Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 20 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
Delhi : दिल्लीत आज 570 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 730 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jalna : जालण्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. तर चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Parbhani : परभणीत आज दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Jalna : जालण्यात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झालेली नाही. तर चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Parbhani : परभणीत आज दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सने याबाबतचे संकेतही दिले आहेत.
Mumbai : मुंबईत आज 167 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 1 हजार 635 नव्या रुग्णांची भर पडली आहे. दोन दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर असून 40 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 29 तासात 4 हजार 394 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत 4456 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 3334 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,122 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -