Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 19 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jan 2022 05:14 PM
औरंगाबाद कोरोनारुग्णांची संख्या हजार पार

औरंगाबादमध्ये आज 1 हजार 107 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. यावेळी शहरात 767 तर ग्रामीण भागात 330 रुग्ण आढळले आहेत.

नांदेड जिल्ह्यात आज 758 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

नांदेड जिल्ह्यात आज 758 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 

परभणी जिल्ह्यात 24 तासात 235 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

परभणी जिल्ह्यात 24 तासात 235 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 46 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात 1109 रुग्णांवर उपचार सुरू आहे. 

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 438 कोरोना बाधित रुग्णांची नोंद

अमरावती जिल्ह्यात आज तब्बल 438 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 1 जानेवारी पासून रुग्णांमध्ये वाढ होत आहे. 

पुण्यात गेल्या 24 तासात 6441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 4857 रुग्णांनी केली कोरोनावर मात

पुण्यात गेल्या 24 तासात 6441 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4857 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 527526 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या पुण्यात 39582 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 22183 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.

चंद्रपूरमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ

चंद्रपूरमध्ये आज कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. आज 620 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 207 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या चंद्रपूरमध्ये 2246 सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील  कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. काल राज्यात कोरोनाच्या  39 हजार 207  नव्या रुग्णांची भर झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. या आधी रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर असायची, त्यात आता घट होत असल्याचं दिसून येतंय. 
 
राज्यात आज एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही


राज्यात आज  एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.  आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1001 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. 


राज्यात आज 53 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद



राज्यात आज 53 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.95 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 68 लाख 68 हजार 816 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.  सध्या राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 72 लाख 82 हजार 128   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

 


मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित


मुंबईत सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते पण आज मात्र 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाने दिलेले सतर्क राहण्याचे आवाहन पाळणे गरजेचे आहे.  मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत मंगळवारी 6 हजार 149 नवे रुग्ण आढळले असून 7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 16 हजार 476 झाली आहे. तर नव्या बाधितांच्या तुलनेत जवळपास दुप्पट रुग्ण म्हणजेच 12 हजार 810 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट वाढून 94 टक्के इतका आहे.  



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.