एक्स्प्लोर

दिवाळीपूर्वी वाढीव वीजबिलांबाबत दिलासा नाहीच! या आठवड्यात मंत्रिमंडळ बैठक नसल्यानं आशा मावळल्या

लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं आली होती. याप्रकरणी दिवाळीआधी दिलासा देऊ असं आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिलं होतं. परंतु, आता मात्र याप्रकरणी दिवाळीपूर्वी दिलासा मिळण्याच्या आशा मंदावल्या आहेत.

मुंबई : कोरोना काळात आलेल्या वीजबिलांबाबत सामान्य नागरिकांना अजूनही दिलासा नाही. दिवाळीआधी या प्रकरणी दिलासा देऊ असं आश्वासन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दोन नोव्हेंबर रोजी दिलं होतं, पण याबाबत अजूनही शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच या आठवड्यात कोणतीही मंत्रिमडळ बैठक नसल्यामुळे वाढीव वीजबिलांबाबत ग्राहकांना दिलासा मिळण्याच्या आशा मावळल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात वीज बिल ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिलं आली होती. यावरून मनसेने आंदोलन देखील केलं होतं. राज्य सरकारने वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी बैठकाही घेतल्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठका घेऊन वीजबिलांबाबत काय सवलत देता येईल, याची चाचपणी देखील केली होती. पण राज्यावरील आर्थिक संकट पाहता ही सवलत देता येईल का हाच प्रश्न होताच. त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रश्न प्रलंबित राहिला. या दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील या प्रश्नाबाबत राज्यपाल यांना भेटून आले.

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देखील दोन नोव्हेंबर रोजी दिवाळी आधी वीज बिल सवलती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. असे संकेत दिले होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला असता. आज दिवाळीचा पहिला दिवस, या आठवड्यात कॅबिनेट बैठकही होत नाही, त्यामुळे वीज बिल सवलतीचा प्रस्ताव ही आलेला नाही. म्हणून दिवाळीत देखील वीज बिलांबाबत दिलासा नाही असंच चित्र आहे.

कोरोना काळात सामान्य लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होतं. कर्जाचे हफ्ते त्यात भरघोस आलेली वीज बिलं यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष होता. पण या प्रश्नी नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आता मावळत चालली आहे का? हाच प्रश्न आहे.

वीज बिल सवलती बाबत कोणता प्रस्ताव होता?

- राज्यातील सर्वच वीज ग्राहकांचा यावर्षीच्या एप्रिल, मे, जून या महिन्यातील वीज वापर आणि याच महिन्यांसाठी 2019 साली केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. - 2019 साली जेवढा वीज वापर केला असेल, तेवढ्याच वापराचे या वर्षीच्या एप्रिल, मे, जून महिन्यात वीज बिल ग्राहकांना भरायचे आहेत. - त्यावरील वीज वापराचा भार राज्य सरकार उचलणार आहे. - 100 युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत राज्य सरकार पूर्णपणे भरणार आहे. - म्हणजे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही 70 युनिट वीज वापरली असेल आणि यावर्षी 100 युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला 70 युनिटचेच बिल भरायचे आहे, फरकाच्या 30 युनिटचे बिल राज्य सरकार भरणार आहे. - याच पद्धतीने जर वीज वापर 101 ते 300 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 50 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. - तर वीज वापर 301 ते 500 युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा 25 टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. - अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे. - ज्यांनी वीज बिल भरलेले आहे अशा ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. - राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. - व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू होणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Maharashtra Live Breaking Marathi News: लोकसभेनंतर राज्यसभेतही परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर, मुलांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सोडणार नाही; पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ संदेश
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!

व्हिडीओ

Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; दोन जणांचा मृत्यू, 5 ते 6 जण अडकल्याची भीती, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Maharashtra Rain: राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
राज्यभरात पावसाचं थैमान सुरूच! पुढचे 24 तास अतिमहत्वाचे, हवामान विभागाकडून 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा चांदा ते बांदा पावसाची खबरबात!
PM Modi: पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
पेपरफुटीविरोधात कायदा मंजूर करताच पीएम मोदींचा आणखी एक सेल्फी कॅमेऱ्यातून व्हिडिओ; म्हणाले, 'मित्रांनो, ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी..'
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
'आता माझा रोल बदललाय..' स्वस्त समोस्यासाठी संसदेत आवाज उठवणारे राघव चड्ढा पहिल्यांदाच देशव्यापी विद्यार्थी आक्रोशावर बोलले; मोदींचे कौतुक करत काय काय म्हणाले?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act: राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
राज्यसभेतही पेपरफुटी विधेयक मंजूर, विरोधकांचा सभात्याग; राष्ट्रपतींच्या मुंजरीनंतर कायद्यात रुपांतर होणार
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
मग तुमच्या टोळीच्या बॉसने चार वर्षांपूर्वी दोन वर्षांत रस्ते खड्डे मुक्त होतील सांगितलं होतं, त्याचं काय झालं? मुंबईमधील कारभाऱ्यांच्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ नादावर आदित्य ठाकरेंचा खोचक सवाल
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
भाजपला तो शब्द खटकला; खासदार अनुराग ठाकूरांकडून राहुल गांधींविरुद्ध हक्कभंग, संसदीय भाषेचा दिला दाखला
Virat Kohli on Ajinkya Rahane: 'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
'तू माझा सर्वात आवडता कसोटी फलंदाजीचा साथीदार..' निवृत्तीची घोषणा करताच अजिंक्य रहाणेसाठी विराट कोहलीची अत्यंत भावूक पोस्ट
Embed widget