Maharashtra Covid-19 cases Live Updates : राज्यात आज 1080 नवे रुग्ण आढळले, 47 जणांचा मृत्यू

Maharashtra Covid-19 cases Live Updates 23 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Feb 2022 03:17 PM
Mumbai : मागील 24 तासांत मुंबईत 168 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत कमी होणारी रुग्णसंख्या सोमवारनंतर मंगळवारी काहीशी वाढल्याचं पाहायला मिळालं. आजही रुग्णसंख्येत काहीसा चढ पाहायला मिळाला आहे. मागील 24 तासांत 168 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. मंगळवारी हीच रुग्णसंख्या 135 होती. दरम्यान आज 255 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.

Maharashtra :  गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  1151 नव्या रुग्णांची भर

राज्यातील  कोरोनाचा प्रादुर्भाव  आटोक्यात येत असून   राज्यातील  रुग्णसंख्या कमी होताना  दिसून येत आहे.  गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  1151 नव्या रुग्णांची भर पडली आहे.  राज्यात आज 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 2 हजार 594  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आज राज्यातील  पाच  महानगरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही तर  29  महानगपालिकांमध्ये कोरोनाची एकेरी संख्येची नोंद झाली आहे.  तर  47 महानरपालिकांमध्ये कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून आटोक्यात येत आहे. सोमवारी हजारखाली गेलेली रुग्णसंख्या आज काही प्रमाणात वाढली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1080 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 47 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय राज्यात 2 हजार 488 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी देखील परतले आहेत. ओमायक्रॉनबाधितांचा विचार करता आतापर्यंत 4509 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3994 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात 47 कोरोनाबाधितांचा मृत्यू


राज्यात सोमवारी केवळ चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती. पण आज मात्र 47 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 99 हजार 623 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.96 टक्के आहे. सध्या राज्यात 1 लाख 76 हजार 560 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 958 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 73 लाख 83 हजार 579 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 



मुंबईत 135 नवे कोरोनाबाधित   

मुंबईत मागील 24 तासांत 135 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. सोमवारी रुग्णसंख्या शंभरहून कमी आढळल्यानंतर आज रुग्णसंख्या काहीशी अधिक आढळली आहे. सोमवारी 96 नवे रुग्ण आढळले आहेत. दरम्यान आज 233 जण कोरोनामुक्त देखील झाले असून त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे.  मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आज 135 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 233 जण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 315 इतकी झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या 135 रुग्णांपैकी 20 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 248 बेड्सपैकी केवळ 781 बेड वापरात आहेत. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.