Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी

Maharashtra Covid-19 cases Live Updates 15 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.

abp majha web team Last Updated: 15 Jan 2022 02:58 PM
पुण्यात 5,705 नवे रुग्ण

पुण्यात आज  5,705 नव्या कोरोना रुग्णाची भर पडली आहे. आज दोन जणांचा मृत्यू झाला आहे.  







 





परभणी- जिल्ह्यात 24 तासात 114 नवीन रुग्णांची भर

परभणी- जिल्ह्यात 24 तासात 114 नवीन रुग्णांची भर


3064 तपासण्यात 114 रुग्ण आढळले 


उपचार सुरू असलेल्या 17 रुग्णांना देण्यात आला डिस्चार्ज 


सध्या जिल्ह्यातील एकुण 615 रुग्णांवर उपचार सुरू

धुळे जिल्ह्यात आज 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

धुळे जिल्ह्यात आज 204 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या धुळ्यात  810 सक्रिय रुग्ण आहेत.

परभणी जिल्ह्यात 24 तासात 114 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

परभणी जिल्ह्यात 24 तासात 114 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 17 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या परभणीत 615 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 37 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

हिंगोली जिल्ह्यात मागील 24 तासात 37 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या हिंगोलीत 149 सक्रिय रुग्ण आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात आज 214 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

बुलढाणा जिल्ह्यात आज 214 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या बुलढाण्यात 871 सक्रिय रुग्ण आहेत. तर आजपर्यंत 676 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

अकोल्यात गेल्या 24 तासात 236 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 89 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अकोल्यात गेल्या 24 तासात 236 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 89 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. अकोल्यात आतापर्यंत  1143 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.


 

मुंबईत आज 10,661 नवे रुग्ण आढळले

मुंबईमध्ये शनिवारी 10,661 नवे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती बीएमसीने दिली आहे. 11 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात 21,474 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

अमरावती जिल्ह्यात आज 207 कोरोना बाधित रुग्ण आढळले

अमरावती जिल्ह्यात आज 207 कोरोना बाधित रुग्ण आढळले, मागील 14 दिवसांपासून रुग्णांमध्ये होतेय वाढ
  
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख महाविद्यालय प्रयोगशाळा, रॅपिड अँन्टीजन टेस्ट तसेच विविध प्रयोगशाळेच्या अहवालनुसार अमरावती जिल्ह्यात  
207 नवे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने दिली आहे..


एकूण रूग्णांची संख्या 97 हजार 652 झाली..


11 तारखेला 91 रुग्ण होते..
12 तारखेला 186 रुग्ण होते..
13 तारखेला 192 रुग्ण होते..
14 तारखेला 253 रुग्ण होते..
15 तारखेला 207 रुग्ण आढळले..

मुंबईतील तीन विभागात 286 नवीन कोरोना रुग्ण


धारावीत आज 40 नवे रुग्ण सापडले, दादरमध्ये 120 तर माहिममध्ये कोरोनाचे 126 नवे रुग्ण सापडले आहेत. या तीन विभागात आज एकूण 286 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

नांदेड जिल्ह्यात दिवसागणिक कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट, नांदेड महापालिका क्षेत्रातील 80 टक्के कोरोना बाधित रुग्ण

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नांदेड जिल्ह्यात दररोज धडकी भरविणारे कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतरही नागरिकांची बेफिकिरी मात्र कायम आहे. शुक्रवारी प्रशासनाला 2 हजार 288 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 553 बाधित आढळले. जिल्हाभरात आढळत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये जवळपास 80 टक्के रुग्ण हे नांदेड महापालिका हद्दीतील आहेत. प्रशासनाने कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी पथके गठीत केली आहेत. परंतु ही पथके कागदावरच असल्यामुळे नागरिकांची बेफिकिरी वाढली आहे. तर नांदेड जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याची माहिती खुद्द जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिलीय. त्यासाठी महापालिका क्षेत्रात कोरोना नियम पायदळी तुडवणाऱ्या खासगी संस्था व नागरिकांवर कार्यवाही करण्यासाठी महापालिकेने 13 पथके तैनात केली असली तरी नांदेडकर मात्र बिनधास्त व बेफिकीर वावरताना दिसत आहेत.

सांगलीत शुक्रवारी 571 रुग्णांची नोंद

सांगली जिल्ह्यात शुक्रवारी 571  नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून सांगली महापालिका क्षेत्रांत  256 रुग्ण आढळले आहेत. सांगलीत सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण  2084 इतके आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Update : कोरोनाचा विळखा घट्ट होतोय! राज्यात शुक्रवारी  43 हजार 211 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद


गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाच्या 43, 211 नव्या रुग्णांची भर झाली असून 19 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात शुक्रवारी 33, 356 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यात अधिक रुग्णांची भर पडल्याचं दिसून येतंय. त्यामुळे राज्याच्या चिंतेत भर पडली आहे.


राज्यात शुक्रवारी 19 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद


राज्यात शुक्रवारी 19 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.98 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 67 लाख 17 हजार 125 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 टक्के आहे.  सध्या राज्यात 19 लाख 10 हजार 361 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 9286 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7,15,64,070   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.


Omicron in Maharashtra : राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढली, एकाच दिवसात 238 नव्या रुग्णांची नोंद


राज्यावरील ओमायक्रॉनच्या (Omicron) संकटाचे ढग अधिक गडद होताना दिसत आहेत. कोरोना रुग्णसंख्येसोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येतही सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी एकाच दिवसात राज्यात ओमायक्रॉनच्या 238 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या दीड हजारापेक्षा अधिक आहे. 


राज्यात शुक्रवारी सापडेलल्या रुग्णांपैकी 197 रुग्ण हे पुण्यातील  आहेत. त्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील 32, पुणे ग्रामीण आणि नवी मुंबईत प्रत्येकी तीन, मुंबई दोन, अकोल्यातील एक रुग्ण सापडला आहे. राज्यात आज  आढळलेल्या १६०५ रुग्णांपैकी ८५९ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.