HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय रे भाऊ, किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? जाणून घ्या

तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर तुम्हाला 01 एप्रिलपासून मोठा दंड भरावा लागणार आहे. कारण सर्व वाहनांना आता HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
HSRP Number Plate म्हणजे नेमकं काय? किंमत काय अन् बुकिंग कसं कराल? याबाबत पुण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी माहिती दिली आहे.

31 मार्च 2019 पूर्वीच्या गाड्यांना साधी नंबर प्लेट असायची. पण आता त्यांना देखील हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आलंय.
HSRP Number Plate म्हणजे काय : या प्लेट्स अॅल्युमिनियमपासून बनवल्या जातात. ज्यावर एक होलोग्राम देखील जोडलेला आहे. तो क्रोमियम आधारित आहे. स्टिकरप्रमाणे दिसणाऱ्या होलोग्राममध्ये वाहनाचा सर्व तपशील असतो. सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातो. प्रत्येक वाहनासाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे. तो सहज काढता येत नाही.
एचएसआरपी नंबरप्लेट कशी बुकिंग कराल? तुमच्या गाडीला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट नसेल तर तुम्हाला https://mhhsrp.com या संकेतस्थळावर जायचं आहे. त्यानंतर गाडीचं नंबर, चेसीस नंबर, इंजिन नंबर, मोबाईल क्रमांक भरून सबमिट करायचं आहे.
वाहनधारकांनी पोर्टलवर बुकिंग करून त्यांच्या सोयीप्रमाणे अपॉईंटमेंट घेऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
HSRP Number Plate ची किंमत काय? एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत मोटर सायकल आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये + जीएसटी, थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी तर फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी असणार आहे.