंडारा, नाशिकमध्ये प्रत्येकी 1 रुग्ण आढळला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 2759 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 1225 रुग्ण कोरोना निगेटिव्ह आल्याने घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 1009 ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद ही मुंबई शहरात करण्यात आली आहे. तर त्या खालोखाल पुण्यात 1002 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 


मुंबईकरांना मोठा दिलासा, मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या


मुंबईत मागील काही दिवसांपासून स्थिरावलेली कोरोना रुग्णांची संख्या मुंबईकरांना दिलासा देणारी आहे. त्यानंतर आजतर (शनिवार) मागील काही दिवसांतील सर्वांत कमी रुग्णसंख्या समोर आली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 3568 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मागील 24 तासांत मुंबईत 10 जणांचा कोरोनावरील उपचार घेताना मृत्यू झाला आहे.  महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार नव्याने आढळलेल्या 3 हजार 568 रुग्णांमुळे सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 497 झाली आहे. तर 10 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 522 झाली आहे. तर 231 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के इतका आहे. 


इतर महत्त्वाच्या  बातम्या 


- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.