Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यासह देशातील कोरोनाची आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 12 February 2022 : राज्यासह देशातील आजची कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Feb 2022 06:23 PM
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 4 हजार 359 नव्या रुग्णांची नोंद
Maharashtra Corona Update : शनिवारी राज्यात चार हजार 359 नव्या रुग्णांची भर पडली आहे. राज्यात आज 32 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Karnataka Corona Update : तामिळनाडूत आज 2,812 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Karnataka Corona Update : तामिळनाडूत आज 2,812 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11,154 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 3,202 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Karnataka Corona Update : कर्नाटकात आज 3,202 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,988 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Mumbai Corona Update : मुंबईत आज 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Mumbai Corona Update : मुंबईत आज 349 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 635 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Uttar Pradesh Corona Update : उत्तर प्रदेशमध्ये आज 1776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Uttar Pradesh Corona Update : उत्तर प्रदेशमध्ये आज 1776 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3,101 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Delhi Corona Update : दिल्लीत आज 920 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Delhi Corona Update : दिल्लीत आज 920 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,388 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
Akola Corona Update : आज दिवसभरात अकोल्यात 35 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Akola Corona Update : आज दिवसभरात अकोल्यात 35 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 264 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्येत चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या 5 हजार 455 नव्या रुग्णांची भर पडली आहे. कालच्या तुलनेत आज रुग्णसंख्या 793 ने कमी झाली असून 63 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 14 हजार 635 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात आज 76 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही.आतापर्यंत 3531 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 2353 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. सध्या राज्यात 1,178 ओमायक्रॉनचे रुग्ण अॅक्टिव्ह आहेत
राज्यात आज 63 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात आज 63 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 76 लाख 14 हजार 635 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के आहे. सध्या राज्यात 6 लाख 10 हजार 718 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2392 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 61 लाख 69 हजार 626 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
गेल्या 24 तासात देशात 58 हजार 77 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 657 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर आज 13.4 टक्के कमी रुग्णांची नोंद झाली आहे. कालच्या दिवसापेक्षा आज कोरोना रुग्णांची संख्या कमी नोंदवली आहे. हळूहळू रुग्णसंख्या वाढीचा वेग कमी होत आहे. काल देशात 67 हजार 84 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर 1 हजार 241 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामानाने आज रुग्णांच्या संख्येत घट झाली असून, मृत्यूच्या संख्येत देखील घट झाली आहे.
मुंबईत आज 367 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, कालच्या तुलनेत ही रुग्णसंख्या आणखी कमी असल्याने मुंबईकरांसह पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गुरुवारी मुंबईत 429 रुग्ण आढळले होते. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत मुंबईत 367 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर जण 841 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे मुंबईतील रिकव्हरी रेट 98 टक्के इतका झाला आहे. नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांमुळे मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या 3 हजार 219 इतकी झाली आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी हजार पार
मुंबईकरांना आणखी दिलासा मिळाला आहे, कारण कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी हा आज एक हजारांपार गेला आहे. आज हा कालावधी 1 हजार 55 दिवसांवर आला आहे. कालच्या तुलनेत यामध्ये तब्बल 106 दिवसांची वाढ झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर 0.07% टक्के इतका झाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत एका रुग्णाचा कोरोनावर उपचार घेताना मृत्यू झाला आहे. आज नव्याने सापडलेल्या 367 रुग्णांपैकी 50 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 966 बेड्सपैकी केवळ 1 हजार 162 बेड वापरात आहेत.